महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाली आहे. या दगडफेकीत अनिल देशमुख जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
1 / 7
अनिल देशमुख यांचे चिरंजीव हे काटोल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आहेत. त्यांची शेवटची सांगता सभा आटोपून अनिल देशमुख आपल्या घरी काटोलला परतत असताना अज्ञात व्यक्तीने देशमुखांच्या गाडीवर दगड फेकला.
2 / 7
अनिल देशमुख यांच्यावर काटोल जलालखेडा मार्गावर बेलफाट्याजवळ अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली.
3 / 7
या हल्ल्यात अनिल देशमुख यांच्या गाडीचा काच फुटला आणि थेट अनिल देशमुखांच्या डोक्याला लागला. या दगडफेकीत देशमुख जखमी झाल्याची माहिती आहे.
4 / 7
. त्यांच्यावर काटोल येथील रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे.
5 / 7
अनिल देशमुख यांचा हल्ल्यानतंरचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. या व्हिडीओत अनिल देशमुख गाडीत जखमी अवस्थेत दिसत आहेत.
6 / 7
त्यांचं डोकं फुटल्याने, डोक्यातून रक्त येत असल्याने अनिल देशमुखांच्या डोक्याला रुमाल गुंडाळलेला बघायला मिळाला.