IPL 2024 Final KKR Vs SRH Match Highlights: विजेते-उपविजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार, पाहा कुणाला कोणता पुरस्कार मिळाला?

| Updated on: May 27, 2024 | 9:54 AM

Kolkata Knight Riders Vs Sunrisers Hyderabad Final Match Full Highlights 2024: कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध 8 विकेट्सने शानदार विजय मिळवत आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. या सामन्यानंतर बक्षिस वितरण समारंभ पार पडला. या सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं

IPL 2024 Final KKR Vs SRH Match Highlights: विजेते-उपविजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार, पाहा कुणाला कोणता पुरस्कार मिळाला?
kkr ipl 2024 winnerImage Credit source: BCCI/IPL

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विजेता ठरली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने महाअंतिम सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. केकेआरने या  विजयासह ट्रॉफी जिंकली.  या सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलं होतं. श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीत   केकेआरने पहिल्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी ट्रॉफी उंचावली.  केकेआरने या याधी 2012 आणि 2014 साली गौतम गंभीर याच्या नेतृत्वात ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. तर सनरायजर्स हैदराबादला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 27 May 2024 04:16 AM (IST)

  IPL 2024 Final Live Update: मान्यवरांसह विजेता-उपविजेत्याचं फोटोशूट

  सामन्यानंतर विजेता आणि उपविजेता कर्णधार श्रेयस अय्यर-पॅट कमिन्स या दोघांनी मान्यवरांसह फोटोशूट केलंय. पाहा फोटो

  विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार

 • 27 May 2024 04:12 AM (IST)

  IPL 2024 Final Live Update: मिचेल स्टार्क ‘मॅन ऑफ द मॅच’

  आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू अशी ख्याती मिळवलेला केकेआरचा वेगवान गोलंदाज याने अंतिम सामन्यात 3 ओव्हरमध्ये 14 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या. स्टार्कला त्याच्या या चिवट कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

  मिचेल स्टार्क ‘मॅन ऑफ द मॅच’

 • 27 May 2024 04:09 AM (IST)

  IPL 2024 Final Live Update: ऑलराउंडर सुनील नरीन 'प्लेअर ऑफ द सीरिज'

  केकेआरचा अष्टपैलू सुनील नरीन प्लेअर ऑफ द सीरिज या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. सुनीलने या हंगामात बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही आघाड्यांवर शानदार कामगिरी केली. सुनीलने 15 सामन्यांमधील 14 डावांमध्ये 488 धावा केल्या. तर 17 विकेट्सही घेतल्या. त्यातच्या या कामगिरीची दखल घेत त्याला सन्मानित करण्यात आलं.

 • 27 May 2024 04:00 AM (IST)

  IPL 2024 Final Live Update: रमनदीप सिंहने घेतलेला तो झेल कॅच ऑफ द सिजन, पाहा व्हीडिओ

  आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 54 व्या सामन्यात केकेआरच्या रमनदीप सिंह याने लखनऊच्या अर्शीन कुलकर्णी याचा उलट दिशेने धावत उलट कॅच घेतला होता.  रमनदीप घेतलेला झेल हा कॅच ऑफ द सिजन ठरला आहे.  अंतिम सामन्यानंतर रमनदीप सिंह याचा सन्मान करण्यात आला.

  कॅच ऑफ द सिजन

 • 27 May 2024 12:48 AM (IST)

  IPL 2024 Final Live Update: कॅप्टन श्रेयस अय्यरने स्वीकारली ट्रॉफी

  बक्षिस वितरण समारंभात सर्वात शेवटी विजेता संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याला बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांनी ट्रॉफी दिली. त्यानंतर केकेआरच्या खेळा़डूंनी एकच जल्लोष केला. जल्लोषाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.

  केकेआर, ट्रॉफी आणि जल्लोष

 • 27 May 2024 12:30 AM (IST)

  IPL 2024 Final Live Update: नितीश कुमार रेड्डी एमर्जिंग प्लेअर ऑफ द ईयर

  सनरायजर्स हैदराबादचा नितीश कुमार रेड्डी 'एमर्जिंग प्लेअर ऑफ द ईयर' या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.

  नितीश कुमार रेड्डी

 • 27 May 2024 12:26 AM (IST)

  IPL 2024 Final Live Update: हर्षल पटेल पर्पल कॅप विजेता

  पंजाब किंग्सचा गोलंदाज हर्षल पटेल पर्प कॅप विजेता ठरला. हैदराबादच्या भुवनेश्वर कुमारने हर्षलच्या वतीने पर्पल कॅप स्वीकार केली.  हर्षलने या 17 व्या मोसमात एकूण आणि सर्वाधिक 24 विकेट्स घेतल्या.

