Sidharth Shukla Funeral: दु:खाचा डोंगर कोसळलेली आई, शुद्ध हरपलेली शहनाज… सिद्धार्थच्या अंत्ययात्रेचे फोटो पाहून तुम्हीही हेलावून जाल

आता सिद्धार्थच्या मृत्यूमुळे प्रत्येक जण दु:खी आहे. सिद्धार्थ शुक्ला त्याची आई रीता शुक्ला यांच्या खूप जवळ होता. त्याला प्रत्येक क्षणी आईच्या जवळ राहायचं होतं. मात्र आता तो आईला एकटा सोडून निघून गेलाय.(Sidharth Shukla Funeral; celebrities, Shehnaaz Gill and his parents )

1/9
छोट्या पडद्यावरील अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) वर्षानुवर्षे त्याच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत होता. त्याने गुरुवारी, 2 सप्टेंबर रोजी या जगाचा निरोप घेतलाय. त्याच्या मृत्यूमागे हृदयविकाराचा झटका असल्याचं सांगितलं जातंय. आता सिद्धार्थच्या मृत्यूमुळे प्रत्येक जण दु:खी आहे.

2/9
सिद्धार्थ शुक्ला त्याची आई रीता शुक्ला यांच्या खूप जवळ होता. त्याला प्रत्येक क्षणी आईच्या जवळ राहायचं होतं. मात्र आता तो आईला एकटा सोडून निघून गेलाय. सिद्धार्थला दोन मोठ्या बहिणीसुद्धा आहेत.

3/9
अभिनेत्री आणि बिग बॉस 13 ची स्पर्धक शहनाज गिल देखील सिद्धार्थ शुक्लाच्या अंत्यविधीला पोहोचली.

4/9
सिद्धार्थच्या जाण्यानं शहनाज गिल प्रचंड दु:खी झाली आहे. ती ठीक नाही, ती पूर्णपणे तुटलेली आहे.

5/9
शहनाज गिल हा धक्का सहन करू शकलेली नाही. शहनाज गिल प्रचंड रडताना दिसली. शहनाज गिल आणि सिद्धार्थ बाँड खूप खास होता.

6/9
सिद्धार्थचा मृतदेह मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये होता. गुरुवारी त्याचं शवविच्छेदन करण्यात आलं. शुक्रवारी त्याचा मृतदेह रुग्णवाहिकेतून ओशिवारा येथील स्मशानभूमीत नेण्यात आला, जिथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

7/9
असीम रियाज, अली गोनी, अर्जुन बिजलानी सिद्धार्थच्या अंतिम संस्कारांसाठी ओशिवरा स्मशानभूमीत पोहोचले होते. सिद्धार्थचे चाहते ओशिवरा स्मशानभूमीत जमले होते.

8/9
सिद्धार्थने 2014 मध्ये ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ चित्रपटातही काम केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत वरूण धवन आणि आलिया भट्ट होते. सिद्धार्थ शुक्ला ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये सहाय्यक भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात वरूण धवन आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसले होते. ही बातमी ऐकून वरुण धवन सिद्धार्थ शुक्लाच्या घरी गेला होता. वरुण व्यतिरिक्त राजकुमार राव, असीम रियाज, आरती सिंह, रश्मी देसाई, जयभानुशाली असे सगळे स्टार्स अभिनेत्याच्या घरी पोहोचले होते.

9/9
पोलिसांच्या मते, सिद्धार्थ बुधवार संध्याकाळपर्यंत ठीक होता आणि रात्री 3-4 वाजता अभिनेत्याला थोडे अस्वस्थ वाटू लागले. त्याने छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्याने थंड पाणी मागितले आणि झोपी गेला. त्यानंतर पुन्हा सकाळी त्याने छातीत दुखण्याची तक्रार केली आणि पाणी मागितले. पाणी पिताना तो अचानक बेशुद्ध झाला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला कूपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. जेथे दाखल करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI