AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेवणापूर्वी की जेवणानंतर; आंबा खाण्याची योग्य वेळ कोणती? चुकीच्या वेळी खाल्लात तर नुकसान पक्कं

आंबा जेवणापूर्वी खावा की जेवणानंतर? तज्ज्ञांच्या मते चुकीच्या वेळी आंबा खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढून आरोग्याचे नुकसान होऊ शकते. आंबा खाण्याचे योग्य नियम, वेळ आणि होणारे परिणाम याबद्दल सविस्तर माहिती येथे वाचा.

| Updated on: Apr 30, 2026 | 12:54 PM
Share
उन्हाळा आणि आंबा यांचे एक अतूट नाते आहे. रसाळ आणि गोड आंब्याची चव लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच भुरळ घालते. आंब्याला फळांचा राजा असे म्हटले जाते. कारण तो पोषक तत्वांचा खजिना आहे.

1 / 8
मात्र, आंबा केव्हा खावा? जेवणाआधी की जेवणानंतर? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. आंबा केवळ आवडतो म्हणून तो कधीही खाणे आरोग्यासाठी महाग पडू शकते. त्यामुळे आंबा खाण्याची योग्य वेळ काय हे जाणून घेणे गरजेचे आहे.

2 / 8
जर तुम्हाला आंब्याचे पूर्ण पोषण मिळवायचे असेल आणि रक्तातील साखरही नियंत्रित ठेवायची असेल, तर आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या वेळेनुसार आंबा खाणं फायदेशीर ठरु शकते.

3 / 8
जेवणापूर्वी ३० ते ६० मिनिटे आधी आंबा खाणे सर्वात फायदेशीर ठरते. यामुळे शरीराला आंब्यातील फायबर आणि पोषक तत्वे चांगल्या प्रकारे शोषून घेता येतात. जर तुम्हाला जेवणानंतर आंबा खायचा असेल, तर जेवण आणि आंबा यामध्ये किमान दीड ते दोन तासांचे अंतर ठेवावे. यामुळे पचनसंस्थेवर ताण येत नाही.

4 / 8
सकाळची नाश्त्याच्या वेळी किंवा दुपारच्या जेवणाआधी आंबा खाणे कधीही उत्तम असते. कारण दिवसा आपण सक्रिय असतो आणि त्यातील कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. बऱ्याच भारतीय घरांमध्ये जेवणासोबत किंवा जेवण झाल्यावर डेझर्ट म्हणून आंबा खाण्याची पद्धत आहे. पण हे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

5 / 8
आंब्यामध्ये नैसर्गिक साखर आणि कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. जेव्हा आपण संपूर्ण जेवण करतो, तेव्हा शरीरातील ग्लुकोजची पातळी आधीच वाढलेली असते. त्यातवरून आंबा खाल्ल्यास रक्तातील साखर अचानक वाढते.

6 / 8
ज्यांना मधुमेह किंवा इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास आहे, त्यांनी जेवणानंतर आंबा खाणे पूर्णपणे टाळावे. यामुळे शुगर लेव्हल अनियंत्रित होऊ शकते. जेवणानंतर आंबा खाल्ल्याने शरीराला अतिरिक्त कॅलरीज मिळतात, ज्या साठून राहिल्याने वजन वाढण्यास मदत होते.

7 / 8
जेवण आणि आंबा दोन्ही एकत्र पचवताना पचनसंस्थेवर ताण येतो. आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्याची चूक करू नका. यामुळे पोटाचे विकार किंवा ॲसिडिटी होऊ शकते. (टीप: ही माहिती सामान्य संदर्भांवर आधारित आहे. कोणत्याही आरोग्यविषयक समस्येसाठी किंवा आहार बदलासाठी तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्यावा.)

8 / 8
Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल