तब्बल 50 लिटरपर्यंत पेट्रोल-डिझेल फ्री मिळू शकतं, पण कसं? खास टिप्स

यातील महत्त्वाचा पर्याय म्हणजे क्रेडिट कार्ड. क्रेडिक कार्डवरील योजनांमुळे वर्षाला जवळपास 50 लिटरचं पेट्रोल-डिझेल तुम्हाला मोफत मिळू शकतं.

1/6
Petrol and diesel price petro rates cross 100 rupees benchmark in Hyderabad after Mumbai
पेट्रोल-डिझेल दरवाढ
2/6
इंडियन ऑईल HDFC क्रेडिट कार्ड : या क्रेडिट कार्डसाठी तुम्हाला 500 रुपये जास्त फी द्यावी लागेल. जर तुम्ही वर्षाला 50 हजारपेक्षा जास्त पेट्रोल-डिझेल खरेदी करत असाल तर या कार्डच्या रिन्यूवल मेंबरशीप चार्जेसमधून सूट मिळते. यावर फायनान्स चार्ज 43.2 टक्के लागेल. पहिल्या 90 दिवसात 20 हजारपेक्षा जास्त खर्च केल्यास रिन्यूवल मेंबरशीपमधून सूट मिळेल.
3/6
इंडियन ऑईल अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड : या कार्डची जॉयनिंग फी 500 रुपये आहे. शिवाय वार्षिक नूतनीकरण फी म्हणजेच रिन्यूवल चार्जेस 500 रुपये असेल. 50 हजार रुपयांपेक्षा जास्त खर्चावर सूट मिळेल. यावरील फायनान्स चार्ज 49.36 % आहे. कार्ड जारी होण्यापूर्वी 30 दिवसांच्या आत 100 टक्के कॅशबॅकची सुविधा आहे. कॅशबॅकची मर्यादा 250 रुपयांपर्यंत आहे.
4/6
BPCL SBI कार्ड : या कार्डवर जॉयनिंग फी 1499 रुपये आहे. त्याची रिन्यूवल फी सुद्धा तीतकीच आहे. वर्षाला 2 लाखांच्या इंधनाच्या खर्चावर रिन्यूवल फी मधून सूट मिळते. फायनान्स चार्ज 40.2 टक्के आहेत. वार्षिक फीच्या पेमेंटवर 6 हजार रिवॉर्ड बोनस पॉईंट्स मिळतील. याची किंमत जवळपास 1500 रुपये असेल.
5/6
इंडियन ऑईल सिटी बँक क्रेडिट कार्ड : या कार्डची जॉयनिंग फी 1 हजार रुपये आहे. यावरुन वार्षिक 30 हजारपेक्षा जास्त इंधन खरेदी केल्यास, वार्षिक फी मधून सूट मिळेल. यावर फायनान्स चार्ज 45 टक्के आहे. कार्ड जारी झाल्यानंतर पहिल्या 30 दिवसात त्याचा वापर केल्यास आणखी 250 टर्बो पॉईंट्सचा फायदा मिळेल.
6/6
ICICI-HPCL प्लॅटिनम क्रेडिट कार्ड : या कार्डची जॉयनिंग फी 199 रुपये आहे. पहिल्या वर्षी कोणतीही वार्षीक फी नाही. मात्र दुसऱ्या वर्षापासून 200 रुपये भरावे लागतील. पेट्रोल किंवा डिझेलवर वार्षिक 50 हजार रुपये खर्च केले तर वार्षिक फीमधून सूट मिळेल. या कार्डवर फायनान्स चार्ज 40.8 टक्के असेल.