PHOTOS : नवी मुंबईत कोव्हीड सेंटरमध्ये ग्रंथालय, कोरोना रुग्णही पुस्तकं वाचण्यात दंग

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Updated on: May 17, 2021 | 1:07 AM

कोरोना बाधितांचा कोव्हिड सेंटरमधील कालावधी तणावरहित जावा आणि त्यांना सकारात्मक जीवनाची अधिक ऊर्जा मिळावी यासाठी सिडको एक्झिबिशन कोव्हीड सेंटरमध्ये विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध करून देण्यात आलीत.

May 17, 2021 | 1:07 AM
कोरोना बाधितांचा कोव्हिड सेंटरमधील कालावधी तणावरहित जावा आणि त्यांना सकारात्मक जीवनाची अधिक ऊर्जा मिळावी यासाठी सिडको एक्झिबिशन कोव्हीड सेंटरमध्ये विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध करून देण्यात आलीत. त्यासाठी पुस्तकांचे अनोखे विश्व खुले करून देण्यात आले आहे. अशाप्रकारे कोव्हीड सेंटरमधील कोरोना बाधितांना पुस्तकांच्या स्वरुपात मानसिक बळ देणारा 'कोव्हीड सेंटरमध्ये ग्रंथालय' हा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे.

1 / 6
नवी मुंबई महानगरपालिका आणि लेट्स रीड फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोव्हीड सेंटरमध्ये ग्रंथालय' हा आगळावेगळा उपक्रम सुरू करण्यात आलाय. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी यांनी आज याठिकाणी भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत उपआयुक्त योगेश कडुस्कर, सेंटरचे नोडल अधिकारी निलेश नलावडे, सेंटरचे नियंत्रक डॉ. वसंत माने व डॉ. लोहार तसेच या अभिनव उपक्रमाची संकल्पना राबविणारे लेट्स रीड फाऊंडेशनचे वानखेडे उपस्थित होते.

2 / 6
कोव्हीड पॉझिटिव्ह रूग्ण विलगीकरणासाठी कोव्हीड सेंटरमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्याकडे बराच वेळ असतो. अशा कुटुंबापासून दूर एकटेच असलेल्या वेळेत आजाराविषयी तोच तोच विचार करून रूग्णाचे मनोबल कमी होण्याचा संभव असतो. अशावेळी त्याला माहिती, मनोरंजनपर विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध करून दिल्यास तो त्या विचारांपासून काही प्रमाणात दूर जाऊन पुस्तकांच्या जगात रमू शकतो.  यामुळे त्याच्या मनामध्ये सकारात्मक विचार निर्माण होऊन त्याची उमेद वाढू शकते.

3 / 6
याच विचारांतून 'लेट्स रीड फाऊंडेशन' या समर्पित भावनेने व्यापक वाचक चळवळ राबविणाऱ्या संस्थेच्या संकल्पनेतून नवी मुंबई महानगरपालिकेच्या सिडको एक्झिबिशन कोव्हीड सेंटरमध्ये हा अतिशय वेगळ्या स्वरूपाचा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. याठिकाणी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील उत्तम ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पुस्तकांच्या निवडीवर खूप मेहनत घेण्यात आली आहे. हलकीफुलकी मनोरंजक पुस्तके तसेच प्रेरणा देणारी चरित्रे, सकारात्मक विचार देणारे ग्रंथ अशा विविध आशयाची व नामवंत लेखकांची पुस्तके याठिकाणी आहेत.

4 / 6
आयुक्तांनी याबाबत संस्थेचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली आणि पुस्तकांच्या निवडीचे कौतुकही केले. येथील रूग्णांशी संवाद साधताना काही रूग्ण स्वत:सोबत घरून वाचण्यासाठी पुस्तके घेऊन आल्याचेही आढळले. त्यांच्याशीही आयुक्तांनी चर्चा केली. एकंदरीत या अभिनव संकल्पनेचे तेथील कोरोना बाधितांनी आनंदाने स्वागत व प्रशंसा केल्याचे दिसून आले. ही पुस्तके ठेवण्यासाठीचे शेल्फही अत्यंत आकर्षक असून एखादे झाड असावे व त्याला पानांऐवजी पुस्तके असावीत अशी रचना असणाऱ्या शेल्फला आयुक्तांनी पुस्तकाचे झाड असं संबोधलं. शेल्फची रचना पाहून एखादा न वाचणाराही उत्सुकतेने त्या शेल्फजवळ येऊन पुस्तक हातात घेईल अशा शब्दात त्यांनी शेल्फच्या डिझाईनचे कौतुक केले.

5 / 6
कोव्हिड सेंटरमध्ये दाखल असण्याच्या कालावधीत लागलेली पुस्तक वाचनाची आवड काहीजण घरी गेल्यानंतरही आवडीने जोपासतील व त्यातून एक व्यापक वाचक चळवळ उभी राहील असा विश्वास आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला. तसेच ही अभिनव संकल्पना राबविण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या लेट्स रीड फाऊंडेशच्या वाचनसंस्कृती वाढीसाठी ते करीत असलेल्या कामाची प्रशंसा करीत शुभेच्छा दिल्या. सिडको एक्झिबिशन कोव्हीड सेंटर प्रमाणेच महानगरपालिकेच्या इतरही कोव्हीड सेंटरमध्येही असा उपक्रम आगमी काळात सुरू केला जाईल असे आयुक्तांनी यावेळी सांगितले.

6 / 6

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI