'आयपीएल 2024'मध्ये विजय मिळवल्यानंतर शाहरुख खानच्या 'कोलकाता नाइट रायडर्स' टीममधील ऑल राऊंडर खेळाडू वेंकटेश अय्यर याने रविवारी लग्नगाठ बांधली. या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
1 / 5
वेंकटेश अय्यरने श्रुती रघुनाथनशी लग्न केलं आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात या दोघांनी साखरपुडा केला होता. त्यानंतर आता रविवारी कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत ते लग्नबंधनात अडकले.
2 / 5
वेंकटेशची पत्नी श्रुती रघुनाथन ही बेंगळुरू इथल्या लाइफस्टाइल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मर्चेंडाइज प्लॅनर म्हणून कामाला आहे. धोरणात्मक नियोजन आणि इन्व्हेंटरी व्यवस्थापनाचं काम ती करते.
3 / 5
श्रुतीने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) मधून फॅशन मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. NIFT ही अत्यंत प्रतिष्ठित संस्था आहे.
4 / 5
वेंटकेश आणि श्रुतीचा लग्नसोहळा दाक्षिणात्य परंपरेनुसार पार पडला. लग्न समारंभातील या दोघांच्या पोशाखाने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं. वेंकटेश आणि श्रुतीचे फोटो व्हायरल होताच त्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.