AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहा वर्षांनंतर सुरभी हांडे म्हाळसाच्या भूमिकेत; ‘आई तुळजाभवानी’मध्ये एण्ट्री

म्हाळसाच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरभी हांडे आता दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा त्याच भूमिकेत परतली आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील 'आई तुळजाभवानी' या मालिकेत ती म्हाळसाची भूमिका साकारणार आहे.

| Updated on: Dec 08, 2024 | 8:55 AM
Share
महाराष्ट्राची कुलस्वामिनी 'आई तुळजाभवानी' या मालिकेत आतापर्यंत देवीचे अनेक अवतार पाहायला मिळाले आहेत. देवीच्या विविध अवतारांचा हा आध्यात्मिक प्रवास प्रेक्षकांसाठी निश्वितच वेगळा ठरत आहे. अशातच आता म्हाळसा देवीच्या भूमिकेद्वारे घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री सुरभी हांडेची या मालिकेत एण्ट्री होणार आहे.

1 / 8
'आई तुळजाभवानी' मालिकेत सुरभी म्हाळसाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'आई तुळजाभवानी' ही मालिका प्रेक्षकांना दररोज रात्री 9 वाजता 'कलर्स मराठी'वर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

2 / 8
या भागामध्ये म्हाळसा देवी आई तुळजा भवानीचे नव्या प्रवासात अनोख्या पद्धतीने स्वागत करताना दिसणार आहे. तुळजा आणि म्हाळसा मिळून दुर्जनानांचा संहार कसा करतील हे बघणं उत्सुकतेचं असणार आहे.

3 / 8
म्हाळसा या पात्राच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात सुरभी हांडेने आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. आता 'आई तुळजाभवानी' या मालिकेच्या माध्यमातून सुरभी प्रेक्षकांवर छाप पाडायला सज्ज आहे.

4 / 8
चेहऱ्यावर भक्तीमय तेज, आकर्षक दागिने, पारंपारिक साडी, प्रभावशाली असं दैवी व्यक्तिमत्त्व म्हाळसाच्या रुपात पाहायला प्रेक्षक  उत्सुक आहेत.

5 / 8
'आई तुळजाभवानी' मालिकेच्या कथानकाने वेग पकडला असून असुरांपासून भक्तांचं रक्षण करण्यासाठी म्हाळसा तुळजाला पाठिंबा देताना दिसून येईल.

6 / 8
याविषयी सुरभी हांडे म्हणाली, "10 वर्षांनंतर म्हाळसा आता परत सर्वांसमोर येतेय याचा आनंद आहे. म्हाळसाला बघायला प्रेक्षकांना जसं आवडतं तसंच ते पात्र साकारायला मला आवडतं. हे पात्र माझ्यासाठी नेहमीच खास होतं. आता 'आई तुळजाभवानी' या पात्राच्या माध्यमातून मला  म्हाळसाला न्याय देण्याची एक चांगली संधी मिळाली आहे."

7 / 8
सुरभी पुढे म्हणाली, "'आई तुळजाभवानी'सह म्हाळसा जेव्हा असुरांसोबत युद्ध करते असा सीन शूट करताना मला वाटत होतं की, दोन स्त्रीशक्ती कोणासोबत तरी लढत आहेत. पूजासोबत काम करताना खूप छान वाटलं. तिचंही कौतुक वाटलं."

8 / 8
Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड

धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...