Maharashtra Breaking News LIVE 20 February 2025 : एकनाथ शिंदेंच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 20 फेब्रुवारी 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

रेल्वे स्थानकावरून प्रवास करताना निर्धारित वेळेनुसार येणारी गाडी कोणत्या ‘प्लॅटफॉर्म’वर येणार आहे, याची कल्पना आता रेल्वे प्रवाशांना एक तास अगोदर समजणार आहे. मध्य रेल्वे विभागाच्या पुणे रेल्वे प्रशासनाने अचानक गर्दी होऊन चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना होऊ नये, प्रवाशांची धावपळ होऊ नये, म्हणून व्यवस्थापनासाठी निर्णय घेतला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामींना उच्च न्यायालयाने दिली दोन आठवड्याची मुदत. निवडणूक आयोगाच्या अटी व शर्तीचा भंग केल्या प्रकरणी शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी प्रवीण स्वामी यांच्या विरोधात दाखल केली आहे याचिका. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याप्रकरणी पार पडली सुनावणी. आमदार प्रवीण स्वामी यांनी म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयात मागितली होती चार आठवड्याची मुदत.
LIVE NEWS & UPDATES
-
IND vs BAN : सहाव्या विकेटसाठी बांगलादेशची मोठी भागीदारी
बांगलादेशच्या 5 विकेट या 35 धावांवर पडल्या होत्या. मात्र त्यानंतर तोहिद हृदोय आणि जाकेर अली यांनी डाव सावरला. सहाव्या विकेटसाठी 90हून अधिक धावांची भागीदारी केली.
-
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सचिवालयात औपचारिकपणे पदभार स्वीकारला
शपथ घेतल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता दिल्ली सचिवालयात पोहोचल्या. जिथे त्यांनी औपचारिकपणे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री आणि भाजपच्या दुसऱ्या महिला मुख्यमंत्री आहेत.
-
-
ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी सरकारचा सल्ला
सरकारने म्हटले आहे की ओटीटी प्लॅटफॉर्मवर मुलांसाठी आक्षेपार्ह, अश्लील, आक्षेपार्ह सामग्री दाखवू नये आणि नियम/मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे. या संदर्भात, खासदारांनी सरकारकडे तक्रार केली होती की ओटीटीवर मुलांसाठी अपमानास्पद भाषा, अश्लीलता आणि आक्षेपार्ह मजकूर दाखवला जातो.
-
शक्तिपीठ महामार्ग विरोधात 12 मार्चला मुंबईमधील आझाद मैदानावर मोर्चा
कोल्हापूर- शक्तिपीठ महामार्ग विरोधात 12 मार्चला मुंबईमधील आझाद मैदानावर मोर्चा होणार आहे. या मोर्चात १२ जिल्ह्यातील शेतकरी सहभागी होणार आहेत. आमदार सतेज पाटील यांनी ही माहिती दिली. कोल्हापूरमध्ये झालेल्या शक्तिपीठ महामार्ग विरोधातील राज्यव्यापी बैठकीत निर्णय घेण्यात आला.
-
एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. गोरेगाव पोलिसांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा ई-मेल मिळाला आहे.
-
-
दिल्लीत चौथ्यांदा महिला मुख्यमंत्री, इतरांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ
कपिल मिश्रा, रवींद्र सिंग, मनजिंदर सिरसा, आशिष सूद यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. दिल्लीच्या रामलीला मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडतोय. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत.
-
रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री
दिल्लीच्या रामलीला मैदानावर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. रेखा या गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री बनल्या आहेत. तर परवेश वर्मा हे दिल्लीचे उपमुख्यमंत्री बनले असून त्यांनीसुदधा शपथ घेतली आहे.
-
नवी दिल्ली- व्यासपीठावर मोदींच्या वक्तव्याने नेत्यांमध्ये पिकला हशा
नवी दिल्ली- मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर दाखल झाले आहेत. व्यासपीठावर दाखल होताच मोदींनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी खास संवाद साधला. मोदींनी केलेल्या वक्तव्याने तिन्ही नेत्यांमध्ये हशा पिकला.
-
प्रयागराज- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कुंभस्नान
प्रयागराज- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कुंभस्नान घालण्यात आलं. प्रयागराजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी दाखल झाली. शिवजयंतीनिमित्त प्रयागराजमधील कुंभमेळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रतीकात्मक अमृतस्नान घालण्यात आलं. त्रिवेणी संगमावर हे अमृतस्नान घालण्यात आलं. उत्तर प्रदेश मराठी समाजचे पदाधिकारी उमेश पाटील यांनी आयोजन केलं होतं.
-
कुसुमाग्रज मराठी विशेष केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास केंद्र भूमिपूजन कार्यक्रम जाहीर
नवी दिल्ली- कुसुमाग्रज मराठी विशेष केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास केंद्र भूमिपूजन कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता कार्यक्रम होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू शांतीश्री पंडित यांच्या अध्यक्षेखाली कार्यक्रम होणार आहे.
-
Maharashtra News: मुंबईच्या दादरमधून 10 कोटींचं ड्रग्ज जप्त
मुंबईच्या दादरमधून 10 कोटींचं ड्रग्ज जप्त… दोघांना अटक करुन माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल… मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई…
-
Maharashtra News: शक्तिपीठ महामार्ग विरोधातील आंदोलनाची दिशा आज ठरणार
शक्तिपीठ महामार्ग विरोधातील आंदोलनाची दिशा आज ठरणार… शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठीच्या राज्यव्यापी बैठकीला कोल्हापुरात सुरुवात… कोल्हापूरच्या शाहू स्मारक भवनमध्ये काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वात होत आहे बैठक… बैठकीला बारा जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित…
-
Maharashtra News: मंत्रिमंडळाच्या परवानगीविना मुंडेंकडून पैसे वर्गचे आदेश – दमानिया
मंत्रिमंडळाच्या परवानगीविना मुंडेंकडून पैसे वर्गचे आदेश… मंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूरच झाला नाही, दमानियांचा आरोप… दमानियांचा मुंडेंवर 200 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप…
-
Maharashtra News: कल्याणमधील काटेमानिवलीच्या नाना पावशे चौकात मध्यरात्री गोळीबार
कल्याणमधील काटेमानिवलीच्या नाना पावशे चौकात मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना घडली आहे… गोळीबारात रंजीत दुबे नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे… उत्तर प्रदेशामधील जागेत्या वादावरुन चुलत भावाकडून रंजीतची हत्या…
-
आमदारांचे भाऊ, पुतण्यावर गुन्हा
बुलढाणा मतदार संघाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे भाऊ किशोर गायकवाड , पुतण्या श्रीकांत गायकवाड सह चार जणांविरुद्ध बुलढाणा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलढाणा शहरातील क्रीडा संकुल परिसरात असलेल्या शेतात ३१ डिसेंबर २०२४ रोजी तक्रारदार प्रथमेश गवई आणि त्यांचा मित्र हरवलेल्या जनावरांचा शोध घेण्यासाठी गेले होते.
-
नाशिक शहरातील अनेक रेशन दुकान बंद
काल संध्याकाळपासून नाशिक शहरातील अनेक रेशन दुकान बंद आहे. केवायसी मशीन बंद असल्याने नाशिक शहरात धान्य वितरण ठप्प झाले. केवायसी मशीन मध्ये error मेसेज येत असल्याने धान्य पुरवठा करणे अशक्य होत आहे. अनेक रेशन दुकाना बाहेर नागरिकांची गर्दी होत आहे.
-
राहुल सोलापूरकरांच्या घरासमोर बंदोबस्त कायम
अभिनेते राहुल सोलापूरकरांच्या घरासमोर दोन पोलीस पिंजरा वाहनांसह बंदोबस्त तैनात आहेत. गेली 16 दिवसांपासून राहुल सोलापूरकर यांच्या पुण्यातील कोथरूड परिसरात पोलीस बंदोबस्त आहे. अनेक संघटनांनी राहुल सोलापूरकर च्या घरासमोर आंदोलन केली होती.
-
कपलिंग तुटल्याने डाऊन मध्य रेल्वे विस्कळीत
टिटवाळा-खडवली दरम्यान मालगाडीचे कपलिंग तुटल्याने डाऊन मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. डाऊन दिशाच्या सर्वच लोकल गाड्या पूर्णपणे बंद झाल्या आहेत. कसाराहून येणारी “गरीब रथ मेल” आसनगावला थांबविण्याची शक्यता आहे.
-
शिवजयंतीत झळकले लॉरेन्स बिश्नाईचे पोस्टर
छत्रपती संभाजनगर येथील शिव जयंतीच्या कार्यक्रमात काही तरुणांच्या हातात लॉरेन्स बिश्नोईचे पोस्टर दिसले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
-
आमदार-खासदारांनी एसटी प्रवास करावा
आमदार खासदारांनी सुध्दा एसटीने काही प्रवास करायला हवा, म्हणजे विधानसभेत, लोकसभेत त्यांना लोकांच्या खऱ्या समस्या मांडता येतील, असे मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडलं. एसटीच्या समस्या एसी गाडीमध्ये किंवा एसी केबिनमध्ये बसून कळणार नाहीत, अडचणी समजून घेण्यासाठी मी एसटीने प्रवास केला, असे ते म्हणाले.
-
संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा
बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा आज होत आहे. त्यानिमित्त शेकडो भाविक आणि दिंड्या शेगावमध्ये दाखल होत आहे. भाविकांनी एकच गर्दी केली आहे.
-
अंधेरी- चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाला रेल्वे कर्मचाऱ्यांनी वाचवले
अंधेरी रेल्वे स्थानकावर आणखी एका प्रवाशाचा जीव वाचला. चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाला रेल्वे कर्मचाऱ्यांनी वाचवले.
अंधेरी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर चालत्या ट्रेनमधून एक प्रवासी पडला. पण ट्रेन रुळाच्या मध्यभागी येण्यापूर्वीच रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्याला वाचवले.
हनुमंत शिंदे आणि संदीप मराठे अशी प्रवाशाचे प्राण वाचवणाऱ्या एमएसएफ सैनिकांची नावे आहेत.
-
शिंदेना महादजी शिंदे यांच्या नावाने पुरस्कार का दिला ? संजय राऊतांचा सवाल
शिंदेना महादजी शिंदे यांच्या नावाने पुरस्कार का दिला ? शिंदेंना पुरस्कार दिलेल्या संस्थेची चौकशी झाली पाहिजे – संजय राऊत
-
पुणे – छावा चित्रपट पाहण्यासाठी घोड्यावरून अवतरले प्रेक्षक
पुणे – छावा चित्रपट पाहण्यासाठी घोड्यावरून अवतरले प्रेक्षक, पुण्यातील महिलांनी फेटे बांधून बघितला छावा चित्रपट.
छत्रपती संभाजी महाराजांच्या वेषातील व्यक्ती घोड्यावरून चित्रपटगृहात आली. महिलांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या घोषणांनी चित्रपटगृह दुमदुमून सोडलं. पुण्यातील मनसेने नेते प्रल्हाद गवळी यांनी महिलांसाठी विशेष शो आयोजित केला होता.
-
6 आठवडे उलटूनही धनंजय मुंडेंचा एकही जनता दरबार नाही
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील एकाही जनता दरबाराल धनंजय मुंडेची उपस्थिती नाही. 6 आठवडे उलटूनही धनंजय मुंडेंचा एकही जनता दरबार झालेला नाही. पक्ष कार्यालयात जनता दरबार घ्या, अजित पवारांनी मंत्र्यांना सूचना दिल्या आहेत, मात्र धनंजय मुंडे यांचा एकही जनता दरबार अद्याप झालेला नाही.
-
रायगड जिल्ह्यातील पेण आणि सुधागड तालुक्याचे भूकंपाचे सौम्य धक्के
रायगड जिल्ह्यातील पेण आणि सुधागड तालुक्याचे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. तिलोरे गावात पहाटे 3 च्या सुमारास भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
-
अशोक धोडी यांच्या अपहरण आणि हत्येला एक महिना पूर्ण , पोलीस चौकीतून पसार झालेला मुख्य आरोपी अजूनही फरार .
पालघर – शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणाला एक महिना पूर्ण झाला आहे. पोलीस चौकीतून पसार झालेला मुख्य आरोपी मात्र अजूनही फरार आहे. फरार चार आरोपींना अटक करण्यात पालघर पोलिसांना महिनाभरानंतर ही अपयश.
अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश धोडी घोलवडच्या वेवजी पोलीस चौकीतून पसार झाला होता .
-
आज रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार
आज रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. शपथविधी सोहळ्यानंतर एनडीएच्या प्रमुख नेत्यांची दिल्लीत होणार बैठक. बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होणार बैठक.
-
रायगड जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के
रायगड जिल्ह्यातील पेण, सुधागड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के. तिलोरे गावात भूकंपाचे धक्के बसल्याची ग्रामस्थांची माहिती.
-
GBS मुळे आणखी दोघांचा मृत्यू
राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालय आणि एका खासगी रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 11 झाली आहे. दरम्यान, राज्यातील जीबीएसची रुग्णसंख्या 211 वर पोहोचली आहे.
-
शेगावचे श्री संत गजानन महाराजांचा आज 147 वा प्रकट दिन सोहळा
महाराष्ट्रातच नव्हे तर देशविदेशातील असंख्य भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेले शेगावचे संत श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन माघ वद्य सप्तमीला सर्वत्र अतिशय उत्साहाने साजरा होतो. यंदा, २० फेब्रुवारी २०२५ रोजी गजानन महाराज प्रकट दिन आहे. विशेष म्हणजे यावेळी गुरुवारच्या दिवशी गजानन महाराज प्रकट दिन आलाय. त्यामुळे भक्तांची मोठी गर्दी शेगावी पाहायला मिळते आहे.
-
कल्याण पूर्वमध्ये मध्यरात्री गोळीबार, एकाचा मृत्यू
कल्याण पूर्व काटेमानिवली नाना पावशे चौकात मध्यरात्री गोळीबार. परिसरात भीतीचे वातावरण. रात्री साडेअकराच्या सुमारास चौकात झाडल्या गोळ्या. गोळीबारात एकाचा मृत्यू. रंजीत दुबे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव. जमिनीच्या वादातून नातेवाईकांनी गोळ्या झाडून हत्या केल्याचा संशय. कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आरोपींचा शोध सुरू.
Published On - Feb 20,2025 8:09 AM
