AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | औरंगाबादचे ऐतिहासिक दरवाजे नवरंगांत उजळले, 400 वर्षांपूर्वीच्या गेटचे सुशोभिकरण, स्मार्ट सिटी हेरिटेज संवर्धन प्रकल्पाचा उपक्रम

1901 ते 1906 दरम्यान बांधलेल्या शाहगंज क्लॉक टॉवरचेही नूतनीकरण करण्यात आले आणि त्याचे घड्याळही कार्यान्वित करण्यात आले. आता मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ.चौधरी यांच्या निर्देशानुसार रोषणाईच्या कामाची चाचणी घेण्यात आली असून ऐतिहासिक दरवाजा पैकी 6 दरवाजांवर आणि क्लॉक टॉवरवर कायमस्वरूपी बसवण्यात आले आहेत.

| Edited By: | Updated on: Aug 25, 2022 | 1:10 PM
Share
औरंगाबादच्या इतिहासात प्रथमच औरंगाबाद स्मार्ट सिटीने आपल्या हेरिटेज संवर्धन प्रकल्पाचा एक भाग म्हणून शहरातील 6 ऐतिहासिक दरवाजे आणि शहागंज क्लॉक टॉवरवर कायमस्वरूपी दिवे बसवले आहेत. या प्रकल्पात ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन आणि सुशोभीकरणाचा समावेश होता.

1 / 8
ऐतिहासिक दरवाज्यांची रोषणाई केवळ शहराच्या सौंदर्यातच भर घालत नाही तर शहराचे पर्यटन मूल्य आणि नागरिकांमध्ये शहरातल्या वारसाबद्दल अभिमान वाढवण्याचा उद्देश आहे.

2 / 8
औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त व प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद स्मार्ट सिटी हेरिटेज संवर्धन प्रकल्पांतर्गत शहरातील हेरिटेज वास्तूंवर रोषणाई करत आहे.

3 / 8
औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (ए एस सी डी सी एल) वारसा संवर्धन प्रकल्पांतर्गत पैठण गेट, रोशन गेट, कटकट गेट, खिजरी गेट, काला गेट, तटबंदी भिंत सह नौबत गेट, जाफर गेट, बारापुल्ला गेट मेहमूद गेट आणि रंगीन गेट असे 10 ऐतिहासिक दरवाजे आणि निजामकालीन शाहगंज क्लॉक टॉवरचा जीर्णोद्धार आणि सुशोभीकरण करण्यात आले.

4 / 8
गेटच्या जीर्णोद्धाराचे काम अंतर्गत हेरिटेज कॉन्झर्व्हेशनिस्ट आणि वास्तुविशारद स्नेहा बक्षी यांनी इंटेकशी सल्लामसलत करून केले. प्रकल्पाचा एक भाग म्हणून 4 शतके जुन्या वास्तू, झाडझुडूप, अतिक्रमणांपासून मुक्त करण्यात आल्या आणि शहराच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि नागरिकांमधील शहरातील वारशासाठी अभिमान वाटण्यासाठी संवर्धन करण्यात आले आहेत असे बक्षी म्हणाले.

5 / 8
1901 ते 1906 दरम्यान बांधलेल्या शाहगंज क्लॉक टॉवरचेही नूतनीकरण करण्यात आले आणि त्याचे घड्याळही कार्यान्वित करण्यात आले. आता मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ.चौधरी यांच्या निर्देशानुसार रोषणाईच्या कामाची चाचणी घेण्यात आली असून ऐतिहासिक दरवाजा पैकी 6 दरवाजांवर आणि क्लॉक टॉवरवर कायमस्वरूपी बसवण्यात आले आहेत.

1901 ते 1906 दरम्यान बांधलेल्या शाहगंज क्लॉक टॉवरचेही नूतनीकरण करण्यात आले आणि त्याचे घड्याळही कार्यान्वित करण्यात आले. आता मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ.चौधरी यांच्या निर्देशानुसार रोषणाईच्या कामाची चाचणी घेण्यात आली असून ऐतिहासिक दरवाजा पैकी 6 दरवाजांवर आणि क्लॉक टॉवरवर कायमस्वरूपी बसवण्यात आले आहेत.

6 / 8
इतिहासात असे घडले आहे की ज्या दरवाज्यांमुळे शहराला "सिटी ऑफ गेट्स" अशी ओळख आहे, त्या दरवाजांवर कायमस्वरूपी रोषणाई करण्यात आली आहेत. जयपूर स्थित एजन्सी गीयर्स ला वास्तूंची रोषणाई करण्यासाठी निविदा प्रक्रियेद्वारे नेमण्यात आले. ही एजन्सी यापूर्वी ग्वालियर स्मार्ट सिटी आणि इतर शहरांमध्येही कार्यरत आहे.

7 / 8
6 ऐतिहासिक दरवाजे आणि शाहगंज क्लॉक टॉवरवर रोषणाई पूर्ण झाली आहे. "लाइटिंग कॉन्ट्रॅक्टमध्ये 1 वर्षाची वॉरंटी आणि 4 वर्षांची देखभाल समाविष्ट आहे," बक्षी म्हणाल्या. नागरिकांनी दिवाबत्ती सुरक्षित राहावी यासाठी जबाबदार राहण्याचे आवाहन आयुक्त व प्रशासकांनी केले आहे. दिवे किंवा हेरिटेज वास्तूंचे नुकसान करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्तांनी बजावले आहे.

8 / 8
Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा