Photo : टोमणे मारणाऱ्या गौतम गंभीरकडून इंग्लंड दौऱ्याआधी विराटची तारीफ, म्हणतो….

1/5
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला (England Tour India) सुरुवात होत आहे. एरव्ही विराटला टोमणे मारणाऱ्या गौतम गंभीरने इंग्लविरुद्धची मालिका सुरु होण्यापूर्वी विराटचं कौतुक केलं आहे.

2/5
मी विराटच्या टेस्ट आणि वन डे क्रिकेट कप्तानीविषयी कधीच प्रश्न उपस्थित केले नाहीत. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ नवा इतिहास लिहिल, असा विश्वास त्याने व्यक्त केलाय.

3/5
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत कोहली कर्णधार म्हणून पुनरागमन करेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये विराट खेळू शकला नाही कारण तो पॅरेंटल लिव्ह घेऊन भारतात आला होता.

4/5
स्टार स्पोर्ट्सच्या शो प्लॅनमध्ये कोहलीच्या कर्णधारपदाबद्दल विचारले असता गंभीर म्हणतो, मी विराटच्या कसोटी किंवा एकदिवसीय नेतृत्वाविषयी कधीच प्रश्न उपस्थित केले नाही, कोहलीमध्ये संघाला जिंकवून देण्याची तसंच संघाकडून सर्वोत्तम खेळ करुन घेण्याची क्षमता आहे, अशी स्तुतीसुमने गंभीरने उधळली.

5/5
दरम्यान, या कसोटी मालिकेत विराट कोहलीला वेस्टइंडिजचे माजी कर्णधार सर क्लाईव्ह लॉईड यांचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. कर्णधार म्हणून कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा हा विक्रम आहे. विराटला लॉईड यांना पछाडण्यासाठी अवघ्या 14 धावांची आवश्यकता आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI