AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आकाशतीर काय आहे? पाकिस्तानच्या मिसाइल, ड्रोन उद्ध्वस्त करणाऱ्या आयरन डोमची खासियत काय?

पाकिस्तानच्या 13 लक्ष्यांवर भारताच्या अचूक हल्ल्याने जगभरातील तज्ज्ञांना आश्चर्यचकित केले आहे. 9 आणि 10 मे रोजी पाकिस्तानने केलेल्या ड्रोन आणि मिसाइल हल्ल्यांना स्वदेशी आकाश प्रणालीने यशस्वीपणे रोखले. ही स्वायत्त प्रणाली वास्तविक वेळेत लक्ष्य ओळखते आणि नष्ट करते, पाकिस्तानी रक्षण प्रणालीला अपयशी ठरवते.

आकाशतीर काय आहे? पाकिस्तानच्या मिसाइल, ड्रोन उद्ध्वस्त करणाऱ्या आयरन डोमची खासियत काय?
India AkashteerImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 16, 2025 | 4:30 PM
Share

भारताने पाकिस्तानच्या 8 ठिकाणांसहीत 13 लक्ष्यांना अचूकपणे भेदलं. पाकिस्तानचे सर्व डावपेच उलटे पडले. हे कसं झालं? या प्रश्नाने जगभरातील तज्ज्ञांना घेरलं आहे. 9 आणि 10 मे रोजी रात्री जेव्हा पाकिस्तानने भारतीय सैन्य आणि नागरिकांवर मिसाइल आणि ड्रोनचा घातक हमला केला. त्यावेळी त्यांना आकाशतीरचं मोठं आव्हान मिळालं. आकाशतीर भारतासाठी अभेद्य भिंत बनून राहिला. भारतीयांचं संरक्षण केलं.

या आकाशतीरने पाकिस्तानच्या सर्व हवाई ड्रोन, मिसाइल आणि इतर मायक्रो यूएव्ही आणि बाकीच्या सैन्य शस्त्रांना रोखण्याचं काम केलं. त्यांना भारताच्या हवाईपट्टीत घुसू दिलं नाही. आकाशतीर पूर्णपणे स्वदेशी प्रोडक्ट आहे. भारताची आत्मनिर्भरतेची क्षमता यातून दिसते. आकाशतीरच्या तुलनेत पाकिस्तानच्या डिफेन्स रिस्पॉन्समध्ये HQ-9 आणि HQ-16 होते. भारतीय हत्यारांचा वेळेत शोध घेण्यात आणि त्यांना रोखण्यात पाकिस्तानचे डिफेन्स रिस्पॉन्स अपयशी ठरले. त्यामुळेच पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं.

रिअल टाईम टार्गेटमुळे नुकसान

आकाशतीर ऑटोनोमस डिफेन्स सिस्टिमने वास्तविक वेळेत टार्गेटला पूर्णपणे नेस्तनाबूत केलं. ही सिस्टिम ड्रोन युद्धात सामील झाली. आकाशतीर कंट्रोल रूम, रडार आणि डिफेन्सला एक कॉमन, रिअल टाइमची एअर पिक्चर देते. त्यामुळे समन्वित एअर डिफेन्स ऑपरेशन शक्य होतं. हे शत्रूंचे विमाने, ड्रोन आणि मिसाइलचा शोध घेण्यास, ट्रॅकिंग करणे आणि त्यांना निशाणा बनवण्यासाठी स्वचलित रित्या डिझाइन करण्यात आलेली सिस्टिम आहे. त्या तमाम रडार सिस्टिम, सेन्सर आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीला एकाच ऑपरेशनल फ्रेमवर्कमध्ये इंटीग्रेट करतात. आकाशतीर अनेक सोर्सपासून डेटा एकत्र करतो, त्याला प्रोसेस करतो आणि ऑटोमेटिड, रिअल टाइम एंगेजमेंटची परवानगी देतो. आकाशतीर व्यापक C4ISR (कमांड, कंट्रोल, कम्युनिकेशन्स, कॉम्प्यूटर, इंटेलिजन्स, सर्व्हिलान्स आणि टोही) फ्रेमवर्कचा भाग आहे. इतर सिस्टिमसोबत तो कोऑर्डिनेशनचं काम करतो.

India Akashteer

India Akashteer

पाकिस्तानला जबर घाव

वायु संरक्षणासाठीचा पारंपरिक मॉडेल हा ग्राउंड-बेस्ड रडार, मानवी देखरेखीखालील प्रणाली आणि कमांड चेनद्वारे ट्रिगर होणाऱ्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र बॅटऱ्यांवर खूपच अवलंबून असतो. आकाशतीर हे मॉडेल मोडीत काढतो. हे तंत्रज्ञान युद्धक्षेत्रात नीच पातळीवरील हवाई क्षेत्राची निगराणी करण्याची आणि ग्राउंड-बेस्ड रडार एअर डिफेन्स वेपन सिस्टमचा प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्याची परवानगी देते. आकाशतीर आपल्या सामरिक धोरणात एक नवे पर्व जोडतो, जे आतंकवादी धोक्यांप्रती केवळ बचावात्मक नाही तर सक्रिय प्रतिसाद देणाऱ्या दृष्टिकोनाकडे वळण्याचे संकेत देतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले होते की, भारताला पाकिस्तान अण्वस्त्राच्या नावाखाली ब्लॅकमेल करू शकत नाही, आणि जर गरज भासली, तर आम्ही त्यांच्या भूमीत घुसून दहशतवादाच्या मुळावर घाव घालू. आपल्या लष्करी साधनांमध्ये आकाशतीरची उपस्थिती हा विश्वास अधिक दृढ करते की, ही प्रणाली दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानच्या हवाई संरक्षण क्षमतेला खोल जखम देऊ शकते.

आकाशतीर नेण्याजोगं कुठेही

जगभरातील तज्ज्ञ आता आकाशतीरला “युद्धनीतीत आमूलाग्र बदल” असे संबोधत आहेत. यामुळे भारत पूर्णपणे ऑटोमेटेड आणि इंटीग्रेटेड AD C&R (Air Defence Command & Reporting) क्षमता असलेल्या देशांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. एका वाक्यात सांगायचं झालं तर, आकाशतीरने सिद्ध केलं आहे की, ही प्रणाली जगात उपलब्ध असलेल्या कोणत्याही प्रणालीपेक्षा जलद पाहते, निर्णय घेते आणि कारवाई करते. ही प्रणाली वाहनाधारित असल्यामुळे तिला कुठेही हलवता येते आणि युद्धाच्या वेळी वापरणे सुलभ असते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.