भारतीय क्रिकेट संघातील स्टार फलंदाज रिंकू सिंह लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. विशेष म्हणजे त्याच्या लग्नाची तारीखही समोर आली आहे.
1 / 8
मिळालेल्या माहितीनुसार रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज येत्या 18 नोव्हेंबर 2025 रोजी लग्न करणार आहेत. वारणसी येथील आलिशान पंचतारांकीत हॉटेलमध्ये त्यांच्या लग्नाचा सोहळा पार पडणार आहे.
2 / 8
तर येत्या 8 जून रोजी या दोघांचाही साखरपुडा होईल. उत्तर प्रदेशमधील लखनौ शहरात त्यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रम होणार आहे.
3 / 8
दरम्यान रिंकू सिंह एका महिला खासदाराच्या प्रेमात कसा पडला, असे विचारले जात आहे. रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांची प्रेमकहाणी नेमकी काय आहे, याबाबत अनेकांना माहिती नाही.
4 / 8
रिंकू सिंह आणि प्रिया सरोज हे दोघेही एकमेकांना अगोदरपासूनच ओळखतात. विशेष म्हणजे त्यांचा हा एका प्रकारे प्रेमविवाहच आहे. त्यांची ही प्रेमकहाणी फारच रंजक आहे.
5 / 8
साधारण दोन वर्षांपूर्वी या दोघांची ओळख झाली होती. 2023 सालच्या आयपीएलमध्ये रिंकू सिंहने सलग पाच षटकार लगावले होते. त्याने तुफानी फलंदाजी करत एकट्याने केकेआर संघाला सामना जिंकून दिला होता. त्यानंतर रिंकू सिंह संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाला.
6 / 8
प्रिया सरोज यांच्या वडिलांचा एका माजी क्रिकेटर मित्र आहे. याच मित्राच्या माध्यमातून रिंकू सिंहची रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांची ओळख झाली. त्यांच्यात मैत्री झाली.
7 / 8
याच मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. त्यानंतर आता हे दोघेही लग्न करत आहेत.