AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हेमा मालिनी, अक्षय कुमार ते पवन कल्याण.. राम मंदिराच्या निर्माणासाठी कोणी दिले पैसे तर कोणी दान केली वीट

या मंदिराच्या निर्माणासाठी सर्वसामान्य लोकांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी आपलं योगदान दिलं आहे. यामध्ये अक्षय कुमारपासून हेमा मालिनीपर्यंत अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. काहींनी विट दान केली आहे तर काहींनी पैसे दिले आहेत. कोणत्या सेलिब्रिटीने राम मंदिराच्या निर्माणासाठी काय दान केलं, ते जाणून घेऊयात..

| Updated on: Jan 18, 2024 | 10:49 AM
Share
अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची देशभरातील जनतेला उत्सुकता आहे. विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींना या सोहळ्याचं खास आमंत्रण देण्यात आलं आहे. बुधवारपासून काही सेलिब्रिटी अयोध्येत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. येत्या 22 जानेवारी रोजी राम मंदिरात राम ललाच्या प्राणप्रतिष्ठेचा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे.

1 / 9
हेमा मालिनी- अभिनेत्री हेमा मालिनी यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी विशिष्ट रक्कम दान केली आहे. ही रक्कम किती आहे, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. त्यासोबतच त्यांनी लोकांनाही मंदिरासाठी दान करण्याचं आवाहन केलं आहे.

2 / 9
मनोज जोशी- अभिनेते मनोज जोशी यांनी एका व्हिडीओमार्फत  सांगितलं आहे की राम मंदिरासाठी त्यांनी गुप्तदान केलं आहे. त्यांनीसुद्धा लोकांना दान करण्याचं आवाहन केलं आहे.

3 / 9
अक्षय कुमार- राम मंदिराच्या निर्माणासाठी अक्षय कुमारनेही मोठी रक्कम दान केली आहे. याबद्दलची माहिती त्याने स्वत:च सोशल मीडियाद्वार दिली होती. या सेलिब्रिटींनी आपापल्या परीने मंदिरासाठी दान केलं आहे.

4 / 9
गुरमीत चौधरी- अभिनेता गुरमीत चौधरीने 'रामायण' या मालिकेत प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारली होती. त्यानेसुद्धा आता राम मंदिरासाठी दान केलं आहे. मंदिराच्या निर्माणात आपलाही खारीचा वाटा असावा, म्हणून त्याने ही रक्कम दान केली आहे.

5 / 9
प्रणिता सुभाष- बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री प्रणिता सुभाषने एक लाख रुपये दान केले आहेत. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत तिने याबद्दलची माहिती दिली होती.

6 / 9
मुकेश खन्ना- 'शक्तीमान' फेम मुकेश खन्ना यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी 1,11, 111 रुपये दान केले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी लोकांनाही छोटी रक्कम का असेना, दान करण्याचं आवाहन केलं आहे.

7 / 9
पवन कल्याण- साऊथ सुपरस्टार पवन कल्याणने राम मंदिरासाठी 30 लाख रुपये दान केले आहेत.

8 / 9
अनुपम खेर- अभिनेते अनुपम खेर यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये त्यांनी राम मंदिराची झलक दाखवली होती. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी मंदिराला एक वीट भेट म्हणून दिली होती. या पोस्टमध्ये त्यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.

9 / 9
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.