  हर्षल पटेल पर्पल कॅप विजेता

 • 27 May 2024 12:18 AM (IST)

  IPL 2024 Final Live Update: विराट कोहली ऑरेंज कॅपचा मानकरी

  केकेआरच्या विजयानंतर बक्षिस वितरण समारंभ पार पडला. यावेळेस विराट कोहली याच्या वतीने कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन श्रेयस अय्यर याने विराट कोहलीच्या वतीने ऑरेंज कॅप विजेता हा पुरस्कार स्वीकारला. बीसीसीआय खजिनदार आशिष शेलार यांनी श्रेयसला हा पुरस्कार सोपवला

  श्रेयसकडून विराटच्यावतीने ऑरेंज कॅप पुरस्कारचा स्वीकार

 • 26 May 2024 10:45 PM (IST)

  IPL 2024 Final Live Score: कोलकाता 10 वर्षांनंतर चेन्नईमध्ये चॅम्पियन

  कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील अंतिम सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. केकेआर या विजयासह आयपीएल 2024 ची चॅम्पियन ठरली आहे. केकेआरने 10 वर्षानंतर पुन्हा एकदा अंतिम सामन्यात विजय मिळवला. केकेआरने याआधी 2012 साली चेन्नईतील चेपॉकमध्ये विजय मिळवला होता.  केकेआरची यंदाची आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची ही तिसरी वेळ ठरली.  केकेआरच्या गोलंदाजांनी आधी हैदराबादला 18.3 ओव्हरमध्ये 113 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर केकेआरने 2 विकेट्स गमावून 10.3 ओव्हरमध्ये 114 धावांचं आव्हान पूर्ण केलं. केकेआरकडून वेंकटेश अय्यर याने सर्वाधिक नाबाद 52 धावांची खेळी केली. रहमानुल्लाह गुरुबाज याने 39 धावांचं योगदान दिलं. तर सुनील नरीन आणि कॅप्टन श्रेयस अय्यर या दोघांनी 6 धावा केल्या.

 • 26 May 2024 10:19 PM (IST)

  IPL 2024 Final Live Score: केकेआरला दुसरा धक्का, गुरुबाज आऊट

  केकेआरने दुसरी विकेट गमावली आहे. रहमानुल्लाह गुरुबाज 32 बॉलमध्ये 39 रन्स करुन आऊट झाला आहे.

 • 26 May 2024 10:02 PM (IST)

  IPL 2024 Final Live Score: केकेआरच्या पावर प्लेनंतर 72 धावा

  कोलकाताने 114 धावांचा पाठलाग करताना पावर प्लेच्या 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 72 धावा केल्या आहेत. रहमानुल्ल्हा गुरुबाज आणइ वेंकटेश अय्यर या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी झाली आहे.

 • 26 May 2024 09:36 PM (IST)

  IPL 2024 Final Live Score: केकेआरला पहिला धक्का

  केकेआरने 114 धावांचा पाठलाग करताना पहिली विकेट गमावली आहे. पॅट कमिन्स याने हैदराबादला पहिली विकेट मिळवून दिली आहे. सुनील नरीन 6 धावांवर कॅच आऊट झाला आहे.

 • 26 May 2024 09:30 PM (IST)

  IPL 2024 Final Live Score: सुनील नरीन-रहमानुल्लाह गुरुबाज सलामी जोडी मैदानात, केकेआरला विजयासाठी 114 धावांचं आव्हान

  केकेआरच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. केकेआरची सुनील नरीन-रहमानुल्लाह गुरुबाज ही सलामी जोडी मैदानात आली आहे. केकेआरला विजयासाठी 114 धावांचं आव्हान मिळालं आहे. हैदराबादने 18.3 ओव्हरमध्ये ऑलआऊट 113 धावा केल्या.

 • 26 May 2024 09:24 PM (IST)

  IPL 2024 Final Live Score: केकेआरसमोर 114 धावांचं आव्हान

  सनरायजर्स हैदराबाजने केकेआरला विजयासाठी 114 धावांचं आव्हान दिलं आहे. हैदराबादचा डाव हा 18.3 ओव्हरमध्ये 113 धावांवर आटोपला.

 • 26 May 2024 08:49 PM (IST)

  IPL 2024 Final Live Score: हेन्रिक क्लासेन आऊट

  हैदराबादने आठवी विकेट गमावली आहे. हेन्रिक क्लासेन आऊट झाला आहे. हर्षित राणा याने हेन्रिक क्लासेन याला16 धावांवर बोल्ड केलं.

 • 26 May 2024 08:41 PM (IST)

  IPL 2024 Final Live Score: अब्दुल समद आऊट

  हैदराबादला सातवा झटका लागला आहे.  अब्दुल समद  4 धावांवर कॅच आऊट झाला आहे.

