मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या परशुराम घाटातील संरक्षक भिंत कोसळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
परशुराम घाटातील एका बाजूचा भराव खाली आल्याने सध्या वाहतुकीसाठी फक्त एकच मार्गाने वाहतूक सुरु आहे.
यामुळे महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप केला जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून वारंवार परशुराम घाटामध्ये भिंत कोसळण्याच्या घटना घडत आहे.
यामुळे साधारण पाचशे मीटरपर्यंतचा परिसर धोकादायक म्हणून घोषित करण्यात आला आहे. याठिकाणी बॅरिकेट्स टाकून हा रस्ता बंद करण्यात आला आहे.
त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
मात्र या दुर्घटनेबद्दल अधिकाऱ्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
या घटनेमुळे मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.