AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tu Tevha Tashi: संदीप खरेंची मुलगी रुमानी म्हणतेय, “मनोरंजनक्षेत्राशी संबंधित पालक असतील तर..”

झी मराठी वाहिनीवर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली 'तू तेव्हा तशी' (Tu Tevha Tashi) ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखादेखील प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात.

| Updated on: Apr 25, 2022 | 12:34 PM
Share
झी मराठी वाहिनीवर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली 'तू तेव्हा तशी' ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखादेखील प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात. या मालिकेतील एक व्यक्तिरेखा जी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय ती म्हणजे अनामिकाची मुलगी राधा. राधाची व्यक्तिरेखा कवी संदीप खरे यांची मुलगी रुमानी खरे साकारतेय.

1 / 5
या भूमिकेसाठी निवड कशी झाली हे सांगताना ती म्हणाली, "'तू तेव्हा तशी' या मालिकेत राधा या भूमिकेसाठी कुठल्याही कलाकाराची निवड झाली नसल्याचं मला कळलं. ऑडिशन सुरु आहे हे कळताच मी या भूमिकेसाठी ऑडिशन दिलं आणि त्यानंतर माझं सिलेक्शन झालं आणि माझा राधा म्हणून या मालिकेतील प्रवासाला सुरुवात झाली."

2 / 5
"माझी ही पहिलीच टीव्ही मालिकेतील भूमिका आहे. ती पण राधासारखी बोल्ड आणि बिनधास्त भूमिका माझ्या वाट्याला आली याचा मला आनंद आहे. राधा सध्याच्या टीनेजर्सचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळे मला ती साकारताना जास्त जवळची वाटते," असं ती पुढे म्हणाली.

3 / 5
अभिनयाची गोडी कशी लागली याबद्दल सांगताना रुमानी म्हणाली, "अभिनयाची गोडी मला आधीपासूनच होती आणि म्हणूनच एसपी कॉलेजमध्ये शिकताना मी एकांकिका आणि लघुपटांमध्ये सहभागी व्हायला सुरुवात केली. मालिकेची निर्मिती संस्था, दिग्दर्शक आणि अनुभवी सहकलाकार यांच्याकडून खूप शिकायला मिळतंय."

4 / 5
"लोकांशी कसं जुळवून घ्यावं, मीडियाला कसं सामोरं जावं, काम निवडताना काय विचार करावा हे सगळं करताना मी बाबांना लहानपणापासून बघत आलेय. मनोरंजन क्षेत्राशी संबंधित पालक असतील तर त्या क्षेत्राची करिअर म्हणून निवड केली की नक्कीच मदत होते. या क्षेत्रातील समस्या, कामाची आणि उत्पन्नाची अनिश्चितता, कधी-कधी काही प्रोजेक्ट्स अर्धवट गुंडाळणं या सगळ्याला सामोरं कसं जायचं याचे धडे तुमच्या घरातच मिळतात. आई-वडील कलाकार असतील तर त्यांचे अनुभव, संपर्क वापरून होणारे उपयोग आणि गैरफायदे यात एक पुसटशी रेष आहे. ती तुम्हाला ओळखता यायला हवी," असं रुमानीने सांगितलं.

5 / 5
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.