AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई हल्ल्याशी जोडलं गेलं होतं आलिया भट्टच्या भावाचं नाव; 7 वेळा झालीये अटक

अभिनेता आणि फिटनेस ट्रेनर राहुल भट्ट नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील वादग्रस्त काळाविषयी भाष्य केलंय. या मुलाखतीत त्याने सात वेळा अटक झाल्याचीही कबुली दिली आहे. पण त्याला कधीही दोषी ठरवण्यात आलं नाही, असं त्याने सांगितलंय.

| Updated on: Apr 30, 2025 | 7:02 PM
Share
दिग्दर्शक महेश भट्ट यांचा मुलगा आणि अभिनेत्री आलिया भट्टचा सावत्र भाऊ राहुल भट्ट सध्या चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राहुलने काही वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. त्याची ही मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

1 / 7
याच मुलाखतीत राहुल भट्टने मुंबईत झालेल्या 26/11 च्या हल्ल्याशी त्याचं नाव जोडल्याप्रकरणी आणि आपली प्रतिमा मलिन झाल्याप्रकरणीही भाष्य केलंय. राहुलने या घटनेला त्याच्या आयुष्यातील सर्वांत वाईट काळ आणि ट्रॉमा म्हटलंय.

2 / 7
राहुल भट्ट 2009 मध्ये चर्चेत आला होता, जेव्हा त्याच्याबद्दल म्हटलं गेलं होतं की त्याने नकळत डेविड हेडलशी मैत्री केली. 2008 मध्ये मुंबईत झालेल्या हल्ल्यातील आरोपींपैकी एक डेविड होता.

3 / 7
'हिंदी रश'ला दिलेल्या मुलाखतीत राहुलने सांगितलं की याप्रकरणामुळे केवळ त्याची प्रतिमा मलिन झाली नाही तर त्याने स्वत:चं अस्तित्त्वही गमावलं होतं. इतकंच नव्हे तर सात वेळा अटक झाल्याचाही खुलासा राहुलने या मुलाखतीत केला.

4 / 7
"मी जरी माझ्या भावनिक संघर्षाला दाखवत नसलो तरी माझ्यावर त्या गोष्टींचा खूप परिणाम झाला आहे. मी सर्वात जास्त सहन केलंय. माझ्या ओळखीवर, अस्तित्वावर चिखलफेक झाली. माझ्या चारित्र्यावर लांछन लागले. कशासाठी? मी काहीच केलं नव्हतं. जर मी काही चुकीचं केलं असेन तर माझ्यात इतकी हिंमत आहे की मी माझा गुन्हा कबुल करेन", असं तो म्हणाला.

5 / 7
"माझ्यात गोष्टींना सामोरं जायची हिंमत होती. परंतु मी काहीच चुकीचं केलं नव्हतं. तरीसुद्धा मला खूप काही सहन करावं लागलं होतं. आजसुद्धा मला सगळं आठवतंय. दु:ख या  गोष्टीचं होतं जेव्हा लोक तुम्हाला गद्दार म्हणतात आणि तुम्ही काहीच चुकीचं केलेलं नसतं. तुम्ही लोकांवर विश्वास ठेवणं बंद करता", अशा शब्दांत तो व्यक्त झाला.

6 / 7
राहुलने हेसुद्धा स्पष्ट केलं की तपास यंत्रणांनी त्याला कधीच गुन्हेगार मानलं नव्हतं. तो सुरुवातीपासूनच त्या प्रकरणात फक्त साक्षीदार होता. परंतु मीडिया ट्रायलमुळे मला हे सर्व सहन करावं लागलं, असं त्याने सांगितलं.

7 / 7
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.