 • 26 May 2024 08:36 PM (IST)

  IPL 2024 Final Live Score: शाहबाज अहमद 8 धावांवर आऊट

  कोलकाताच्या गोलंदाजांमसमोर हैदराबादच्या फलंदाजीची घसरगुंडी झाली आहे. हैदराबादने सहावी विकेट गमावली आहे. शाहबाज अहमद 8 धावा करुन आऊट झाला आहे. वरुण चक्रवर्थी याने शाहबाजची शिकार केली. त्यामुळे आता हैदराबादची 11.5 ओव्हरमध्ये 6 बाद 71 अशी बिकट स्थिती झाली आहे.

 • 26 May 2024 08:31 PM (IST)

  IPL 2024 Final Live Score: एडन मारक्रम आऊट, हैदराबादचा अर्धा संघ तंबूत

  हैदराबादचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. हैदराबादने पाचवी विकेट गमावली आहे. एडन मारक्रम आंद्रे रसेलच्या बॉलिंगवर मिचेल स्टार्कच्या हाती 20 धावांवर कॅच आऊट झाला.

 • 26 May 2024 08:14 PM (IST)

  IPL 2024 Final Live Score: नितीश रेड्डी आऊट, हैदराबादला चौथा झटका

  हैदराबादने चौथी विकेट गमावली आहे. नितीश रेड्डी आऊट झाला आहे. हर्षित राणा याने विकेटकीपर रहमानुल्लाह गुरुबाज याच्या हाती नितीशला 13 धावांवर कॅच आऊट केलं.

 • 26 May 2024 08:09 PM (IST)

  IPL 2024 Final Live Score: हैदराबादच्या पावरप्लेनंतर 40 धावा

  हैदराबाद पावरप्लेमध्ये फ्लॉप ठरली आहे. हैदराबादने पहिल्या 6 षटकांमध्ये 3 विकेट्स गमावून 40 धावा केल्या आहेत. अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड आणि राहुल त्रिपाठी हे तिधे बाद झाले आहेत. तर एडन मारक्रम आणि नितीश रेड्डी ही जोडी आता मैदानात आहे.

 • 26 May 2024 08:00 PM (IST)

  IPL 2024 Final Live Score: हैदराबादची पावर प्लेमध्ये घसरगुंडी, राहुल त्रिपाठी तंबूत

  हैदराबादने पावर प्लेमध्ये तिसरी विकेट गमावली आहे. अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड याच्यानंतर आता राहुल त्रिपाठी आऊट झाला आहे. त्यामुळे हैदराबादची स्थितीत 4.2 ओव्हरनंतर 3 बाद 21 अशी स्थिती झाली आहे.

 • 26 May 2024 07:46 PM (IST)

  IPL 2024 Final Live Score: ट्रेव्हिस हेड झिरोवर आऊट, निर्णायक सामन्यात फ्लॉप

  वैभव अरोरा याने कोलकाताला मोठी विकेट मिळवून देत हैदराबादला मोठा झटका दिला आहे.  त्रिपाठीने हैदराबादच्या डावातील दुसऱ्या आणि आपल्या कोट्यातील पहिल्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर हेडला विकेटकीपर रहमानुल्लाह गुरबाज याच्या हाती कॅच आऊट केलं.

 • 26 May 2024 07:37 PM (IST)

  IPL 2024 Final Live Score: अभिषेक शर्मा क्लिन बोल्ड

  मिचेल स्टार्कने हैदराबादला पहिला झटका दिला आहे. मिचेल स्टार्कने हैदराबादचा विस्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा याला क्लिन बोल्ड केलं. अभिषेकने 2 धावा केल्या.

 • 26 May 2024 07:32 PM (IST)

  IPL 2024 Final Live Score: ट्रॅव्हिस हेड-अभिषेक शर्मा सलामी जोडी मैदानात, हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात

  कोलाकाता विरुद्ध हैदराबाद अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. हैदराबादने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. एसआरएचकडून ट्रेव्हिस हेड आण अभिषेक शर्मा सलामी जोडी मैदानात आली आहे.

 • 26 May 2024 07:28 PM (IST)

  IPL 2024 Final Live Updates: सामन्याआधी राष्ट्रगीत, दोन्ही संघांचे खेळाडू मैदानात

  केकेआर विरुद्ध एसआरएच महामुकाबल्याआधी दोन्ही संघांचे खेळाडू मैदानात आले. यानंतर राष्ट्रगीत पार पडलं. त्यानंतर आता काही सेकंदांमध्ये सामन्याला सुरुवात होणार आहे.

 • 26 May 2024 07:15 PM (IST)

  IPL 2024 Final Live Updates: सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन आणि इम्पॅक्ट खेळाडू

  सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन: पॅट कमिन्स (कॅर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनादकट आणि टी नटराजन.

  सनरायजर्स हैदराबाद इम्पॅक्ट खेळाडू: उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, मयंक मारकंडे, अब्दुल समद आणि वॉशिंगटन सुंदर.

