AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असंख्य वर्ल्ड रेकॉर्ड, मात्र लॉर्ड्समध्ये शतक करण्यात अपयशी, ते 6 भारतीय फलंदाज कोण?

Lords Cricket Ground Team India Test Hundred : लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये शतक करणं प्रत्येक फलंदाजाचं स्वप्न असंत. मात्र अनेक फलंदाजांना त्यांच्या कारकीर्दीत असं करणं जमलेलं नाही. यात दिग्गज माजी भारतीय फलंदाजांचाही समावेश आहे.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jul 10, 2025 | 8:09 PM
Share
लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडला क्रिकेटची पंढरी म्हंटलं जातं. या मैदानाला अनेक वर्षांचा इतिहास आहे. अनेक फलंदाजांचं या मैदानात शतक तर गोलंदाजांचं 5 विकेट्स घेण्याचं स्वप्न असतं. मात्र तसं करणं प्रत्येकाला जमतंच असं नाही. भारतासाठी 6 दिग्गज फलंदाजांनी अंसख्य वर्ल्ड रेकॉर्ड केले. मात्र त्यांना या मैदानात शतक करता आलेलं नाही. ते कोण आहेत? हे जाणून घेऊयात. (Photo Credit :  @HomeOfCricket)

1 / 6
भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांना लॉर्ड्समध्ये शतक करता आलं नाही. गावसकरांनी कसोटी कारकीर्दीत लॉर्ड्समध्ये एकूण 5 सामने खेळले आहेत. गावसकरांनी या मैदानातील 10 डावांत 340 धावा केल्या. मात्र त्यांना एकदाही शतक करता आलं नाही. गावसकरांची या मैदानात 59 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. (Photo Credit : Getty Images)

2 / 6
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचं शतकं करणाऱ्या सचिन तेंडुलकर यालाही लॉर्ड्समध्ये एका डावात 100 धावा करता आल्या नाहीत. सचिनने लॉर्डसमधील 5 सामन्यांमधील 9 डावांत 195 धावा केल्या. सचिनला या मैदानात अर्धशतकही करता आलं नाही. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

3 / 6
माजी दिग्गज विजय हजारे यांनी या मैदानातील 2 सामन्यांमधील 4 डावात एकूण 183 धावा केल्या आहेत. त्यांची या मैदानातील 69 ही सर्वोच्च धावसंख्या राहिली. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

4 / 6
भारताचे दिग्गज कर्णधार कपिल देव आणि माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण हे दोघेही या मैदानात शतक करण्यात अपयशी ठरलेत. देव यांनी या मैदानात 4 सामन्यांमधील 7 डावांत 242 धावा केल्या आहेत. देव यांचा या मैदानात 89 हायस्कोअर आहे. तर लक्ष्मणने या मैदानात खेळलेल्या 3 सामन्यांमधील 6 डावांत 237 धावा केल्या आहेत. लक्ष्मणची या मैदानातील 74 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. ( Photo Credit : AFP and Tv9 Bharatvarsh)

5 / 6
माजी दिग्गज अजित वाडेकर यांनी त्यांच्या नेतृत्वात भारताला इंग्लंडमध्ये पहिल्या कसोटी सामना जिंकून दिला होता. मात्र वाडेकर यांनाही लॉर्ड्समध्ये शतक करता आलं नाही. वाडेकर यांनी या मैदानातील 3 सामन्यांमधील 6 डावांत 187 धावा केल्या. त्यांचा लॉर्ड्समधील 87 हा हायस्कोर आहे. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

6 / 6
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?