AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील या जिल्ह्यात आढळतात 18 प्रकारच्या सापांच्या प्रजाती, किती विषारी, किती बिनविषारी? पाहा Photos

भारतीय संस्कृतीत सापांना श्रद्धा आणि भीती या दोन्ही भावनांनी पाहिले जाते. पण अनेक गैरसमजांमुळे त्यांचे संरक्षण धोक्यात येते. लेखात गोंदिया जिल्ह्यातील सापांच्या विविध प्रजाती, त्यांचे विषारीपणा आणि त्यांच्याबद्दलच्या अंधश्रद्धांचे खंडन करण्यात आले आहे.

| Updated on: Jul 29, 2025 | 2:32 PM
Share
भारतीय संस्कृतीत साप केवळ एक वन्यप्राणी नसून श्रद्धा, कुतूहल आणि भीती यांचे एक अनोखे प्रतीक आहे. नागपंचमीसारख्या अनेक सण, लोककथा आणि दंतकथा यामुळे सापांविषयी आदर निर्माण झाला असला तरी त्याचबरोबर भीती आणि अंधश्रद्धाही वाढल्या आहेत.

1 / 8
साप दिसला की तो नक्कीच जीवघेणा असतो किंवा चावला की मृत्यू निश्चितच असे गैरसमज समाजात खोलवर रुजले आहेत. मात्र, हे गैरसमज दूर करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण भारतात आढळणाऱ्या सापांच्या शेकडो प्रजातींपैकी केवळ काहीच प्रजाती विषारी आहेत.

2 / 8
बहुतांश साप हे निरुपद्रवी असून शेतातील उंदीर आणि कीटक नियंत्रित करून ते शेतीसाठी अत्यंत उपकारक ठरतात. आज नागपंचमीच्या निमित्ताने सापांविषयीच्या गैरसमजांना दूर सारून त्यांच्या संरक्षणाबद्दल जनजागृती करणे महत्त्वाचे आहे.

3 / 8
गोंदिया जिल्ह्यात सापांच्या सुमारे 18 विविध प्रजाती आढळतात. यापैकी 5 प्रजाती विषारी आहेत, 2 प्रजाती निम्नविषारी आहेत, तर उर्वरित 11 प्रजाती पूर्णपणे बिनविषारी आहेत. गोंदिया जिल्ह्यात आढळणाऱ्या विषारी सापांच्या प्रमुख प्रजातीपैकी चार साप अत्यंत विषारी मानले जातात.

4 / 8
यातील मण्यार हा साप काळसर निळसर रंगाचा असून त्याच्या शरीरावर पांढरे आडवे पट्टे असतात. याचे दात लहान असल्याने चावल्यास सुरुवातीला लक्षात येत नाही. मण्यार साप रात्रीच्या वेळी अधिक सक्रिय असतो.

5 / 8
घोणस अतिशय रागीट आणि जलद हालचाल करणारा साप असतो. याचे दात मोठे आणि लवचिक असतात. धोका जाणवल्यास हा साप कुकरसारखा आवाज करतो. याला स्थानिक भाषेत 'परड' असेही म्हटले जाते.

6 / 8
प्रसिद्ध फणा काढणारा साप म्हणून नाग ओळखला जातो. आपले संरक्षण करण्यासाठी हा साप उग्र रूप धारण करतो आणि फणा काढून उभा राहतो. तर फुरसे हा भारतातील सर्वात कमी लांबीचा विषारी साप आहे. हा सहसा दगड किंवा खडकांखाली लपलेला आढळतो.

7 / 8
याव्यतिरिक्त, दोन निम्नविषारी सापांच्या प्रजातीही गोंदिया जिल्ह्यात आढळतात. ज्यांचा दंश सहसा जीवघेणा नसतो. उर्वरित 11 प्रजाती पूर्णपणे बिनविषारी असून, त्या मानवासाठी कोणताही धोका निर्माण करत नाहीत.

8 / 8
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.