AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयुष्यातील सर्वांत वाईट सकाळ..; मराठी अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, हृदय पिळवटून टाकणारी पोस्ट

'ठिपक्यांची रांगोळी', 'सावळ्याची जणू सावली' यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारलेला अभिनेता गुरू दिवेकरने सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. गुरूच्या बहिणीचं निधन झालं असून त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

| Updated on: Jun 22, 2026 | 4:03 PM
Share
'सावळ्याची जणू सावली' या मालिकेत भूमिका साकारलेला अभिनेता गुरू दिवेकरवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गुरूच्या आयुष्यातील अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहित त्याने चाहत्यांना याविषयीची माहिती दिली आहे.

1 / 5
गुरू दिवेकरच्या बहिणीचं निधन झालं आहे. जुईली असं त्याच्या बहिणीचं नाव असून तिच्यासोबतच्या आठवणी त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केल्या आहेत. 'माझ्या आयुष्यातील सगळ्यात वाईट सकाळ...' अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या आहेत. 18 जून रोजी गुरूच्या बहिणीचं निधन झालं.

2 / 5
या पोस्टमध्ये गुरूने लिहिलं, 'माझ्या आयुष्यातील सर्वांत वाईट सकाळ.. 18 जून 2026 ची ती सकाळ. मला फोन आला की, तुझी जुईली ताई गेली. माझी अत्यंत लाडकी बहीण जुईली - 'जुया' आम्हाला सोडून गेली. हा खूप मोठा धक्का होता. मला सुरुवातीला त्यावर विश्वासच बसत नव्हता.'

3 / 5
'मी मन धीट करून हॉस्पिटलकडे धाव घेतली. तिथे मला तिला बघायचं धाडसच होत नव्हतं. सगळ्या आठवणी माझ्या डोळ्यांसमोर दाटून येत होत्या. हे सगळं एकाच वेळी सहन करणं खूप कठीण जात होतं. माझी बहीण दिसायला जरी नाजूक असली तरी तिचं मन कणखर होतं. तिने शक्य तितका लढा दिला होता,' असं त्याने पुढे लिहिलं.

4 / 5
आयुष्य किती क्षणभंगुर असतं याची जाणीव गुरूला त्यावेळी झाली. 'एका दिवशी तुम्ही सर्वांचे लाडके असता, तर दुसऱ्याच दिवशी तुमची फक्त राख उरते. हे ऐकायला कठीण असलं तरी हेच वास्तव आहे. नियतीने आपल्यासाठी जे ठरवलंय, त्यापुढे आपण काहीच करू शकत नाही. आपण फक्त आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकतो आणि आपल्या माणसांना आनंदी ठेवू शकतो. माझी बहीण याच गोष्टींवर विश्वास ठेवायची. तिचं सुंदर हास्य, कुटुंबासाठी काहीही करायची तयारी, तिची नृत्यकला, तिचं निर्मळ मन.. या सर्व गोष्टींमुळे तिला आम्ही कायम स्मरणात ठेवू', अशा शब्दांत तो व्यक्त झाला.

5 / 5
Follow Us
आधी वाचलास आता... NCP नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, व्हायरल ऑडियो
मोठी बातमी! आधी वाचलास आता... NCP नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, व्हायरल ऑडियो क्लीपने खळबळ
आम्ही निवडणुक आयोगाची 'ती' चूक समोर आणली, अपात्रतेबाबत... सुनावणीनंतर
आम्ही निवडणुक आयोगाची 'ती' चूक समोर आणली, अपात्रतेबाबत... सुनावणीनंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर... ठाकरेंच्या वकिलांच्या दाव्याने..
एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर... वकिलांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही...
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही... शिंदे गटातील नेत्याच्या विधानाने खळबळ
आम्हाला अपात्रतेवर निर्णय द्यायचा आहे; कोर्टाच्या सुनावणीत मोठा खुलासा
मोठी बातमी! आम्हाला अपात्रतेवर निर्णय द्यायचा आहे; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत मोठा खुलासा, मात्र शिवसेना कुणाची? ह्यावर सस्पेन्स कायम
अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं
Shivsena SC Hearing | सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा मोठा दावा! अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं
मुलीला पलंगाच्या टोकाला बांधलं अन्... डार्क वेबचा वापर करून कट?
Nagpur | मुलीला पलंगाच्या टोकाला बांधलं अन्... वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लेकाचं भयनाक कृत्य
विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नाही; कोर्टात सिब्बल यांचा युक्तिवाद
Shivsena Symbol Hearing Update | विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नाही; सुप्रीम कोर्टात सिब्बल यांचा सडेतोड युक्तिवाद
विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं, मात्र... कपिल सिब्बल
विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं, मात्र... कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादाने डाव पलटणार?
सप्टेंबरमध्ये मोठा निर्णय! अभिजीत दिपकेंनी सांगितली CJP ची पुढील रणनीत
सप्टेंबरमध्ये मोठा निर्णय! अभिजीत दिपकेंनी सांगितली CJP ची पुढील रणनीती