Photo : राज्यमंत्री दत्ता भरणेंची माणूसकी, अपघातग्रस्ताला धीर देत उपचारासाठी हाॅस्पिटलमध्ये पाठवण्याची व्यवस्था

Jan 13, 2021 | 8:59 PM
Akshay Adhav

|

Jan 13, 2021 | 8:59 PM

पुणे-सोलापूर हायवेवरुन पुण्याच्या दिशेने निघालेले राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांची गाडी निघाली असताना रावणगाव-मळद येथे अपघातग्रस्ताच्या मदतीला भरणे धावून गेले.

1 / 4
ईनोव्हा गाडीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी डिव्हायर तोडून भरणे मामांच्या लेनमध्ये येऊन समोर पडल्याचे पाहताच मामांनी अपघातग्रस्त गाडीकडे तात्काळ धाव घेऊन गाडीतील माणसे उपस्थितांना खाली घेण्यास सांगितले तसेच त्यांना पाणी पिण्याची व्यवस्था करून सर्वांना मानसिक आधार दिला.

2 / 4
सुदैवाने चालक बचावला असल्याचे पाहून त्याला थोडीफार ईजा झाल्याचे लक्षात येताच त्याला पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची व्यवस्था केली.

3 / 4
दत्तामामांनी अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जात त्यांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे मानसिक तसंच मायेचा आधार देऊन माणुसकीचे दर्शन घडवले. मंत्रिपदावर जाऊनही जमिनीवर पाय ठेवून सर्वसामान्य जनतेला तत्परतेने मदत करणारे मंत्री, अशा शब्दात  अपघातग्रस्तांनी समाधान व्यक्त केले.

4 / 4

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें