Maharashtra News LIVE : वैद्यकीय शिक्षण विभागातील परिचारिका संघटनेचं आंदोलन
Maharashtra News LIVE : शिवसेना पक्षाच्या चिन्हाबद्दल आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेंच्या शिवसेनेला देण्याच्या निर्णयावरील आव्हान याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. मागच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी न्यायालयात उद्धव ठाकरेंची बाजू मांडली होती.

LIVE NEWS & UPDATES
-
चाळीसगावात अन्न व औषध विभागाची धडक कारवाईमुळे उडाली खळबळ
चाळीसगावात अन्न व औषध विभागाची धडक कारवाईमुळे उडाली खळबळ, दुधाचे नमुने जप्त. चाळीसगावातील दूध संकलन केंद्रातून अन्न व औषध विभागाने दुधाचे नमुने घेतले. जळगाव येथील अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाची कारवाई. कारवाईमुळे दूध व्यावसायिकांमध्ये खळबळ
-
आठवडाभराच्या मुसळधार पावसाने धुळे जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान
अनेक शेतांमध्ये अजूनही पाणी साचल्याने कपाशी, सोयाबीन, ज्वारी, बाजरीसह विविध पिके सडू लागली. पाण्याचा निचरा न झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट. उशिरा पेरणी केलेल्या पिकांनाही अतिवृष्टीचा फटका. काही भागांत अद्याप पंचनामे न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप. तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी…
-
-
धाराशिवमध्ये शाळांबाहेरील जंक फूडवर बंदी; शिक्षण विभागाचे तात्काळ अंमलबजावणीचे आदेश!
जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर रवींद्र खंदारे यांनी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना दिल्या कडक सूचना, FDA चे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉ. रवींद्र खंदारे यांनी केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी यांची कार्यशाळा घेऊन दिले अंमलबजावणीचे आदेश. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासन (FDA) ने घेतलेल्या निर्णयाची जिल्ह्यात तातडीने अंमलबजावणी सुरू शाळांच्या परिसरात जास्त चरबी, मीठ व साखर असलेल्या जंक फूडच्या विक्रीवर बंदी
-
चिमुकल्या विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढत गाठावी लागते शाळा
जालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस हजेरी लावत आहे मात्र याचाच परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होत असल्याचं पाहायला मिळत आहे.घनसावंगी तालुक्यातील राजूरकर कोठा येथील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्ते पूर्णपणे चिखलमय झाले तर काही ठिकाणी पाणी तुंबल्याने नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.चिखलामुळे विद्यार्थ्यांना या रस्त्यातून पायी चालणेही कठीण झाले आहे.त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत शिक्षण घेण्याची वेळ या चिमुकल्या विद्यार्थ्यांवर आलीय.
-
नांदूर मधमेश्वर धरणातून सलग पंधराव्या दिवशी विसर्ग सुरू
नांदूर मधमेश्वर धरणातून सलग पंधराव्या दिवशी विसर्ग सुरु आहे. 22 हजार 770 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दारणा, गंगापूर, पालखेड धरण क्षेत्रात पाऊस सुरु असल्याने विसर्ग कायम आहे. या पावसाच्या हंगामात एकूण आज सकाळी सहा वाजेपर्यंत 45.19 टीएमसी पाणी जायकवाडीकडे सोडलं आहे. 22 हजार 770 इतका मोठा विसर्ग सुरु असल्याने गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
-
-
जळगावात गणपती नगरात कारमधून व्यापाऱ्याची साडेबारा लाखांची रोकड असलेली बॅग लंपास
जळगावात गणपती नगरात कारमधून व्यापाऱ्याची साडेबारा लाखांची रोकड असलेली बॅग लंपास झाली. कारमधून ऑईल लिकची बतावणी करत चोरट्यांनी ही रोकड लंपास केल्याची माहिती आहे. व्यापारी कारमधून खरंच ऑईल लीक होतं आहे का, हे पाहण्यासाठी गेला असता मागच्या सीटवर ठेवलेली बॅग लंपास केली. कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ व्यापारी अनिल ओमप्रकाश मंधान यांच्यासोबत ही घटना घडली आहे.
-
धाराशिवमध्ये शाळांबाहेरील जंक फूडवर बंदी; शिक्षण विभागाचे तात्काळ अंमलबजावणीचे आदेश
धाराशिवमध्ये शाळांबाहेरील जंक फूडवर बंदी घालण्यात आली आहे. शिक्षण विभागाने तात्काळ अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर रवींद्र खंदारे यांनी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना कडक सूचना दिल्या आहेत. FDA चे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉ. रवींद्र खंदारे यांनी केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी यांची कार्यशाळा घेऊन अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनने (FDA) घेतलेल्या निर्णयाची जिल्ह्यात तातडीने अंमलबजावणी सुरू आहे.
-
-
नाशिकमध्ये गेल्या चार दिवसांत शहरातील २,५६८ ठिकाणचे खड्डे बुजवल्याचा दावा
नाशिकमध्ये गेल्या चार दिवसांत शहरातील २,५६८ ठिकाणचे खड्डे बुजवल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. ३० जुलै ते २ ऑगस्टदरम्यान युद्धपातळीवर खड्डे दुरुस्ती मोहीम सुरू आहे. जीएसबी, मुरूम, मिलिंग मटेरियल आणि कोल्डमिक्सच्या साहाय्याने दुरुस्ती करण्यात आल्याचा दावा पालिकेनं केला आहे. सातपूर विभागात सर्वाधिक खड्डे बुजवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तर १ जून ते २९ जुलै या कालावधीत ११,६०९ खड्डे बुजवल्याचा महापालिकेचा दावा आहे.
-
नाशिकमधील सुमारे अडीच हजार डॉक्टर आज एक दिवसाच्या संपावर
नाशिकमधील बीएचएमएस डॉक्टरांना सीसीएमपी अभ्यासक्रमानंतर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या प्रस्तावाला विरोध करण्यात आला आहे. या प्रस्तावाच्या विरोधात नाशिकमधील सुमारे अडीच हजार डॉक्टर आज एक दिवसाच्या संपावर आहेत. संपामुळे खासगी आणि शासकीय आरोग्यसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पूर्वनियोजित शस्त्रक्रिया, कर्करोग उपचार, डायलिसिस आणि प्रसूती सेवा प्रभावित होण्याची भीती आहे. एमएआरडी, एएसएमआय आणि विविध वैद्यकीय संघटनांचा आंदोलनाला पाठिंबा आहे.
-
नाशिक रोड इथं अमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई
नाशिक रोड इथं अमली पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. सिन्नरफाटा परिसरातून ६२ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज जप्त केलं. सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचे ड्रग्ज पोलिसांच्या ताब्यात आहेत. अभिषेक कुटे आणि करण पठाडे या दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. मध्यरात्री सापळा रचून अमली पदार्थविरोधी पथकाने धडक कारवाई केली.
-
राज्यभरातील शासकीय परिचारिकांचं आज दोन तास कामबंद आंदोलन
छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन यांच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. राज्यभरातील शासकीय परिचारिकांचं आज दोन तास कामबंद आंदोलन आहे. सकाळी 7.30 ते 9.30 या वेळेत महाराष्ट्रभर नर्सेसचा कामबंद निर्णय आहे. सेवा प्रवेश नियम अंतिम करणे, आकृतीबंध, पदोन्नती आणि रिक्त पदे भरणे या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. घाटी रुग्णालयातील शासकीय परिचारिकाही आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. शासनाने मागण्या मान्य न केल्यास बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
-
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला देण्याच्या निर्णयावरील आव्हान याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
राज्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांची विशेष सखोल फेरतपासणी (SIR) मोहिमेत तात्पुरत्या स्थलांतरित मतदारांना आता त्यांच्या मूळ ठिकाणीच एसआयआरची प्रक्रिया पूर्ण करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांतील पुनर्विकास प्रकल्पांमुळे स्थलांतरित झालेल्या लाखो मतदारांना दिलासा मिळाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यातील मतदार याद्यांची विशेष सखोल फेरतपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. तर दुसरीकडे बिहारमधील बांकीपूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. यामुळे पक्षाचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना जबरदस्त धक्का बसला आहे. याठिकाणी जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी पक्षाचा आणि स्वत:चा पहिला विजय मिळवला आहे. यासह राज्यातील, देश- विदेशातील, क्रीडा, मनोरंजन आणि इतर क्षेत्रातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
Published On - Aug 04,2026 7:58 AM
