AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lok Sabha Election 2024 : राज्यात दुसऱ्या टप्प्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या; उद्या अनेकांचे भवितव्य मतपेटीत होणार बंद

Lok Sabha Election 2024 Polls Phase 2 : लोकसभा निवडणुकीच्य दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या. आता उद्या 26 एप्रिल रोजी देशातील 89 मतदार संघातील मतदार राजा त्यांचा नेता निवडीसाठी मतदान करतील. महाराष्ट्रातील हायहोल्टेज ठरलेल्या अमरावतीत उद्या मतदान होत आहे.

Lok Sabha Election 2024 : राज्यात दुसऱ्या टप्प्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या; उद्या अनेकांचे भवितव्य मतपेटीत होणार बंद
उद्या मतदानाचा टक्का वाढणार?
| Updated on: Apr 25, 2024 | 9:57 AM
Share

लोकसभा निवडणूक 2024 मधील दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या 26 एप्रिल रोजी मतदान होत आहे. काल देशभरात जोरदार प्रचार आणि राजकीय नेत्यांनी एकमेकांवर तुफान दारुगोळा डागला. प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत. उद्या शांततेत मतदान होण्यासाठी देशभरात यंत्रणा सज्ज झाली आहे. अनेक मतदान केंद्रांवर तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. देशातील 89 मतदार संघात मतदान होईल. यामध्ये सर्वात प्रतिष्ठेचा वायनाड मतदार संघ पण आहे. राहुल गांधी येथून निवडणूक लढवत आहे. तर राज्यात हायहोल्टेज ठरलेल्या अमरावतीमध्ये उद्या मतदान होत आहे.

89 जागांवर मतदान

देशातील 13 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशातील 89 जागांवर उद्या मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात केरळ राज्यातील सर्वच 20 लोकसभा जागांवर मतदान होईल. कर्नाटकमधील 14, राजस्थानमधील 13, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी 8, आसाम आणि बिहारमधील प्रत्येकी 5, पश्चिम बंगालमधील 3 तर त्रिपुरा आणि जम्मू-काश्मीरमधील एका जागेचा समावेश आहे.

राज्यात या लोकसभा मतदारसंघात मतदान

शुक्रवारी 26 एप्रिल रोजी राज्यातील 8 लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम हे पश्चिम विदर्भातील मतदारसंघ तर मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 204 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. तर दीड कोटी मतदार त्यांचा खासदार निवडतील.

7 टप्प्यांमध्ये देशभरात मतदान

केंद्रीय निवडणूक आयोगाने यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे, देशात सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक पार पडत आहे. त्यातील 19 एप्रिल रोजी काही मतदारसंघात मतदान झाले. राज्यातील पूर्वी विदर्भातील मतदारसंघाचा त्यात सहभाग होता. आता राज्यातील 8 लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिल रोजी मतदान होईल. पुढील टप्प्यात 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल.

कोणते उमेदवार चर्चेत

दुसऱ्या टप्प्यात केरळमधील वायनाडमध्ये राहुल गांधी हे उमेदवार आहेत. तिरुअनंतपूरम येथून काँग्रेसचे शशी थरुर उभे आहेत. उत्तर प्रदेशातील मथुरेतून हेमा मालिनी या भाजप उमेदवार आहेत. छत्तीसगडमधून माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल, सभापती रमण सिंग हे नशीब आजमावत आहेत. कर्नाटकमधील मांड्यामधून जेडीएसचे एच. डी. कुमारस्वामी, मेरठमधून अरुण गोविल हे भाजपचे उमेदवार आहेत. तर राज्यात अमरातीतून नवनीत राणा या भाजपच्या उमेदवार आहेत.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.