Maharashtra Breaking News LIVE 4th April 2025 : पुण्यातील मोई येथील भंगार गोदामाला भीषण आग
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 4 एप्रिल 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

कल्याणमध्ये वाहतूक सेवकाला दोन हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक. वाहतूक शाखेत जमा असलेले वाहन सोडवण्यासाठी वाहनचालकाकडे केली होती दोन हजाराची मागणी. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत वाहतूक सेवक (वॉर्डन) वैभव युवराज शिरसाटला रंगेहाथ अटक केली. महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अपुरं आणि वेळेवर मानधन मिळत नसल्यामुळे वाहतूक सेवक लाच घेत असल्याची माहिती .पुणे विमानतळाचे विस्तारीकरण, आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे आणि नवीन टर्मिनल यामुळे प्रवासी संख्येत वाढ झाली असून, गेल्या वर्षभरात प्रथमच एक कोटी प्रवाशांचा टप्पा ओलांडला गेला आहे. त्यामध्ये प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासापेक्षा देशांतर्गत प्रवासाला पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची बदली झाल्याने हर्षल गायकवाड यांची महापालिकेच्या प्रभारी आयुक्तपदी नियुक्ती. कायमस्वरूपी आयुक्त नसल्याने गायकवाड यांच्याकडे तात्पुरती जबाबदारी. डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतींच्या कारवाईचा ताण नव्या प्रभारी आयुक्तांवर. स्थानिक राजकीय हस्तक्षेपामुळे आयएएस अधिकारी आयुक्तपद स्वीकारण्यास नकार देत असल्याची माहिती.
LIVE NEWS & UPDATES
-
कल्याण जवळील आंबिवलीत झाड कोसळले
कल्याण जवळील आंबिवलीत झाड कोसळले
वादळी वाऱ्यामुळे भले मोठे झाड उन्मळून पडले
चार ते पाच दुचाक्यांचे नुकसान सुदैवाने जीवितहानी नाही
-
सारंगी महाजन यांच्या अर्जावर सुनावणी
सारंगी महाजन यांच्या जमिनीच्या वादा संदर्भातील अर्जावर 3 मे रोजी सुनावणी होणार आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सहकार्याकडून जमीन व्यवहारात फसवणूक केल्याचा सारंगी महाजन यांचा आरोप आहे.
-
-
धनंजय मुंडे यांच्या विरोधात सुनावणी पुढे ढकलली
करुना मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारी संदर्भातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली.आता 3 मे रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या तक्रारीवर आज परळीच्या न्यायालयात सुनावणी करण्यात आली व दुसरी तारीख तीन मे हे देण्यात आली आहे.
-
इगतपुरी पोलिसांना जमावाची मारहाण
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी पोलिसांना जमावाची मारहाण करण्यात आले. मारहणी पोलीस ठाण्याचे कृष्णा गोडसे आणि रामदास वाघ यांचे कपडे फाडले. झाडावर लटकलेल्या मृतदेहाची चौकशी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी हा प्रकार घडला.
-
दीनानाथ रुग्णालयप्रकरणात चौकशीचे आदेश- पवार
दीनानाथ रुग्णालयातील प्रकाराबद्दल उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. चौकशीनंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा
-
-
गर्भवती महिलेचे मृत्यप्रकरण; मंगेशकर रुग्णालयाने 10 लाखांची मागणी केल्याचा महिलेच्या पतीचा आरोप
गर्भवती महिलेच्या मृत्यनंतर मंगेशकर रुग्णालयाविरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान मंगेशकर रुग्णालयाने 10 लाखांची मागणी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्या गर्भवती महिलेला अॅडमिट करण्यासाठी 10 लाखांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या महिलेच्या पतीने हा आरोप केला आहे. तसेच सर्व पक्षही आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. पतित पावन संघटनेनं रुग्णालयाला काळं फासलं.तसेच मंगेशकर रुग्णालयाला पालिकेनं नोटीसही बजावली आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहेत.
-
गर्भवती महिलेचे मृत्यप्रकरण; पतित पावन संघटनेनं रुग्णालयाला काळं फासलं
गर्भवती महिलेच्या मृत्यनंतर मंगेशकर रुग्णालयाविरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे. महिलेच्या मृत्यूनंतर शिवसेना पक्ष आणि अनेक संघटनाही आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. शिवसैनिकांनी रुग्णालयाबाहेर चिल्लर फेकली. तर, पतित पावन संघटनेनं रुग्णालयाला काळं फासलं.तसेच मंगेशकर रुग्णालयाला पालिकेनं नोटीसही बजावली आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहेत.
-
गर्भवती मृत्यू प्रकरण, दिशाभूल करणारी आणि अपूर्ण माहिती समोर: पालेकर
भाजप आमदार अमित गोरखे यांच्या यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर आंदोलन करण्यात येत आहे. तसेच संपूर्ण प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्याचा निर्णय रुग्णालय व्यवस्थापनाने घेतल्याचे सांगण्यात आले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय शासनाकडे अहवाल देणार असल्याचं रुग्णालय प्रशासनाने म्हटलं आहे. तसेच रुग्णालयाने सर्व माहिती सरकारकडे दिल्याचं रुग्णालयाचे पीआरओ पालेकर यांनी सांगितलं आहे. तसेच दिशाभूल करणारी आणि अपूर्ण माहिती समोर आल्याचं पालेकर यांनी म्हटल आहे. दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेनं या प्रकरणाबाबत रवी पालेकरांकडे निवदेनही दिलं आहे.
-
Maharashtra News: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर पोलीस बंदोबस्त…
तनिषा भिसे मृत्यू नंतर पोलीस प्रशासनाचा खबरदारीचा उपाय… विविध राजकीय संघटनांकडून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय… येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जातेय… या ठिकाणी उपचार घेणाऱ्या व्यक्तीकडून सांगण्यात येतेय… गोरगरीब रुग्णांना उपचाराला विलंब आणि टाळाटाळ केली जाते…
-
Maharashtra News: कल्याण शीळ रोडवरील धोकादायक होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर
कल्याण मुंबई महानगरपालिकेच्या अर्धा किलोमीटर अंतरावर एपीएमसी मार्केटजवळ कल्याण शीळ रोडच्या मुख्य रस्त्यावर होर्डिंगचा सूचना फलकाचा तुकडा लोंबकळत असल्याने मोठा अपघात होऊन नागरिकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता… घाटकोपर दुर्घटनेनंतरही केडीएमसीने फलक सुरक्षेबाबत घेतलेली ढिसाळ भूमिका ऐरणीवर… सदानंद चौकात यापूर्वीही होल्डिंग कोसळून दोन जण जखमी आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते… “केडीएमसी होर्डिंग कोसळण्याची वाट पाहतेय का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून, तातडीने कारवाईची मागणी…
-
Maharashtra News: महिला मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर विहिरीत कोसळले
नांदेड येथे महिला मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर विहिरीत कोसळले… नांदेडच्या आलेगाव शिवारात घडली घटना… काही महिला विहरित अडकल्याची माहिती… घटनास्थळी बचाव कार्य सुरू… ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने आठ महिलांचा मृत्यू… वसमत तालुक्यातील गुंज येथील होते महिला मजूर कामगार… विहीर पाण्याने भरलेली असल्याने बचाव कार्यात अडथळा…. जिल्हा प्रशासनाच्या वतीने युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरु… महिलांसोबत लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती.
-
Maharashtra News: सोलापुरात 600 घंटागाडी कर्मचारी यांचं विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन
घंटागाडी कामगारांचं आजपासून बेमुदत धरणे आंदोलन…. घंटागाडी कर्मचाऱ्यांना प्रचंड आरोग्याच्या प्रश्नाला समोर जाव लागत आहे… किमान वेतन मिळावं, आरोग्याच्या सोयी सुविधा दिल्या गेल्या पाहिजे यासाठी करण्यात आले आंदोलन… जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत सोलापूर शहरातील घंटागाडी कामगार काम बंद करणार…. या आंदोलनामुळे आता सोलापुरातील स्वच्छतेचा प्रश्न समोर येत आहे.
-
आळंदीतील इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली
पुणे -लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी आळंदी मध्ये पुन्हा एकदा फेसाळली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतरही इंद्रायणी नदीच्या प्रदूषणावर कोणताही तोडगा निघालेला नाही. पिंपरी चिंचवड आणि इंद्रायणी नदीच्या परिसरातील अनेक कंपन्या केमिकल युक्त पाणी इंद्रायणी नदीमध्ये सोडत असल्याचं वारंवार स्पष्ट होऊनही या कंपन्यांवर कसलीही कारवाई होत नाही. त्यामुळे सातत्याने इंद्रायणी नदीमध्ये फेस निर्माण होण्याच्या घटना घडत आहेत. या प्रदूषण युक्त पाण्यामुळे आळंदीकर नागरिक आणि भाविकांच्या आरोग्याशी मात्र खेळ होत आहे.
-
ठाण्यात 2 हजार 885 पुरुषांच्या आत्महत्या, 1 हजार 70 महिलांनी मृत्यूला कवटाळले
गेल्या पाच वर्षात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात विविध कारणांनी वैफल्यग्रस्त झालेल्या 2 हजार 885 पुरुषांनी आत्महत्या केल्या आहेत. तर 1 हजार 70 महिला मृत्यूला कवटाळल्याची आकडेवारी समोर आली आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. कोरोनानंतर हे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे.
-
दिवा आणि मुंब्रा भागात अनधिकृत नळ जोडण्याविरोधातील कारवाई, दोन जणांवर गुन्हे दाखल
दिवा आणि मुंब्रा भागात कारवाईच्या दुसऱ्या दिवशी २७ अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. पहिल्या दिवशी २९ नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या होत्या. अनधिकृत टँकर भरणाप्रकरणी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच अनधिकृत नळ जोडणीबाबत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
-
मुंबईकरांसाठी चिंतेची बातमी, धरणांचा पाणीसाठी 35 टक्क्यांवर
मुंबईकरांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. मुंबईतील धरणांचा पाणीसाठी ३५ टक्क्यांवर आला आहे. कडक उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन होतं आहे. यंदाचा पाऊस लांबला तर मुंबईकरांवर पाण्याचे संकट ओढावणार आहे. पाणी पुरवठा खात्याचा राखीव पाणी वापरासाठी पाठपुरवठा करणे सुरू आहे. मुंबईच्या ७ धरणांमध्ये फक्त पाच लाख सात हजार ४४५ दशलक्ष म्हणजे ३५ टक्के पाणी शिल्लक आहे.
-
मुंब्रा कौसा याठिकाणी अनधिकृत चार मजली इमारतींवर महापालिकेचा हातोडा
मोठ्या प्रमाणात मुंब्रा कौसा भागात अनधिकृत बांधकाम होत असल्यामुळे पालिका ॲक्शन मोडमध्ये आली आहे. ठाणे महापालिकेच्यावतीने सीपी हाऊस, कौसा येथील तळ अधिक चार मजली अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाचे आदेशानुसार महापालिकेने ही कारवाई केली आहे.
-
पीक विम्याचे 2,359 कोटी रुपये जमा
केंद्र सरकारच्या विमा कंपनीकडून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे दोन हजार 359 कोटी रुपये जमा करण्यात आलेत. येत्या दोन दिवसात जिल्ह्यातील विमा कंपन्यांना ती रक्कम वितरित केली जाणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील पाच लाख तीस हजार शेतकऱ्यांना खरीप 2024 च्या नुकसानीपोटी 250 कोटी रुपयापेक्षा अधिकची रक्कम मिळणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिलीय.
-
ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचे निधन
ज्येष्ठ भारतीय अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचे शुक्रवारी (4 एप्रिल) सकाळी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे. मनोज कुमार हे त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जातात. ते ‘भारत कुमार’ या नावाने प्रसिद्ध होते.
-
वडेट्टीवार-आशिष शेलार भेट, राजकीय चर्चांना उधाण
काँग्रेस विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार आणि भाजपचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची यांचे भेट झाली असून या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. सोमवारी आशिष शेलार हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. नागपूर नागभीडकडून चंद्रपूरला येत असताना वडेट्टीवार आणि शेलार यांची भेट झाली. विशेष म्हणजे या भेटीदरम्यान आशिष शेलार, विजय वडेट्टीवार आणि वडेट्टीवार यांचे कट्टर विरोधक बंटी बांगड्या यांनी एकाच गाडीतून प्रवास केला.
Published On - Apr 04,2025 8:07 AM