India vs New Zealand T20I LIVE Score: न्यूझीलंडला दुसरा झटका, टीम सायफर्ट आऊट, किवींची सलामी जोडी माघारी
India vs New Zealand 2nd T20I LIVE Cricket Score and Updates in Marathi : भारतीय संघाचा रायपूरमध्ये विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न असणार आहे. तर न्यूझीलंडसमोर 2026 मधील पहिला टी 20i सामना जिंकण्याचं आव्हान आहे. या दोघांपैकी कुणाला यश येणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LIVE Cricket Score & Updates
-
IND vs NZ 2nd T20i Live Score : न्यूझीलंडला दुसरा झटका, टीम सायफर्ट आऊट, किवींची सलामी जोडी माघारी
टीम इंडियाने जोरदार कमबॅक करत न्यूझीलंडला सलग दुसऱ्या ओव्हरमध्ये झटका दिला आहे. हर्षित राणा याने चौथ्या ओव्हरमध्ये डेव्हॉन कॉनव्हे याला आऊट करत न्यूझीलंडला पहिला झटका दिला. त्यानंतर वरुण चक्रवर्ती याने चौथ्या ओव्हरमध्ये टीम सायफर्ट याला आऊट केलं. भारताने अशाप्रकारे न्यूझीलंडच्या सलामी जोडीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवत सामन्यात कमबॅक केलं.
-
IND vs NZ 2nd T20i Live Score : न्यूझीलंडला आक्रमक सुरुवातीनंतर पहिला झटका, डेव्हॉन कॉनव्हे आऊट
टीम इंडियाने न्यूझीलंडला आक्रमक सुरुवातीनंतर पहिला झटका देत सेट जोडी फोडली आहे. हर्षित राणा याने चौथ्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर न्यूझीलंडला पहिला झटका दिला आहे. हर्षितने डेव्हॉन कॉनव्हे याला हार्दिक पंड्या याच्या हाती 19 धावांवर कॅच आऊट केलं. कॉनव्हे आणि टीम सायफर्ट या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली.
-
-
IND vs NZ 2nd T20i Live Updates : सामन्याला सुरुवात, न्यूझीलंडची सलामी जोडी मैदानात
रायपूरमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी 20i सामन्याला सुरुवात झाली आहे. भारताने न्यूझीलंडला टॉस जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. न्यूझीलंडकडून टीम सायफर्ट आणि डेव्हॉन कॉनव्हे ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
-
IND vs NZ 2nd T20i Live Updates : न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन
डेव्हॉन कॉनव्हे, टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरेल मिचेल, मिचेल सँटनर (कर्णधार), झॅक्री फॉल्क्स, मॅट हेन्री, ईश सोढी आणि जेकब डफी.
-
IND vs NZ 2nd T20i Live Updates : टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन
संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.
-
-
IND vs NZ 2nd T20i Live Updates : भारताने टॉस जिंकला, न्यूझीलंड विरुद्ध फिल्डिंगचा निर्णय
टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या टी 20I सामन्यात टॉस जिंकला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव याने न्यूझीलंड विरुद्ध फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता टीम इंडियाचे गोलंदाज न्यूझीलंडला किती धावांपर्यंत रोखण्यात यशस्वी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
IND vs NZ 2nd T20i Live Updates : दुसऱ्या टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी 20i सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. हा सामना रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
-
-
IND vs NZ 2nd T20i Live Updates : टी 20i सीरिजसाठी न्यूझीलंड टीम
डेव्हॉन कॉनव्हे (विकेटकीपर), टीम रॉबिन्सन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमॅन, डॅरेल मिचेल, मिचेल सँटनर (कर्णधार), क्रिश्चन क्लार्क, कायल जेमिसन, ईश सोढी, जेकब डफी,जेम्स नीशम, मॅट हेन्री, मायकेल ब्रेसवेल, झॅक्री फॉल्क्स आणि बेव्हॉन जेकब्स.
-
IND vs NZ 2nd T20i Live Updates : टी 20i सीरिजसाठी टीम इंडिया
संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, हर्षित राणा आणि कुलदीप यादव.
-
IND vs NZ 2nd T20i Live Updates : भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टी 20i सामना, रायपूरमध्ये रंगणार थरार
टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध रायपूरमध्ये सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे. तर न्यूझीलंडचा सामना जिंकून पहिल्या पराभवाची परतफेड करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण मैदाना मारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी 20i सामना हा रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. टीम इंडिया न्यूझीलंड विरूद्धच्या 5 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताचा रायपूरमध्ये विजय मिळवून मालिकेतील आघाडी मजबूत करण्याचा मानस असणार आहे. तर न्यूझीलंडसमोर मालिकेत बरोबरी करण्याचं आव्हान असणार आहे. उभयसंघातील या सामन्याबाबत आपण या लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेऊयात.
Published On - Jan 23,2026 5:58 PM
