Marathi News » Spiritual adhyatmik » Chanakya Niti The person who can overcome every difficulty of life who understood these 5 things of Acharya know more
Chanakya Niti | आयुष्यातील प्रत्येक कठीण क्षण सहज, सोपा वाटू लागेल, फक्त आचार्य चाणक्यांच्या 5 गोष्टी लक्षात ठेवा
आचार्या चाण्यक्य आयुष्यात खूप प्रसंगाना सामोरे गेले. या सर्व प्रसंगात खचून न जाता त्यांनी त्यामधुन मार्ग काढला. आचार्यांनी आपल्या अनुभवातून जे काही साध्य केले आहे ते त्यांनी आपल्या सृजनातून लोकांसमोर मांडले आहे. आयुष्यातील प्रत्येक कठीण क्षण सहज, सोपा वाटण्यासाठी त्यांनी 5 खास गोष्टी सांगितल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.
आचार्या चाण्यक्यांच्या मते देव, संत, आणि पालक थोड्याच गोष्टींनी प्रसन्न होतात. जवळचे आणि दूरचे नातेवाईक जेव्हा त्यांचा आदर केला जातो तेव्हा आनंदी होतात. तर विद्वानांना आध्यात्मिक संदेशाची संधी मिळाल्यावर त्यांना सर्वांत जास्त आनंद होतो. त्यामुळे या लोकांशी वागताना या गोष्टी विचारात घेऊन करायला हव्यात.
1 / 5
माणसाची कृती त्याला कधीच सोडत नाही. जसे हजारो गायींमध्ये गायीचे वासरू आपल्या आईच्या मागे जाते. त्याचप्रमाणे कर्म त्या व्यक्तीचे अनुसरण करते. म्हणून आपल्या चांगल्या कर्मांची काळजी घ्या. तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा तुम्ही जे करणार आहात त्या गोष्टी पुन्ह: तुमच्याकडे येणार आहेत.
2 / 5
ज्या व्यक्तीने चार वेद आणि सर्व धर्मग्रंथ वाचले, पण स्वतःच्या आत्म्याचा साक्षात्कार झाला नाही, अशा व्यक्तीचे सर्व ज्ञान व्यर्थ आहे. अशी व्यक्ती चमच्यासारखी असते ज्याने सर्व प्रकारचे पदार्थ ढवळले, परंतु पदार्थाची चव चाखली नाही.
3 / 5
यशाची चव चाखायची असेल तर अपयशाची भीती घालवणे खूप गरजेचे असते. तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा आणि प्रवासात अपयश आले तर त्याला एक धडा म्हणून समजा. अशा प्रकारे प्रयत्न केल्याने तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात नक्कीच यशस्वी व्हाल.
4 / 5
आचार्य चाणक्य म्हणाले की, जगातील प्रत्येकाने समाधानाने जगायला शिकले पाहिजे कारण जगात ज्याला सर्व सुख मिळालेले असे कोणीच नाही आहे.