Maharashtra Breaking News LIVE 24 May 2025 : ठाण्यात कोरोनाचा पहिला बळी, २१ वर्षीय तरुणाचा कोरोना मृत्यू
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 24 मे 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

साताऱ्यातील यवतेश्वर घाटात दरड कोसळली असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरड कोसळल्याने घाटात सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. साताऱ्यात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान राज्यात काही भागांत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड तसेच पुण्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच मराठवाड्यालाही जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. 4 ते 5 दिवस राज्यात संततधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वैष्णवी हगवणे केसमध्ये सासरे राजेंद्र आणि दीर सुशील हगवणेला अटक करण्यात आली असून त्या दोघांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत 12 जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा..
LIVE NEWS & UPDATES
-
वैष्णवी हगवणे प्रकरण : पोलिसांकडून निलेश चव्हाणचा शोध सुरू
निलेश चव्हाणचा शोध घेण्यासाठी पूणे पोलिसांची 5 पथक रवाना
गुन्हे शाखेचे 1 पथक शहरात तर एक पथक शहराबाहेर निलेश चव्हाणचा शोध घेत असल्याची माहिती
तर वारजे पोलीस स्थानाकातून 3 पथकं निलेश चव्हाणचा शोध घेण्यासाठी रवाना क
निलेश चव्हाणचा शोध सुरु असून, लवकरात लवकर ताब्यात घेण्याचा पुणे पोलिसांचा प्रयत्न
-
पुण्यातील खराडी परिसरात बनावट कॉल सेंटर, पुणे पोलिसांचा छापा
पुण्यातील खराडी परिसरात प्राइड आयकॉन नावच्या इमारतीमध्ये 9 व्या मजल्यावर बनावट कॉल सेंटरवर पुणे पोलिसांचा छापा….
123 जनांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय…
अंतरराष्ट्रीय पातळीवरून सदरची तक्रार केंद्रीय गृह मंत्रालयाला देण्यात आली होती
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार पुणे पोलिसांची मोठी कारवाई….
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पुणे पोलिसांना याची माहिती देण्यात आली होती…
त्यानंतर पुणे सायबर पोलीस,गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांकडून मोठी कारवाई
-
-
पुण्यानंतर सोलापुरातही विवाहित महिलेला सासरच्या लोकांकडून बेदम मारहाण
सोलापूर – पुण्यानंतर सोलापुरातही विवाहित महिलेला सासरच्या लोकांकडून बेदम मारहाण
– मारहाणीत महिलेच्या कानाचा पडदा फाटला तर अंगावर बेदम मारहाण
– मारहाण करणाऱ्या दीर आणि जावान विरोधात 307 कलमांतर्गत गुन्हा दाखल
– 2 दीर आणि 2 जाऊ यांच्याकडून करण्यात आली अमानुष मारहाण.
-
ठाण्यात कोरोनाचा पहिला बळी, २१ वर्षीय तरुणाचा कोरोना मृत्यू
ठाण्यात कोरोनाचा पहिला बळी
ठाण्यातील कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात २१ वर्षीय तरुणाचा कोरोना प्रादुर्भावाने मृत्यू
मुंब्र्यात राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणाचा सकाळी ६ च्या सुमारास मृत्यू
२२ मे साठी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते तर कोरोना पॉझिटिव्ह चा काल रिपोर्ट मध्ये निष्पन्न…
-
महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वाटा, खासदार निलेश लंके यांची प्रतिक्रिया
महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वाटा मोठा आहे. ठाकरे परिवार एकत्र आला तर निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आनंद होईल. ज्यांचा काही राजकीय हेतू आहे त्यांना ठाकरे कुटुंब एकत्र आल्याचे पटणार नाही. मात्र जो सरळ मार्गातील कार्यकर्ता आहे त्याला ठाकरे एकत्र आल्याचे पटेल, असं निलेश लंके म्हणाले.
-
-
वाशिम जिल्ह्यात सलग चौदाव्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस
वाशिम जिल्ह्यात सलग चौदाव्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सततच्या पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालंय. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडत आहे. पावसाळा सुरू होण्याआधी घराची दुरुस्ती करण्याची वेळ न मिळाल्यामुळे झोपडपट्टी परिसरातील लोक हैराण झाले आहेत.
-
ठाण्यात कोरोनाचा पहिला बळी, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू
ठाण्यात कोरोनामुळे पहिल्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 21 वर्षीय तरुणाचा कोरोना प्रादुर्भावाने मृत्यू झाला आहे. मुंब्र्यात राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणाचा सकाळी 6 वाजता मृत्यू झाला. या तरुणाला 22 मे रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तर शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र काही तासानंतर या तरुणाचा मृत्यू झाला.
-
नीती आयोगाची बैठक सुरू, पंतप्रधान मोदींचे भाषण दुपारी 4 वाजता
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नीती आयोगाची सर्वोच्च संस्था असलेल्या गव्हर्निंग कौन्सिलच्या 10 व्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील. त्यांचे समारोपाचे भाषण दुपारी 4 वाजता होईल.
-
नोएडामध्ये पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला
नोएडामध्ये पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. रुग्ण नोएडाच्या सेक्टर 110 येथील रहिवासी आहे. 55 वर्षीय वृद्ध महिला सौम्य लक्षणांसह खाजगी रुग्णालयात पोहोचली होती. लक्षणे पाहून रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
-
गुजरात: बीएसएफने पाकिस्तानी घुसखोराला ठार केले
गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पाकिस्तानी घुसखोराला बीएसएफ जवानांनी आज रात्री ठार मारले. बीएसएफ जवानांना एक संशयास्पद व्यक्ती आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून सीमा कुंपणाकडे जाताना दिसली. त्यांनी घुसखोराला आव्हान दिले, पण तो पुढे जात राहिला आणि त्यांना गोळीबार करण्यास भाग पाडले. घुसखोर जागीच ठार झाला. ही माहिती बीएसएफने दिली.
-
लोकांना खोटे आरोप करायची सवय आहे; प्रफुल पटेलांची लाडकी बहीण योजनेवर प्रतिक्रिया
लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने आदिवासी विभागाचा 335 कोटी रुपयांचा निधी वळविल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांना विचारले असता लोकांना खोटे आरोप करण्याची सवय झाली आहे. लाडकी बहीण योजना ही पुढच्या पाच वर्षापर्यंत आमची सरकार चालवणार आहे आणि भविष्यात आम्ही पंधराशे वरून ही निधीदेखील वाढवणार आहोत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी नेते प्रफुल पटेल यांनी दिली.
-
राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का, सत्यजीत पाटणकर भाजपाच्या वाटेवर?
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सातारा पाटणचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र सत्यजित सिंह पाटणकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी पाटणकर गटाच्या कार्यकर्त्यांची भाजपा प्रवेशाबाबत बैठक होणार आहे.
-
इंग्लंड दौऱ्यासाठी शुभमन गिल नवा कर्णधार
२० जून पासून ५ कसोटी सामने सुरु होत आहेत. विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिल हा नवा कर्णाधर झाला आहे. तर रिषभ पंतकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी
-
आनंदवार्ता, मान्सून केरळात दाखल झाला
अवकाळी, पूर्व मौसमी पाऊसाच्या भाऊगर्दीत मान्सून आता केरळात येऊन धडकला आहे. राज्यात मान्सून एक आठवड्यापूर्वीच येणार असल्याचा सांगावा हवामान खात्याने दिला आहे.
-
नीलेश चव्हाण पोलिसांना शरण येणार?
वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणात अजून एक अपडेट समोर येत आहे. फरार आरोपी नीलेश चव्हाण पोलिसांना शरण येणार असल्याचे समोर येत आहे. वैष्णवीचे बाळ त्याच्याकडे होते. कस्पटे कुटुंब बाळ घ्यायला गेले तेव्हा चव्हाण याने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवला होता. आज तो संध्याकाळी शरण येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
-
मशिदीवरील अनधिकृत भोग्यांवरील कारवाई
मुंबई पोलिसांनी मशिदीवरील अनधिकृत भोग्यांवरील कारवाई मध्ये 80% मशिदीच्या भोग्यांवर कारवाई सुरू आहे. मुंबईतल्या 30 हून अधिक पोलीस स्टेशन परिसरात अशा प्रकाराचे अनधिकृत भोंगे खाली उतरवण्यात आले आहेत, अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. मुलुंड ते घाटकोपर हे आता जवळजवळ 100% भोंगे मुक्त झाले आहे, असे ते म्हणाले.
-
चिमुकलीला बसला विजेचा धक्का
वाशिम जिल्ह्यात महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा फटका एका मुलीच्या जीवावर बेतला असता. मात्र, वेळीच प्रसंगावधान राखल्यामुळे चिमुकलीचा जीव वाचण्याचा प्रकार वाशिमच्या अनसिंग इथं समोर आला आहे. विद्युत खांबाच्या तणावाला हात लावताच एका सात वर्षीय चिमुकलीला विजेचा धक्का बसला, शॉक लागताच मुलीचा किंचाळण्याचा आवाज आल्याने परिसरातील महिला जमा झाल्या तितक्यात त्या मुलीची आई लगेच धावत तिच्या जवळ गेली,काही क्षणांत मुलीला लगेच बाजूला केल्यामुळे चिमुकलीचा जीव वाचला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद आहे. वाशिम जिल्ह्यात वीज वितरणच्या कारभार अनेक ठिकाणी ढेपाळल्यामुळे मागील काही दिवसात विद्युत खंडित राहत असल्याच्या घटनेत वाढ झाली आहे.
-
मनसे युतीसाठी नात्याची जोड देणार
मनसे युतीसाठी दिलसे भूमिका घेणार असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले. त्याचवेळी मनसे युतीसाठी नात्याची जोड देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
-
जळगावात महापालिकेने अतिक्रमण हटवले
जळगावात महापालिकेने कोर्ट ते महर्षी दधिची चौकापर्यंत रस्त्यावरचे 30 अतिक्रमण हटवले. ३० कच्च्या अतिक्रमणांवर मनपाच्या पथकाने हातोडा चालवला तर १० भाजीला विक्रेत्यांकडून प्रत्येकी ५०० रूपयांचा दंड वसूल केला. जळगाव शहरातील रस्त्यांचा कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेतली आहे. फुले मार्केटसमोर अतिक्रमण हटवत असताना विक्रेत्यांनी पथकांशी वाद घातला
-
राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष बदला
रोहिणी खडसे यांनी राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष बदलण्याची मागणी केली आहे. त्यांनी याविषयीचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. महिला आयोगाला अध्यक्षपदी स्वातंत्र्य व्यक्ती नेमण्याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्याकडे मागणी केली आहे.
-
जळगावात अतिक्रमण हटवले
जळगावात महापालिकेने कोर्ट ते महर्षी दधिची चौकापर्यंत रस्त्यावरचे 30 अतिक्रमणे हटवली आहे. मनपाच्या पथकाने या अतिक्रमणावर हातोडा चालवत कारवाई केली. यावेळी फुले मार्केटसमोर अतिक्रमण हटवत असताना विक्रेत्यांनी पथकांशी वाद घातला होता.
-
छगन भुजबळ यांना मिळाला सातपुडा बंगला
मंत्रिपदाची नुकतीच शपथ घेतलेल्या छगन भुजबळ यांना सातपुडा बंगला मिळाला आहे. धनंजय मुंडें यांच्या खात्यानंतर त्यांचे दालन आणि आता त्यांचा बंगला देखील छगन भुजबळांना यांना मिळाला आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे सातपुडा बंगला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे खाते दालन आणि आता बंगला देखील धनंजय मुंडे यांना देण्यात आला आहे.
-
शहीद जवान गायकर यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
शहीद जवान संदीप गायकर यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वीर जवानास शेवटची मानवंदना देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. जम्मू-काश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढताना गायकर यांना विरमरण आले होते.
-
डॉ. श्याम मुखर्जी उड्डाणपूल महिनाभर बंद
परळी डॉ. श्याम मुखर्जी उड्डाणपूल 26 मे 30 जूनपर्यंत कामासाठी बंद राहणार आहे. परळी शहरातील रेल्वे पटरीवर बांधण्यात आलेल्या डॉ. श्याम मुखर्जी उड्डाणपूल कामाच्या दुरुस्तीसाठी तब्बल एक महिना बंद असणार आहे.
-
मध्य रेल्वेचा उद्या मेगाब्लॉक
मध्य रेल्वे आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर पंधरा मिनिटे लोकल सेवा उशिराने सुरू राहतील तर ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सेवा सहा तास बंद राहणार आहे. विविध अभियांत्रिकी व देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
-
पैशाच्या हव्यासापोटी त्यांनी संगनमताने माझ्या वैष्णवीचा बळी घेतला – वैष्णवीच्या वडिलांना अश्रू अनावर
हगवणे कुटुंब आर्थिक विवंचनेत असल्याने पैशाच्या हव्यासापोटी त्यांनी संगनमताने माझ्या वैष्णवीचा बळी घेतला, असा आरोप वैष्णवीच्या वडीलांनी केला आहे. निलेश चव्हाण हा गुंड प्रवृत्तीचा माणूस असल्याचेही ते म्हणाले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला हवा असलेला सरकारी वकील देण्याचे आश्वासन दिलं आहे.सरकार आणि पोलिस प्रशासन आमच्या सोबत आहे. आम्हाला योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
-
सिंधुदुर्ग- कणकवली आचरा मालवण राज्य मार्गावरील पर्यायी रस्ता गेला वाहून..
सिंधुदुर्ग मध्ये गेले चार दिवसापासून मुसळधार पडलेल्या पावसाने आज कुठेतरी थोडीशी उसंत घेतली पण अनेक नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली.
कणकवली आचरा मालवण राज्य मार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. वरवडे येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ब्रिजच्या कामासाठी पर्यायी वाहतूक या राज्य मार्गावरून सुरू करण्यात आली होती. मात्र हा पर्यायी रस्ता वाहून गेल्यामुळे वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे.
-
राज्यात कोरोनाचे नवे 45 रुग्ण सापडले
राज्यात कोरोनाचे नवे 45 रुग्ण आढळले आहेत, एकट्या मुंबईमध्ये काल सर्वाधिक, 35 रुग्ण सापडले. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या आता 185 वर पोहोचली आहे.
-
निलेश चव्हाणच्या घरी रात्री पोलिसांनी टाकला छापा, लॅपटॉप केला जप्त
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण -निलेश चव्हाणच्या घरी रात्री पोलिसांनी छापेमारी केली असून त्याचा लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे.
वैष्णवी हगवण्याच्या नातेवाईक कस्पटे यांना धमकवण्यासाठी वापरलेली बंदूक जप्त करण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली, मात्र ती बंदूक सापडलेली नाहीये.
-
साताऱ्यात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस, यवतेश्वर घाटात दरड कोसळली
साताऱ्यात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे यवतेश्वर घाटात दरड कोसळली असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. घाटात सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. दरड हटवून वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Published On - May 24,2025 9:03 AM





