AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पायलटच्या कॉकपिटमधून कसं दिसतं नरेंद्र मोदी स्टेडियम ?

वर्ल्ड कपचा अंतिम सामना सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून टीम इंडियाला फलंदाजी करायला दिली. इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर 241 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. मात्र, हा सामना होण्यापूर्वी प्रेक्षकांसाठी रंगारंग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रसिद्ध गायक प्रितम यांच्या संगीत रजनीपासून ते एयरो शो पर्यंतचं आयोजन करण्यात आलं होतं. 15 मिनिटं चालेला हा शो अद्भूत, अद्वितीय असाच होता. नरेंद्र मोदी स्टेडियममधील प्रत्येकजण हा शो पाहताना हरखून गेला होता. याशिवाय पायलटच्या कॉकपिटमधून तर मोदी स्टेडियम अप्रतिम दिसत होता. त्याचे हे काही फोटो...

| Updated on: Nov 19, 2023 | 7:43 PM
Share
अहमदाबादेत वर्ल्डकपचा अंतिम सामना सुरू आहे. हा सामना पाहण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 1 लाखाहून अधिक लोक आले आहेत. यावेळी प्रेक्षकांसाठी खास रंगारंग कार्यक्रम ठेवण्यात आला होता. हवाई दलाने नाणेफेकीनंतर नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एअरो शो केला. 15 मिनिट हा शो चालला. डोळ्याचं पारणं फिटावे असा हा शो होता.

1 / 6
हवाई दलाच्या सूर्य किरण एरोबेटीक टीमने हा एरो शो केला. त्यामुळे आकाशात अद्भूत दृश्य पाहायला मिळालं. जेव्हा हा शो सुरू झाला तेव्हा आकाशातील नजारा पाहून अनेकांचे डोळे दिपून गेले. पहिल्यांदाच अशा प्रकारचा शो पाहून प्रत्येकजण रोमांचित झाला होता.

2 / 6
विशेष म्हणजे मोदी स्टेडियममध्ये बसून प्रत्येकाला हा शो पाहता येत होता. शो सुरू होताच स्टेडियममध्ये एकच जल्लोष झाला. त्यामुळे संपूर्ण परिसर प्रेक्षकांच्या आवाजाने दणाणून गेला. या शोची असंख्य फोटो काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

3 / 6
या शोसाठी हवाई दालची नऊ विमाने वापरण्यात आली. स्टेडियममध्ये तिरंगा ध्वज डौलाने फडकत होता. या शोचा आवाज इतका प्रचंड होता की आवाजामुळे सर्वच दंग झाले. सर्वांचं लक्ष फक्त आणि फक्त आकाशाकडे होतं.

या शोसाठी हवाई दालची नऊ विमाने वापरण्यात आली. स्टेडियममध्ये तिरंगा ध्वज डौलाने फडकत होता. या शोचा आवाज इतका प्रचंड होता की आवाजामुळे सर्वच दंग झाले. सर्वांचं लक्ष फक्त आणि फक्त आकाशाकडे होतं.

4 / 6
पायलटच्या कॉकपीटमधून नरेंद्र मोदी स्टेडियम अद्भूत दिसत आहे. या स्टेडियमवरून नजरच हटत नाही इतकं विशाल हे स्टेडियम दिसत आहे. वायुदलाची ही सुर्यकिरण नावाची विमाने प्रजासत्ताक दिनाला दरवर्षी राजधानीत प्रात्यक्षिकं सादर करीत असतात.

5 / 6
भारतीय प्रेक्षकांना आपल्या खेळाडूंकडून अनेक अपेक्षा आहेत. वर्ल्डकपचा अंतिम सामना भारतच जिंकेल अशी आशा सर्वांना आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा टीव्हीवर खिळल्या आहेत. भारताने ऑस्ट्रेलियासमोर कमी धावसंख्येचं आव्हान दिलं असलं तरी भारतीय गोलंदाजी हा सामना खेचून आणू शकते असा विश्वास भारतीयांना आहे.

6 / 6
Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती