PHOTO | उभं राहून सही, गंभीर वातावरण, धनंजय मुंडेंच्या जनता दरबारातील 5 एक्स्क्लुझिव्ह फोटो

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज नेहमी प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात जनता दरबारात उपस्थित दर्शवली होती.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:46 PM, 14 Jan 2021
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज नेहमी प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात जनता दरबारास उपस्थित दर्शवली होती.
या जनता दरबारात उपस्थित राहून, जनतेच्या भेटी घेऊन धनंजय मुंडे यांनी जनसामन्यांचे प्रश्न मार्गी लावले.
धनंजय मुंडे यांनी आज सकाळपासूनच त्यांच्या सरकारी निवासस्थान चित्रकूट येथे सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांच्याही भेटी घेतल्या. तसेच यानंतर त्यांनी दुपारी जनता दरबार घेतला.
अनेक आरोपांचे सत्र सुरु असताना, गंभीर वातावरणात देखील धनंजय मुंडे यांनी जनसामान्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
जनता दरबारात धनंजय मुंडे यांच्या चेहऱ्यावरील तणाव स्पष्टपणे जाणवत होता. ते या तणावातच आपलं कार्यालयीन काम करत होते.