दरवर्षी थंडीच्या मोसमात येथे आंतरराष्ट्रीय चेरी ब्लॉसम फेस्टिव्हलचे आयोजन होत असते, या फेस्टिव्हलमध्ये जगभरातील पर्यटक सहभागी होतात.
1/6

कोरोनाकाळात सध्या अनलॉकची नांदी झाली आहे. बऱ्याच पर्यटनास्थळांवर पर्यटकांची वर्दळ सुरू झाली आहे. एकीकडे बॉलिवूडकर मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत. तर, दुसरीकडे सामान्य पर्यटकांना शिलाँगचा ‘चेरी ब्लॉसम’ खुणावतोय.
2/6

थंडीचा मोसम सुरू झाल्यापासून शिलाँगमध्ये ‘चेरी ब्लॉसम’ बहरू लागला आहे. संपूर्ण शहरांत गुलाबी फुलांची आरास तयार झाली आहे. सोशल मीडियावर सध्या या गुलाबी वातावरणाचे फोटो व्हायरल होत आहेत.
3/6

अनेक पर्यटक आणि स्थानिकांनी या परिसराचे फोटो शोषल मीडियावर पोस्ट केले आहेत. ‘आता जपानला कशाला जा, इथेच आनंद घ्या’, असे म्हणत पर्यटकांनी शिलाँगकडे कूच करण्यास सुरुवात केली आहे.
4/6

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेघालय सरकारने यंदाचा आंतरराष्ट्रीय चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल रद्द केला आहे.
5/6

दरवर्षी थंडीच्या मोसमात येथे आंतरराष्ट्रीय चेरी ब्लॉसम फेस्टिव्हलचे आयोजन होत असते, या फेस्टिव्हलमध्ये जगभरातील पर्यटक सहभागी होतात.
6/6

चेरी ब्लॉसमसह जपानचे पारंपारिक खाद्यपदार्थ या काळात चेरी ब्लॉसम फेस्टिव्हलमध्ये चाखायला मिळतात.