AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : इंडिया आघाडीचे खासदार राष्ट्रपतींची भेट घेणार-सूत्र

| Updated on: Oct 09, 2026 | 8:12 AM
Share

Maharashtra News LIVE : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडीने रणशिंग फुंकलेले आहे. काल काँग्रेसने शांततापूर्ण आंदोलन केले. आज विरोधी गोटातील खासदार राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Maharashtra News LIVE : इंडिया आघाडीचे खासदार राष्ट्रपतींची भेट घेणार-सूत्र
आजच्या ठळक बातम्या, टीव्ही ९ मराठी ब्लॉग

LIVE NEWS & UPDATES

  • 09 Oct 2026 08:50 AM (IST)

    केंद्राचे दुष्काळी पथक आजपासून 2 दिवस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

    केंद्राचे दुष्काळी पथक आजपासून 2 दिवस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असेल. केंद्रीय पथकाकडून बार्शी, उत्तर सोलापूर तालुक्यात आज पाहणी होणार आहे. तर उद्या सांगोला मंगळवेढा येथे कोरड्या दुष्काळाची पाहणी केली जाणार. आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेनयन यांनी ही माहिती दिली. केंद्राच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वात पथक येणार आहे.

  • 09 Oct 2026 08:40 AM (IST)

    आजपासून तुळजाभवानी मातेचे दर्शन २२ तास सुरू

    नवरात्रोत्सवात भाविकांना सुलभ दर्शन मिळावे, यासाठी आज पासून तुळजाभवानी मातेचे दर्शन २२ तास सुरू राहणार आहे. या कालावधीत पहाटे १ वाजता मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार असून, घटस्थापनेच्या दिवशी मात्र मंदिर मध्यरात्री १२.१५ वाजता उघडण्यात येणार होणार आहे. तुळजाभवानी मातेचा वर्षातील सर्वांत मोठा उत्सव असलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवाला ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. अश्विन पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवासाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांतून लाखो भाविक तुळजापूरला येतात. भाविकांची मोठी संख्या लक्षात घेऊन मंदिर संस्थांनी हा निर्णय घेतला आहे आज पासून ते २१ऑक्टोबरदरम्यान पहाटे १ वाजता मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.

  • 09 Oct 2026 08:30 AM (IST)

    सरकारचे शिष्ट मंडळ आज विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार का?

    पुण्यातील एस एम जोशी पुलावर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसह रोहित पवार गेल्या आठ दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. गेल्या आठ दिवसांमध्ये अनेक नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलाय मात्र सरकारच्या वतीने कुणीही आंदोलनाला भेट दिली नसून अजून देखील विद्यार्थ्यांशी कोणत्याही स्वरूपाची चर्चा झालेली नाही. आज सरकारच्या वतीने शिष्टमंडळ एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी येणार का? हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.  विद्यार्थी एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत मात्र सरकारी पातळीवरून आंदोलनासंदर्भात अजून देखील कोणत्याही स्वरूपाच्या हालचाली होताना दिसत नाहीत. आम्हाला मुद्दाम त्रास दिला जातोय असा आरोप करून अलका चौकात गेलो तर उठणार नाही असा देखील इशारा रोहित पवार यांनी दिलाय..

  • 09 Oct 2026 08:20 AM (IST)

    भाजपचे बंडखोर उमेदवार अनिल सोले यांच्या भूमिकेकडे लक्ष

    नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार अनिल सोले यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. अनिल सोले हे भाजप नेत्यांपासून नॉट रीचेंबल असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपने सुधाकर कोहळे यांना अधिकृत उमेदवारी दिल्यानंतर प्रा. सोले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. सोले यांची समजूत काढण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न सुरू मात्र प्रतिसाद नाही. प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण सोले यांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते मात्र ते भेटले नाही

  • 09 Oct 2026 08:10 AM (IST)

    मुंबईत पावसाळा संपल्यानंतर पारा वाढला

    मुंबईत पावसाळा संपल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच उष्णतेचा पारा वाढला आहे. गुरूवारी सांताक्रूझ येथे कमाल तापमान 37.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. हे तापमान सामान्यपेक्षा तब्बल 4.5 अंशांनी अधिक असल्याची नोंद हवामान विभागाने केली आहे. त्यामुळे मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील काही भागांसाठी भारतीय हवामान विभागाने आज देखील उष्णतेचा ईशारा दिला आहे. मुंबईत 3 ऑक्टोबर रोजी नैऋत्य मोसमी पावसाने माघार घेतल्यानंतर तापमानात मोठी वाढ झाली आहे. गुरूवारी मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत यंदाच्या वर्षातील आतापर्यंतचे सर्वाधिक कमाल तापमान नोंदवण्यात आले बुधवारी सांताक्रूझ येथे 35.4 अंश सेल्सिअस तापमान होते

  • 09 Oct 2026 08:00 AM (IST)

    नागपूरमध्ये सीजेपी कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस

    उद्या दिल्लीत होणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील सीजेपी च्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील सीजेपीचे कार्यकर्ते अक्षय रामटेके यांना कुही पोलीस स्टेशन कडून नोटीस देण्यात आली आहे १० ऑक्टोबरला दिल्लीत होणाऱ्या सिजेपी च्या आंदोलनात सहभागी होऊ नये असे नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडी आक्रमक झालेली आहे. दिल्लीत गेल्या चार दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. काल काँग्रेसने शांततापूर्ण आंदोलनं केलं. आज विरोधी पक्षातील खासदार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्याची शक्यता आहे. दरम्यान उद्यापासून जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीने आंदोलनाची हाक दिली आहे. ज्ञानेश कुमार यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. तर उद्याच्या सीजेपीच्या आंदोलनात सहभागी न होण्याची नोटीस नागपूर पोलिसांनी यापूर्वीच्या आंदोलनकर्त्यांना दिली आहे.

पुण्यातील एस. एम. जोशी पूल परिसरात MPSC आंदोलन सुरू आहे. नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये असे न्यायालयाने मत नोंदवल्यानंतर पोलिसांनी हे ठिकाण तात्काळ खाली करण्याचे आवाहन आंदोलकांना केले आहे. तर आंदोलकांनी अद्याप हे स्थळ सोडलेले नाही. यामुळे तणाव वाढण्याची शक्यता आहे. आज दिवसभर या घडामोडींकडे राज्याचे लक्ष असणार आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाण्यातील मानपाड्याचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची 29 सप्टेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. याविरोधात आज सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

खरीप हंगाम 2026 मधील दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे केंद्रीय पथख राज्याच्या दौऱ्यावर आले आहे. कालपासून ते 11 ऑक्टोबरपर्यंत हे पथक राज्यातील विविध भागात जाणून दौरा करणार आहे. संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वात हे पथक तीन गटात राज्याची पाहणी करणार आहे. त्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश असेल. त्यानंतर लागलीच मदतीची घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे.

Published On - Oct 09,2026 7:56 AM

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
Nana Patekar Passes Away : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
Nana Patekar Passes Away | कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या..
Shivsena Supreme Court Hearing : उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या वकिलांनी पक्षाच्या घटनेवरच उपस्थित केला सवाल, म्हणाले...
पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत...
Pune Vidhan Parishad Election : पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत चर्चा व्हायला हवी होती... प्रफुल पटेल यांचा रोख नेमका कोणाकडे?
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ....
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ सोडण्याचा इशारा, नेमकं काय घडलं?
'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नानांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
Nana Patekar Passes Away : 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नाना पाटेकर यांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच