Alandi : वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट, पाहा फोटो

हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. या निमित्त आळंदीमधील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरातही आज आकर्षक सजावट करण्यात आली आहे. (Attractive flower decoration at Dnyaneshwar Maharaj Samadhi Temple on the occasion of Vat Purnima)

1/7
Alandi Pune
आज वटपौर्णिमेनिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. ठिकठिकाणी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीये.
2/7
Alandi Pune
वटपौर्णिमेनिमित्त आळंदीमधील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरातही आज आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
3/7
Alandi Pune
या ठिकाणी सभा मंडपात आणि गाभाऱ्यात आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली.
4/7
Alandi Pune
विविध धार्मिक सणांचं औचित्य साधत आळंदी देवस्थानच्या वतीने नेहमीच आकर्षक सजावट करण्यात येते.
5/7
Alandi Pune
हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचा हा दिवस “वटपौर्णिमा” (Vat Purnima) म्हणून साजरा केला जातो. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात.
6/7
Alandi Pune
अनेक ठिकाणी हे व्रत जेष्ठ अमावस्येच्या दिवसापासून ते जेष्ठ पौर्णिमेच्या तिथीपर्यंत केले जाते. वटवृक्षाची पूजा करुन सावित्रीने आपला पती सत्यवान यांच्या प्राणाची रक्षा केली होती. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.
7/7
Alandi Pune
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे तीन दिवसाचे व्रत असते. तीन दिवस उपवास करणे अशक्य असेल तर फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा. दिवसभर उपवास करून यादिवशी रात्री उपवास सोडावा.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI