AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO: औरंगाबादेत ढगफुटीने हाहाकार, रात्रीतून पावसाचे तांडव, घरात- रस्त्यांवर पाणीच पाणी, ग्रामीण भागात पिकंही वाहून गेली

| Edited By: | Updated on: Sep 08, 2021 | 5:34 PM
Share
मंगळवारी रात्री झालेल्या पावसाने औरंगाबाद शहरातील जालना रोडवर झालेल्या पाणी वाहून जाण्याच्या उपाययोजनांचे पितळ उघड पाडले. दै. लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार या रोडवरील साचणारे पाणी वाहून नेण्यासाठी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने 13 कोटींहून अधिक खर्च करून साइड ड्रेनची उपाययोजना केली होती. मात्र त्यातून पाणी वाहून न गेल्याने काल संपूर्ण रोडवर पाणी तुंबले. रस्त्यावरील पाण्याने वाहनांमध्ये पाणी शिरून वाहने बंद पडली आणि वाहतूक कित्येक तास खोळंबली.

1 / 7
 मुसळधार पावसाने सातारा देवळाईकरांचे आतोनात हाल झाले. देवळाई चौक, अयप्पामंदिर चौक, रेणुकामाता कमान, छत्रपती नगर कमान इत्यादी ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. जवळपास दोन-अडीच तास वाहने रस्त्यावर थांबून होती.

2 / 7
सातारा परिसरातील बीड बायपास रोडवरचे रात्रीचे हे दृश्य. अनेक ठिकाणू मूळ ओढ्याचे, नाल्याचे स्रोत अडवले गेल्यामुळे नैसर्गिकरित्या वाहून जाणारे पाणी येथे अडवले गेले आहे. त्यामुळे सातारा-देवळाई परिसरात अशी पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांचे म्हणणे आहे. आधीच रस्तेदुरुस्तीच्या कामांना लागणाऱ्या विलंबाने त्रस्त असलेल्या या परिसरातील नागरिकांना कालच्या पावसाने घराबाहेर कसे पडायचे, हाच प्रश्न सतावत आहे.

3 / 7
शहरातील उस्मानपुरा भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने प्रचंड हाल झाले. रात्रीतून सुरु झालेल्या पावसाच्या तांडवामुळे अनेक घरातील नागरिकांना डोळ्यादेखत घरातील वस्तू, साहित्य पाण्यात गेल्याचे चित्र पहावे लागले. अनेक घरात तीन-चार फुट उंचीपर्यंत पाणी साठल्याने नागरिकांवर मोठे संकट कोसळले आहे.

4 / 7
पाचोड खुर्द परिसरात ढगफुटीने प्रचंड हाहाकार माजवला. गावकऱ्यांच्या अंगणात, घरात पाणी शिरल्याने अनेक संसार विस्कळीत झाले. घरातील भांडी आणि संसारोपयोगी वस्तू तशाच ठेवून  नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी कमी पाणी असलेल्या भागात अशा रितीने एकवटले होते. मध्यरात्रीतून पावसाचा जोर आणखी वाढेल या भीतीने नागरिकांची गाळण उडाली.

5 / 7
संग्रहित छायाचित्र.

संग्रहित छायाचित्र.

6 / 7
पिशोर येथील शफेपुर भागातील खडकी नदीला आलेल्या महापुरामुळे नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते. अनेकांच्या घरातील संसार उपयोगी साहित्य वाहून गेले.तर परिसरातील नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. शासनाकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची ग्रामस्थ मागणी करीत आहे.

7 / 7
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.