PHOTO | रनमशीन विराट कोहलीची 15 महिन्यांपासून शतकाची पाटी कोरीच

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) गेल्या काही महिन्यांपासून शतक लगावण्यात अपयशी ठरत आहे.

  • Updated On - 8:48 am, Tue, 2 March 21 Edited By: Anish Bendre
1/5
Virat Kohli, runsmachine virat, team india, virat kohli century, team india captain,
विराट कोहली. टीम इंडियाचा कर्णधार. विराट सक्रिय खेळाडूंपैकी सर्वाधिक शतक लगावणारा फलंदाज आहे. विराटच्या नावावर एकूण 71 शतकांची नोंद आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून विराट शतक लगावण्यात अपयशी ठरतोय. 15 महिन्यांपासून विराटची शतकाची पाटी कोरीच आहे. विराटने अखेरचं आंतरराष्ट्रीय शतक हे 22नोव्हेंबर 2019 मध्ये झळकावलं होतं. त्यामुळे शतक न लगावणं विराट आणि त्याच्या समर्थकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
2/5
cricket, india vs england, India vs England 2021, virat kohli, msd, Mahendra Singh Dhoni, Most Duck, Team India,
कर्णधार विराट कोहली (Indian captain Virat Kohli) इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतील पहिल्या डावात (india vs england 4th test) शून्यावर बाद झाला.
3/5
Virat Kohli, runsmachine virat, team india, virat kohli century, team india captain,
विराटला तिसऱ्यांदा शतकासाठी 233 दिवसांची वाट पाहावी लागली होती. तेव्हा कोहलीला 26 फेब्रुवारी 2014 ते 17 ऑक्टोबर 2014 पर्यंत शतक होण्यासाठी प्रतिक्षा करावी लागली होती.
4/5
Virat Kohli, runsmachine virat, team india, virat kohli century, team india captain,
कोहलीला चौथ्यांदा शतकासाठी 209 दिवसांची प्रतिक्षा करावी लागली होती. 19 फेब्रुवारी 2011 ते 16 सप्टेंबर 2011 यादरम्यान विराट सेंच्युरी लगावण्यात अपयशी ठरला होता.
5/5
Virat Kohli, runsmachine virat, team india, virat kohli century, team india captain,
रनमशीन विराटला शतक लगावण्यासाठी सर्वात कमी अर्थात 183 दिवस वाट पाहवी लागली होती. विराटच्या बॅटने 20 जानेवारी 2016 ते 21 जुलै 2016 पर्यंत एकही शतकी खेळी झाली नव्हती.