….. तर मुख्यमंत्रिपदानंतर उद्धव आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकत्र येणार!

दक्षिण मुंबईत पोलीस मुख्यालय समोर बाळासाहेबांचा पुतळा बसवण्यात आला असून, येत्या 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिवशी अनावरण सोहळा असणार आहे. याच कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी महपौर किशोरी पेडणेकर ‘कृष्णकुंज’वर पोहोचल्या होत्या.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:49 AM, 19 Jan 2021
1/6
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.
2/6
दक्षिण मुंबईत पोलीस मुख्यालय समोर बाळासाहेबांचा पुतळा बसवण्यात आला असून, येत्या 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिवशी अनावरण सोहळा असणार आहे.
3/6
याच कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी महपौर किशोरी पेडणेकर ‘कृष्णकुंज’वर पोहोचल्या होत्या.
4/6
या कार्यक्रमाचं निमंत्रण सर्वपक्षीय नेत्यांना दिलं जात आहे. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे अशा मोठ्या नेत्यांना स्वतः महापौर निमंत्रण देत आहेत.
5/6
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकदा एका मंचावर दिसू शकतात!
6/6
या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी महपौर किशोरी पेडणेकर यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली.