AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओव्हल कसोटी सामन्यात नाईट वॉचमन आकाश दीपची ऐतिहासिक खेळी, नोंदवला असा विक्रम

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचवा कसोटी सामना सुरु आहे. या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताने चांगली सुरुवात केली आहे. खासकरून आकाश दीपच्या अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाला टॉनिक मिळालं आहे. यासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमाची नोंद केली आहे.

| Updated on: Aug 02, 2025 | 6:02 PM
Share
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचवा कसोटी सामना लंडनच्या ओव्हल मैदानात सुरु आहे. या सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताने चांगली सुरुवात केली आहे. भारताने तिसऱ्या दिवशीच्या लंच ब्रेकपर्यंत 3 गडी गमवून 189 धावा केल्या. भारताच्या खात्यात इंग्लंडची आघाडी वगळून 166 धावा आहेत. (Photo- BCCI Twitter)

1 / 6
आकाश दीप 2011 नंतर नाईटवॉचमन म्हणून 50 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. आकाशच्या आधी अमित मिश्राने 2011 मध्ये इंग्लंडविरुद्ध याच मैदानावर नाईटवॉचमन म्हणून 84 धावांची खेळी खेळली होती. (Photo- BCCI Twitter)

2 / 6
दुसऱ्या दिवशी इंग्लंडचे सर्व खेळाडू पहिल्या डावात 247 धावांवर बाद झाले. भारतीय संघ फलंदाजीसाठी आला तेव्हा शेवटचं सत्र सुरु होतं.  अशा स्थितीत भारताला विकेट वाचवून फलंदाजी करायची होती. केएल राहुल आणि साई सुदर्शन स्वस्तात बाद झाले. त्यामुळे आकाश दीपच्या खांद्यावर नाईट वॉचमनची जबाबदारी आली. (Photo- BCCI Twitter)

3 / 6
साई सुदर्शनची विकेट पडल्यानंतर नाईट वॉचमन म्हणून फलंदाजी करणारा आकाश दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटपर्यंत नाबाद राहिला. तिसऱ्या दिवसाच्या खेळात यशस्वी जयस्वालसोबत अर्धशतकी भागीदारी करणाऱ्या आकाशने वैयक्तिक अर्धशतकही झळकावले. (Photo- BCCI Twitter)

4 / 6
आकाश दीपने  70 चेंडूत आपले पहिले कसोटी अर्धशतक पूर्ण केले.तसेच आकाशने यशस्वी जयस्वालसोबत 107 धावांची भागीदारी केली. त्यांच्या भागीदारीमुळे भारत 170 धावांच्या पुढे गेला. अर्धशतकानंतर आकाश जास्त काळ मैदानावर टिकला नाही. 94 चेंडूत 12 चौकारांसह 66 धावा काढून बाद झाला. (Photo- BCCI Twitter)

5 / 6
आकाशने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले आहे. आतापर्यंत टीम इंडियासाठी 10 सामने खेळणाऱ्या आकाशने 150 धावा करताना 27  विकेट्स घेतल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आकाश दीपने 40 सामन्यांमध्ये 574 धावा केल्या आहेत. यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. त्याने 28 लिस्ट-ए सामन्यांमध्ये 140 धावा केल्या आहेत. (Photo- BCCI Twitter)

6 / 6
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.