AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs WI : इंग्लंडच्या बेन स्टोक्सने एकाच चेंडूत शतक, द्विशतक आणि त्रिशतक झळकावलं, काय ते वाचा

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने एक डाव आणि 114 धावांनी जिंकला. या विजयासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. तसेच दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन याला विजयी निरोप दिला आहे. दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने एकाच चेंडूत तीन विक्रमाची नोंद केली आहे. चला जाणून घेऊयात काय ते

| Updated on: Jul 12, 2024 | 8:51 PM
Share
इंग्लंड वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवला. इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीपुढे वेस्ट इंडिजच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. त्यामुळे एक डाव आणि 114 धावांनी पराभूत होण्याची नामुष्की ओढावली. आता मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

1 / 6
इंग्लंडने या विजयासह दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याला निरोप दिला आहे. गेली 21 वर्षे अँडरसन कसोटी क्रिकेट खेळत आहे आणि अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. असं असताना याच सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने एका विक्रमाची नोंद केली आहे. शतक, द्विशतक आणि त्रिशतक पूर्ण केलं आहे.

2 / 6
इंग्लंडचा कर्णधार आणि अष्टपैलू बेन स्टोक्स याने या सामन्याच्या दुसऱ्या डावात दोन गडी बाद केले. त्याने पहिल्या षटकात कर्क मॅकेन्झीला बाद केले. या विकेटसह त्याने तीन शतकांची नोंद केली आहे.

इंग्लंडचा कर्णधार आणि अष्टपैलू बेन स्टोक्स याने या सामन्याच्या दुसऱ्या डावात दोन गडी बाद केले. त्याने पहिल्या षटकात कर्क मॅकेन्झीला बाद केले. या विकेटसह त्याने तीन शतकांची नोंद केली आहे.

3 / 6
बेन स्टोक्सची ही 200 वी कसोटी विकेट आहे. तर इंग्लंडच्या भूमीवर घेतलेली 100 वी विकेट ठरली आहे. या विकेटसह बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 विकेट्सचा टप्पा गाठला आहे. म्हणजेच एक विकेटसह त्याने तीन विक्रम पूर्ण केले आहेत.

4 / 6
बेन स्टोक्स कसोटी क्रिकेटमध्ये 6 हजार धावा आणि 200 विकेट घेणारा इंग्लंडचा पहिला आणि जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे. या यादीत वेस्ट इंडिजचा गॅरी सोबर्स आणि दक्षिण अफ्रिकेचा अष्टपैलू जॅक कॅलिस यांचा समावेश आहे.

5 / 6
बेन स्टोक्स हा इंग्लंडसाठी आतापर्यंत 103 कसोटी सामने खेळला आहे. त्याने 200 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 3530 च्या सरासरीने 6320 धावा केल्या आहेत. त्यात 13 शतकांचा समावेश आहे.

बेन स्टोक्स हा इंग्लंडसाठी आतापर्यंत 103 कसोटी सामने खेळला आहे. त्याने 200 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 3530 च्या सरासरीने 6320 धावा केल्या आहेत. त्यात 13 शतकांचा समावेश आहे.

6 / 6
Follow Us
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी - सूत्र
नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर
Mumbai Heat Wave : मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर, हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी
केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट.....
Maharashtra Drought : केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट दिल्लीत पाठवणार
महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? महापालिकेच्या....
Mumbai Ritu Tawade : महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? मुंबई महापालिकेच्या प्रस्तावावरून वाद 
सोने-चांदीच्या आयातीवर तब्बल एवढे टक्के कर लागू होणार
Gold-Silver : सोने-चांदीच्या आयातीवर तब्बल एवढे टक्के कर लागू होणार; सरकारच्या निर्णयाचा नेमका अर्थ काय?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
Nana Patekar Passes Away : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
Nana Patekar Passes Away | कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या..
Shivsena Supreme Court Hearing : उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या वकिलांनी पक्षाच्या घटनेवरच उपस्थित केला सवाल, म्हणाले...
पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत...
Pune Vidhan Parishad Election : पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत चर्चा व्हायला हवी होती... प्रफुल पटेल यांचा रोख नेमका कोणाकडे?