AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खर्च 9 कोटी, कमाई 1400 कोटी.. हॉरर चित्रपटाचा जगभरात डंका; सर्वांवर भारी पडला युट्यूबर

एक असा हॉरर चित्रपट ज्याला एका युट्यूबरने बनवलं आहे, तो सध्या जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. एक अंकी बजेटचा आकडा असलेल्या या चित्रपटाने अकरा अंकी आकड्यामध्ये कमाई केली आहे.

| Updated on: Jun 02, 2026 | 8:34 AM
Share
अवघ्या 26 वर्षांच्या एका युट्यूबरने चित्रपट बनवला असून या चित्रपटाने तब्बल 14,00,00,00,000 रुपयांची म्हणजेच जवळपास 1400 कोटी रुपयांची कमाई केली, असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? हे खरंच घडलंय. हा चित्रपट या वर्षातील टॉप रेटेड हॉरर थ्रिलर बनला असून जगभरात त्याची छप्परफाड कमाई सुरू आहे. या चित्रपटाने हॉलिवूडसोबतच बॉलिवूडमध्येही आपली छाप सोडली आहे.

1 / 6
आयएमडीबीवर दहापैकी 8.5 अशी उत्तम रेटिंग मिळवलेल्या या चित्रपटाचं नाव 'ऑब्सेशन' (Obsession) असं आहे. 1 तास 49 मिनिटांचा हा चित्रपट या वर्षातील सर्वांत दमदार हॉरर चित्रपट असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटाच्या कमाईवरून सहज अंदाज लावला जाऊ शकतो की प्रेक्षक त्याला किती पसंत करत आहेत?

2 / 6
'ऑब्सेशन' या चित्रपटाचा दिग्दर्शक करी बार्कर असून तो एक युट्यूबर आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने पहिल्यांदाच दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. दिग्दर्शनासोबतच त्याने या चित्रपटाची कथासुद्धा लिहिली आहे. त्याचसोबत एडिटिंगची जबाबदारीसुद्धा त्यानेच सांभाळली आहे. या चित्रपटापुढे 'स्टार वॉर्स'चे चित्रपट 'द मंडलोरियन' आणि 'ग्रोगु'सुद्धा फिके पडले आहेत.

3 / 6
करी बार्कर हा प्रसिद्ध युट्यूबर आणि अभिनेता आहे. युट्यूबवर त्याचं 'दॅट्स अ बॅड आयडिया' नावाने चॅनल आहे. या चॅनलवर तो सहसा कॉमेडी व्हिडीओ पोस्ट करतो. ऑब्सेशन या चित्रपटाच्या आधी त्याने 'मिल्क अँड सीरिअल' नावाचा एक हॉरर चित्रपट बनवला होता.

4 / 6
'ऑब्सेशन' या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात तब्बल 1400 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाचं बजेट फक्त 1 मिलियन डॉलर म्हणजेच 9 कोटी रुपयांपेक्षाही कमी आहे. अवघ्या काही दिवसांत 'ऑब्सेशन'ने 150 पटींनी अधिक नफा कमावला आहे.

5 / 6
या चित्रपटाची कथा 'बियर' नावाच्या एका तरुणाची आहे. जो एका म्युझिक स्टोअरमध्ये काम करतो आणि त्याला त्याची निक्की नावाची मैत्रीण खूप आवडू लागते. एके दिवशी तो त्या म्युझिक स्टोअरमधून एक असं सुपरनॅच्युरल खेळणं खरेदी करतो, जो त्याची इच्छा पूर्ण करतो. निक्कीने त्याच्यावर प्रेम करावं, हीच त्याची इच्छा असते. हे खेळणं बियरची इच्छा तर पूर्ण करतं, मात्र त्याचे परिणाम अत्यंत भयानक असतात.

6 / 6
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?