Marathi News » Photo gallery » Prime Minister Narendra Modi unveils revolutionary Alluri Sitaram Raju statue; The Prime Minister also laid the foundation for Krishnabharati, a 90 year old girl
PM Narendra Modi : क्रांतिकारक अल्लुरी सीताराम राजू यांच्या पुतळयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले अनावरण ; 90 वर्षांची कन्या पासला कृष्णभारतींच्याही पडले पाया
सीताराम राजू हे माँ कालीचे उपासक होते. तीर्थयात्रेवरून परत आल्यानंतर सीताराम राजू यांनी कृष्णादेवीपेठेत आश्रम उभारून तप-साधना सुरू केली.
धनुष्यबाण घेऊन इंग्रज सैनिकांसमोर फार काळ थांबणे सोपे नव्हते. यामुळेच त्यांनी दरोडा टाकण्यास सुरुवात केली. यातून मिळालेल्या पैशातून शस्त्रे खरेदी करून पोलिस ठाण्यांवर हल्ले करू लागले. राजा मौलीचा नुकताच प्रदर्शित झालेला RRR हा चित्रपट अल्लुरी सीताराम राजू यांच्या जीवनावर आधारित आहे.
महान क्रांतिकारक अल्लुरी सीताराम राजू यांचा जन्म 4 जुलै 1897 रोजी विशाखापट्टणम जिल्ह्यातील पांडरिक गावात झाला. अल्लुरीच्या आईचे नाव सूर्यनारायणम्मा आणि वडिलांचे नाव वेक्ट्रम राजू होते. सीताराम राजू यांचे वडील लहानपणीच वारले. त्याचे पालनपोषण त्याच्या काकांनी केले. नंतर तो टुनी येथे राहायला आला.
1 / 6
सीताराम वयाच्या 18 व्या वर्षी संत झाले. 1924 मध्ये ब्रिटीशांनी गोळ्या घालून ठार मारले तेव्हा वयाच्या 27 व्या वर्षी त्यांनी मातृभूमीसाठी प्राण अर्पण केले.
पहिल्या तीर्थयात्रेत सीताराम राजू हिमालयाच्या दिशेने गेले. 1919-1920 दरम्यान, संग्रामासाठी आणि लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत करण्यासाठी भिक्षू आणि तपस्वींचे मोठे गट देशभर फिरत होते. या संधीचा फायदा घेत सीताराम राजू यांनी मुंबई, वडोदरा, बनारस, ऋषिकेश, बद्रीनाथ, आसाम, बंगाल आणि नेपाळ येथेही प्रवास केला.
2 / 6
सीताराम राजू हे माँ कालीचे उपासक होते. तीर्थयात्रेवरून परत आल्यानंतर सीताराम राजू यांनी कृष्णादेवीपेठेत आश्रम उभारून तप-साधना सुरू केली.
धनुष्यबाण घेऊन इंग्रज सैनिकांसमोर फार काळ थांबणे सोपे नव्हते. यामुळेच त्यांनी दरोडा टाकण्यास सुरुवात केली. यातून मिळालेल्या पैशातून शस्त्रे खरेदी करून पोलिस ठाण्यांवर हल्ले करू लागले. राजा मौलीचा नुकताच प्रदर्शित झालेला RRR हा चित्रपट अल्लुरी सीताराम राजू यांच्या जीवनावर आधारित आहे.
3 / 6
स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू यांच्या १२५व्या जयंती सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्र प्रदेशातील भीमावरम येथे पोहोचले होते.
4 / 6
त्यांच्या शौर्यासाठी आणि धैर्यासाठी, सीताराम यांना "मन्यानम वीरुडू" (जंगलचा नायक) ही पदवी देण्यात आली. दरवर्षी, आंध्र प्रदेश सरकार त्यांची जन्मतारीख, 4 जुलै हा राज्य उत्सव म्हणून साजरा करते.
5 / 6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यसैनिक पासला कृष्णमूर्ती यांच्या कुटुंबाचीही भेट घेतली. पंतप्रधानांनी त्यांची 90 वर्षांची कन्या पासला कृष्णभारती हिच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले. ती व्हीलचेअरवर बसली होती. त्यांनी पंतप्रधान मोदींच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वादही दिला.