Photo Gallery : नुकसानीची अवकाळी, काढणीला आलेली पीके भुईसपाट, रात्रीतूनच झालं होत्याचं नव्हतं..!
लासलगाव :पोषक वातावरण, मुबलक पाणी आणि शेतकऱ्यांनी केलेला पीक पध्दतीमध्ये बदल यामुळे शिवार कसा बहरत होता. यंदा खरिपात नुकसान झालं तरी रब्बीत त्याची कसर भरुन निघणार असंच काहीसं चित्र सबंध राज्यात होतं. उत्पादन वाढीची स्वप्नही शेतकऱ्यांना पडू लागली होती. मात्र, अवकाळी पावसाची नजर लागली आणि एका रात्रीत सर्वकाही होत्याचं नव्हतं झालं. नाशिकसह सबंध उत्तर महाराष्ट्रात पावसाची अवकृपा सुरुच आहे. अवकाळी ही काही घटकापूरती असते यंदा मात्र भर उन्हाळ्यात पावसाळ्याची अनुभती येत आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला परिसरात झालेल्या पावसामुळे कांदा गहू, मका सह इतर पीक यात जमीनदोस्त झाले असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
शिल्पा शेट्टी हिच्या फिटनेस पुढे तरुणी देखील फेल, फोटो पाहून म्हणाल...
भुईमूगच्या शेंगा आरोग्यास होणारे 6 फायदे घ्या जाणून
विराटला सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी
Ravi Shastri : रवी शास्त्री पुन्हा हेड कोच होणार?
'दे दे प्यार दे 2'चा आता ओटीटीवर धुमाकूळ; कधी अन् कुठे पाहू शकता?
भाग्यश्री लिमयेनं केली छत्रपती संभाजीनगरची सफर
