नाशिकच्या गणेशोत्सव मिरवणूकीत नागा साधूंचे अनोखे नृत्य, शंकर भोलेनाथाचे तांडवनृत्य जणू
दहा दिवसांचा पाहुणचार केल्याने लाडक्या बाप्पाला जड अंत:करणाने आज निरोप देण्यात आला. गेले दहा दिवस गणपती बाप्पाच्या आगमना सर्वत्र चैतन्याचे वातावरण पसरलेले होते.या दहा दिवसात बाप्पाच्या पूजन आणि आरत्या आणि भजनात भक्त मंडळी गुंग होती.गणपतीच्या आगमना सर्वत्र पवित्र आणि आनंदी वातावरण झाले होते. दहा दिवसानंतर आता अनंत चतुर्दशीला पुढच्या वर्षी लवकर येण्याचा लाडका हट्ट धरत भक्ताने आता जड अंत:करणाने बाप्पाला निरोप दिला. गिरगाव, दादर अशा चौपाट्यांवर गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. मुंबईत पोलिसांनी गणेश विसर्जनाची प्रक्रिया पार पडण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता.दुसरीकडे नाशिकमध्ये गणपती बाप्पाच्या मिरवणूकीत नागा साधूंनी केलेले नृत्य देखील चर्चेत आहे.
Most Read Stories