डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन भूमी, महाडमधील स्मारकाची केली एकनाथ शिंदेंनी स्वच्छता

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील सामाजिक क्रांतीचे प्रतीक असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या क्रांतिभूमीवरील स्मारकाची स्वच्छता केली.

1/5
रायगड, महाड : महाडमधील महास्वच्छता अभियानाच्या दुसऱ्या दिवशी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील सामाजिक क्रांतीचे प्रतीक असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या क्रांतिभूमीवरील स्मारकाची स्वच्छता केली. त्यासोबतच महाड शहरातील मध्यभागी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसराची स्वच्छता करून अनोखा सामाजिक संदेश दिला.

2/5
महाडमध्ये आलेल्या पुराचा फटका संपूर्ण शहराला बसला. यात घरं, निवासी संकुले, व्यापारी बाजारपेठ सगळ्यांचे अतोनात नुकसान झाले. शहर स्वच्छतेसाठी 2 कोटी रुपयांचा निधी शिंदे यांनी मंजूर केला आहे. तसेच ठाणे, नवी मुंबई, पनवेल या महानगरपालिकांचे 450 कर्मचारी आणि मशिनरी आणून त्यांनी या शहराच्या महास्वच्छता अभियानाला सुरुवात केली आहे. काल दिवसभर महाडमध्ये फिरून स्वतः आघाडीवर राहून स्वच्छतेला सुरुवात केल्यानंतर आज पुन्हा एकदा मैदानात उतरून शिंदे यांनी स्वच्छता अभियानाचा आढावा घेतला.

3/5
त्यासोबतच महाडमधील दस्तुरी चौकात असलेल्या क्रांतीभूमीला भेट देऊन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची पाहणी केली. या क्रांतिभूमीवरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन करून सामाजिक समतेचे रणशिंग फुंकले होते. या पवित्र भूमीवरदेखील पुरामुळे चिखल साचला होता. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेऊन चिखलात जाऊन स्मारक तसेच परिसराची स्वच्छता केली. याशिवाय शहर स्वच्छ करण्यासाठी आलेल्या काही स्वयंसेवकांना हाताशी धरून स्मारक परिसरातील चिखल, गाळ काढून पुतळ्यापर्यंत जाण्याच्या मार्गावर खडी टाकून रस्ता तयार करण्याचे निर्देश दिले.

4/5
त्यानंतर शिंदे यांनी महाड शहराच्या मध्यभागी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पाहणी केली. महाड शहरातील पुरामुळे या स्मारक परिसरात चिखल झाला होता. त्यामुळे शिंदे यांनी या स्मारकाचीदेखील स्वच्छता केली.

5/5
लोकांच्या घरातील चिखल, गाळ काढण्यासोबतच शहरातील स्मारके, मंदिरे हीदेखील आपल्या अस्मितेची प्रतीके आहेत. त्यांची स्वच्छता होणे गरजेचे आहे. याच भावनेतून आपण शहराचा मानबिंदू असलेल्या या दोन्ही स्थळांची स्वच्छता केल्याचे यावेळी शिंदे यांनी सांगितले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI