AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवसभर राबल्यानंतर ‘त्या’ महिलांची अंधाऱ्या रात्री पाण्यासाठी वणवण; आर्थिक राजधानीच्या हाकेच्या अंतरावरचं भयानक वास्तव

राज्यात कडक उन्हाळा सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी धरणांचा पाणीसाठा कमी झाला आहे. तर काही ठिकाणी विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या पाणी टंचाईमुळे सर्वाधिक त्रास महिलांना होत आहे. ग्रामीण भागातील या महिला दिवसा राबून रात्री पाण्यासाठी पायपीट करताना दिसत आहेत.

| Updated on: Apr 12, 2025 | 12:09 PM
Share
राज्यात प्रचंड उकाडा वाढला आहे. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या सुरू झाली आहे. राज्यातील अनेक भागात पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत आहे. दिवसभर शेतात मोलमजुरी करायची आणि रात्री पाण्यासाठी वणवण करायची असं भयाण चित्र राज्यभर दिसत आहे.

1 / 6
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात तर पाण्याची भीषण स्थिती दिसत आहे. पाणीच मिळत नसल्याने ग्रामस्थांना रात्री पाणी भरण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. वाडा तालुक्यातील अवघ्या 40 घरांची वस्ती असलेल्या गावठाण पाड्यात पाणीच नाहीये, त्यामुळे या महिलांना दिवसा मोलमजुरी करून रात्री पाण्याच्या शोधात पाड्याच्या बाहेर पडावं लागत आहे.

2 / 6
टीव्ही9ची टीम गावठाण पाड्यात रात्री 2 वाजता पोहोचली. त्यावेळी अख्ख्या गावात काळाकुट्ट अंधार होता. पण पाड्यापासून दूर हाकेच्या अंतरावर महिलांचा आवाज येत होता. भांड्यांचाही आवाज येत होता. त्यामुळे आमची टीम त्या दिशने गेली. तेव्हा बॅटरीच्या उजेडात काही महिला विहिरीवर पाणी भरताना दिसल्या.

3 / 6
या महिला रात्रभर पाण्यासाठी जाग्या राहतात. प्रत्येक महिलेला दोन हांडे मिळतात. याच पाण्यावर आमचा पूर्ण दिवसाचा दिनक्रम करावा सुरू होतो, असं या महिला सांगतात. रात्रीपासून ते सकाळपर्यंत महिलांची पाण्यासाठी धडपड सुरु राहते. दिवसा प्रचंड ऊन असल्याने पाणी मिळत नाही. विहिरीने तळ गाठला आहे. पिण्यासाठी जेमतेम पाणी मिळते. अंघोळीला तर पाणीच मिळत नाही, असंही या महिला सांगतात.

4 / 6
विहिरीवर पाण्यासाठी महिलांची चढाओढ सुरु असते. त्यांच्यासोबत लहान लहान मुलीही असतात. विंचू काट्याची भीती वाटत नाही. कारण पाणी हवंय. अगोदर गेलेल्या महिला पाणी आणल्यानंतर दुसऱ्या महिला पाण्यासाठी विहिरीवर नंबर लावतात. प्रत्येकीला पाणी मिळेल याची खबरदारी या महिला घेत असतात.

5 / 6
पाणी टंचाईबाबत ग्रामस्थांनी अनेक तक्रारी दिल्या आहेत. मात्र प्रशासनाला याकडे लक्ष द्यायला वेळच नाही. लोकप्रतिनिधींनी सुद्धा या समस्येकडे कानाडोळा केल्या. आज या महिलांना पाण्यासाठी रात्र काढावी लागते. विकास होतच राहील. पण आम्हाला पाणी कधी देणार? असा सवाल हे ग्रामस्थ करत आहेत.

6 / 6
Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा