PHOTO | हृतिकला ज्या चित्रपटानंतर आले 30 हजार प्रपोजल, त्याच चित्रपटाला करिनाने नाकारलं होतं!

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आज 47 वा वाढदिवस साजरा करीत आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:24 PM, 10 Jan 2021
1/6
Hrithik Roshan
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आज 47 वा वाढदिवस साजरा करीत आहे. दिग्दर्शक राकेश रोशन आणि पिंकी यांच्या घरी 10 जानेवारी 1974 रोजी जन्मलेल्या हृतिकनेही आपल्या वडिलांप्रमाणेच चित्रपटसृष्टीत करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि बाल कलाकार म्हणून त्याची सुरुवात केली. यानंतर त्याने हळूहळू सहाय्यक दिग्दर्शक म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आणि कहो ना प्यार है या चित्रपटात हृतिक प्रथमच मुख्य भूमिकेत दिसला.
2/6
Hrithik Roshan 2
‘कहो ना प्यार है’ चित्रपटात अभिनेत्रीच्या मुख्य भुमिकेत राकेश यांना करीना कपूरला कास्ट करायचे होते. मात्र, काही कारणास्तव हे शक्य होऊ शकले नाही. राकेश यांनी मित्र अमित यांच्या मुलीला कास्ट केले.
3/6
Hrithik Roshan 4
‘कहो ना प्यार है’ चित्रपटाच्या नंतर हृतिकला मुलींचे जबरदस्त फॅन फॉलोव्हिंग होते, दुसरीकडे हा चित्रपट करिना करीना कपूर नाकारला होता. त्यामुळे या चित्रपटात अमीषा पटेलला संधी मिळाली होती.
4/6
Hrithik Roshan 3
शूटिंग सुरू झाल्यावर करीना कपूरने चित्रपट करण्यास नकार दिला होता. याबद्दल करिनाने एका मुलाखतीत सांगितले होते.
5/6
Hrithik Roshan 1
करिना मुलाखतीत म्हणाली होती की, त्यावेळी आम्ही कोणीही फायद्या किंवा तोटा याबद्दल फारसा विचार केला होता असे मला वाटत नाही मला असे वाटते की, त्यावेळी मी केले ते उचित होते.
6/6
Hrithik Roshan 5
हृतिक रोशनबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच दीपिका पादुकोणसोबत फायटर या चित्रपटात दिसू शकतो. चित्रपटाविषयी अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.