AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीचा ‘प्राजक्तप्रभा’ काव्यसंग्रह रसिकांच्या भेटीला, चाहत्यांसाठी सोशल मीडियावरुन खास झलक

अभिनेत्री, नृत्यांगना, सूत्रसंचालक अशा विविध माध्यमांमधून प्राजक्ताने कायमच तिच्या कलाकृतीचा सुगंध सर्वत्र दरवळवला. आता ती एका नवीन प्रवासासाठी सज्ज झाली आहे. (Actress Prajakta Mali's 'Prajakta Prabha' collection of poems for fans, glimpse on social media)

| Edited By: | Updated on: Jul 22, 2021 | 10:25 AM
Share
प्राजक्ताचे नाव काढताच समोर येतात ती मंद सुगंधाची, मन प्रफुल्लित करणारी मोहक फुले. जुलै महिन्यात ही फुले बहरून येतात आणि त्याचा सुगंध सर्वत्र दरवळू लागतो. अशाच प्राजक्तला साजेसे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्राजक्ता माळी (Prajakta Mali).

1 / 7
अभिनेत्री, नृत्यांगना, सूत्रसंचालक अशा विविध माध्यमांमधून तिने कायमच तिच्या कलाकृतीचा सुगंध सर्वत्र दरवळवला. आता प्राजक्ता एका नवीन प्रवासासाठी सज्ज झाली आहे.

2 / 7
ग्रंथाली प्रकाशित ‘प्राजक्तप्रभा’ काव्यसंग्रहाच्या माध्यमातून प्राजक्ता एक संवेदनशील कवयित्री म्हणून आपल्या भेटीला आली आहे.

3 / 7
या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ साहित्यिक, कवी, गीतकार श्री.प्रवीण दवणे यांच्या हस्ते झाले. या वेळी अध्यक्षस्थानी ‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर होते.

4 / 7
तर, प्रमुख पाहुणे म्हणून अमृता खानविलकर, पुष्कर श्रोत्री आणि दिग्दर्शक अभिजित पानसे उपस्थित होते. या व्यतिरिक्त प्राजक्ताचे नातेवाईक आणि सिनेसृष्टीतील मित्रपरिवारही तिला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होता.

5 / 7
‘प्राजक्तप्रभा’बाबत ज्येष्ठ साहित्यिक, कवी प्रवीण दवणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, ते म्हणाले, ”प्राजक्ताला आपण एक उत्कृष्ट अभिनेत्री, नृत्यांगना म्हणून ओळखतोच. ‘प्राजक्तप्रभा’च्या माध्यमातून ती एक कवयित्री म्हणून आपल्या समोर आली आहे. प्राजक्ताला कलाकारासोबतच कवयित्री का व्हावेसे वाटले याचे उत्तर ‘प्राजक्तप्रभा’मध्ये दडले आहे. तिचे हळवेपण, संवेदनशीलता या काव्यसंग्रहातून स्पष्ट जाणवते. या झगमगत्या जगापलीकडेही कलावंतांना मन असते, भावना असतात. या भावनांना प्राजक्ताने काव्यस्वरूपात आपल्या समोर आणले आहे. प्राजक्ताच्या या नवीन प्रवासासाठी तिला मनःपूर्वक शुभेच्छा. पारिजातकाच्या फ़ुलाप्रमाणेच ‘प्राजक्तप्रभा’चा सुगंधही रसिकांच्या मनात कायम दरवळत राहील.”

6 / 7
आपल्या या नवीन प्रवासाबद्दल प्राजक्ता माळी सांगते, ”कधी कुठे छापून याव्यात अथवा सोशल मीडियावर पोस्ट कराव्यात यासाठी नाही तर मी माझ्यासाठी कविता लिहीत होते. माझा काव्यसंग्रह येईल, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. योगायोगाने हे सर्व जुळून येत आहे. त्यामुळे हा तुमच्याप्रमाणेच मलाही हा एक सुखद धक्का आहे आणि म्हणूनच विशेष आनंदही आहे.

7 / 7
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.