Maharashtra Breaking News LIVE 12 April 2025 : एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला जन्म देण्याचं काम अमित शाह यांचं- संजय राऊत
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 12 एप्रिल 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर पोहचले आहेत. किल्ले रायगडावर होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रमासाठी अमित शाह पुण्यात आले आहेत. सकाळी ११ वाजता ते किल्ले रायगडावर पोहचणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. शिंदेच्या शिवसेनेचे राज्यव्यापी संपर्क अभियान सोमवारपासून होणार आहे. त्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक घेऊन नियोजन करण्यात आले. मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गांवर आज आणि उद्या ब्लॉक घेण्यात आला आहे. माहीम आणि बांद्रे दरम्यान हा ब्लॉक घेण्यात आला. या मेगाब्लॉकमुळे एकूण 334 लोकल सेवा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यभरात आज हनुमान जयंतीचे विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा…
LIVE NEWS & UPDATES
-
बोरिवली परिसरात धावत्या अॅक्टिव्हाने घेतला पेट
बोरिवली परिसरात धावत्या अॅक्टिव्हाने घेतला पेट
बोरिवली पश्चिम येथील सुधीर फडके पुलावरील घटना
घटनेनंतर काही मिनिटांतच स्कूटर जळून खाक
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल
घटनेत कोणतीही जीवितहानी नाही
-
नाशिकमध्ये अवकाळी पावसाची हजेरी
येवल्यात अवकाळी पावसाची हजेरी
तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट
अचानक आलेल्या गारपीट व पावसामुळे काढणीला आलेल्या शेती पिकांना फटका बसण्याची भीती उकड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना हवेत गारवा निर्माण झाल्यानं दिलासा
-
-
Maharashtra Breaking : दुचाकीचा कट मारल्यामुळे रागातून तरुणावर चाकूहल्ला
दुचाकीचा कट मारल्यामुळे रागातून तरुणावर चाकूहल्ला… अंबरनाथच्या दुर्गादेवी पाडामधील घटना…
-
Maharashtra Breaking : अकोला जिल्ह्यातील अकोला – मंगरुळपीर रस्त्यावर ट्रक उलटला
अकोला जिल्ह्यातील अकोला – मंगरुळपीर रस्त्यावर ट्रक उलटल्याची माहिती समोर येत आहे. ट्रकखाली दबून 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. 2 जण जखमी असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
-
Maharashtra Breaking : मालमत्तेच्या वादातून वडिलांनी केला मुलाचा खून
वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात खळबळजनक घटना घडली आहे. मालमत्तेच्या वादातून वडिलांनी चाकूने वार करून मुलाचा खून केला आहे. मृतकाचे नाव अनिल मोखडकर (वय ४०)– ट्रक चालक म्हणून काम करत होता. शनिवारी सकाळी वडील गोपाल मोखडकर यांच्यासोबत वाद झाल्यानंतर रागाच्या भरात वडिलांनी चाकूने 3 – 4 वार केले यात घटनास्थळीच मुलाचा मृत्यू झाला. आरोपी वडील गोपाल मोखडकर यांना पोलिसांनी अटक केली असून कारंजा पोलीस तपास करत आहेत.
-
-
Maharashtra Breaking : नाशिकचे जिल्हा व सत्र न्यायाधीश रुपेश राठी तातडीने निलंबित
तीन वर्षांच्या कार्यकाळातील निकालात गंभीर त्रुटी आढळल्या… पीडितांनी उच्च न्यायालयात तक्रार दाखल केल्यानंतर कारवाई… न्यायालयाच्या अंतर्गत चौकशी समितीने राठी दोषी ठरवले… चौकशीदरम्यान काही निकाल आक्षेपार्ह आणि चुकीचे असल्याचे स्पष्ट… फौजदारी व दिवाणी प्रकरणांतील निकालांची चार महिन्यांची तपासणी… चौकशी अहवालावरून निलंबनाचे आदेश जारी…
-
अमित ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांची नावे मराठी भाषेत सुयोग्य आकारामध्ये दर्शनी भागामध्ये लिहिणे बंधनकारक करण्याची मागणी मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना यासंदर्भातील निवेदन दिले आहे.
-
संजय राऊत यांची टीका
अमित शाह यांच्या दौऱ्यावर राऊत यांनी टीका केली. एकनाथ शिंदे यांनी शनिवारी अमित शाह यांची भेट घेतली. त्याबाबत राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे यांचे अमित शाह हे नेते आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला जन्म देण्याचे काम अमित शाह यांनी केले आहे. सविस्तर वाचा
-
अमिन शाह रायगडकडे रवाना
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे येथून किल्ले रायगडकडे रवाना झाले आहेत. अमित शाह यांच्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आहेत.
-
अहिल्यानगरमध्ये महिलांचा सन्मान
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात महिलांना हनुमान रथ ओढण्याचा मान दिला जातो. ब्रिटीश राजवटीपासून ही परंपरा संगमनेरकर जोपासत आहेत. ब्रिटिशांच्या बंदीला झुगारून शेकडो महिलांनी १९२९ साली रथ यात्रा काढली होती. तेव्हापासून ही परंपरा आजही अविरत सुरू आहे.
Published On - Apr 12,2025 9:58 AM