 • 26 May 2024 07:14 PM (IST)

  IPL 2024 Final Live Updates: कोलकाता नाइट राइडर्स प्लेइंग ईलेव्हन आणि इमपॅक्ट खेळाडू

  कोलकाता नाइट राइडर्स प्लेइंग ईलेव्हन: श्रेयस अय्यर (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज़ (विकेटकीपर), सुनील नरीन, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह, मिचेल स्टार्क, वैभव अरोडा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.

  कोलकाता नाइट रायडर्स इम्पॅक्ट खेळाडू: अनुकूल रॉय, मनीष पांडे, नितीश राणा, केएस भरत आणि शेरफेन रदरफोर्ड.

 • 26 May 2024 07:13 PM (IST)

  IPL 2024 Final Live Updates: हैदराबादने टॉस जिंकला

  सनरायजर्स हैदरबादने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध महाअंतिम सामन्यात नाणेफेक जिंकली आहे. कॅप्टन पॅट कमिन्स याने बॅटिंगचा निर्णय घेत केकेआरला बॉलिंगसाठी भाग पाडलं आहे.

 • 26 May 2024 05:33 PM (IST)

  IPL 2024 Final Live Updates: महामुकाबल्याला थोड्याच वेळात सुरुवात

  केकेआर विरुद्ध एसआरएच महाअंतिम सामन्याला अवघी काही मिनिटं बाकी आहेत.  क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तर दोन्ही संघांच्या खेळाडूंची तयारी अखेरच्या टप्प्यात आहे.

  महामुकाबल्याची चाहत्यांना प्रतिक्षा 

 • 26 May 2024 04:14 PM (IST)

  IPL 2024 Final Live Updates: केकआरचा हैदराबादवर बोलबाला, दोन्ही वेळा एसआरएच अपयशी

  आयपीएलच्या 17 व्या मोसमातील अंतिम सामन्याआधी  केकेआर विरुद्ध हैदराबाद यांच्यात एकूण 2 वेळा आमनासामना झाला. केकेआरने हैदराबादला साखळी फेरीत पराभूत केलं. त्यानंतर क्वालिफायर 1 सामन्यात हैदराबादचा धुव्वा उडवत फायनलमध्ये धडक मारली. आता क्रिकेट चाहत्यांना अंतिम सामन्याची प्रतिक्षा आहे.

 • 26 May 2024 02:26 PM (IST)

  KKR vs SRH Live : सामना रद्द झाला तर जेतेपद कोणाला? कोलकाता की हैदरबाद! ते जाणून घ्या

  IPL 2024 Final, KKR vs SRH : अंतिम सामन्यावर पावसाचं सावट, जर सामना झालाच नाही तर विजयी कोण? जाणून घ्या

 • 25 May 2024 11:23 PM (IST)

  IPL 2024 Final Live Updates: केकेआर आणि हैदराबादचा फायनलपर्यंतचा प्रवास

  कोलकाता विरुद्ध हैदराबाद यांच्यात आयपीएल ट्रॉफीसाठी लढत होणार आहे. या सामन्याला आता मोजून काही तास बाकी आहे. या सामन्यानिमित्ताने केकेआर आणि हैदराबादचा या हंगामातील इथवरचा प्रवास कसा राहिला? जाणून घ्या खालील फोटोद्वारे.

  केकेआर आणि एसआरएचचा इथवरचा प्रवास

 • 25 May 2024 09:00 PM (IST)

  IPL 2024 Final Live Updates: सामना कधी आणि कुठे पाहता येणार?

  केकेआर विरुद्ध एसआरच यांच्यात आयपीएल 2024 मधील अंतिम सामन्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याबाबत जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : केकेआर विरुद्ध एसआरएच अंतिम सामना केव्हा आणि कुठे पाहता येणार?

 • 25 May 2024 08:00 PM (IST)

  IPL 2024 Final Live Updates: हेड टु हेड रेकॉर्ड्स

  कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद दोन्ही संघ आयपीएलच्या इतिहासात एकूण 27 वेळा आमनेसामने आले आहेत. या 27 पैकी सर्वाधिक सामन्यात केकेआरचा बोलबाला राहिला आहे. अर्थात केकेआर हैदराबादवर वरचढ राहिली आहे. कोलकाताने एकूण 18 वेळा विजय मिळवला आहे. तर हैदराबादला 9 सामन्यात केकेआरवर मात करता आला आहे. तर केकेआरने गेल्या 8 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एसआरचने 2 सामने खेळले आहेत.

 • 25 May 2024 07:58 PM (IST)

  IPL 2024 Final Live Updates: चेन्नईत फायनल मॅचच्या पूर्वसंध्येला पावसाची हजेरी

  केकेआर विरुद्ध एसआरएच यांच्यात आयपीएलच्या 17 व्या मोसमातील अंतिम सामना हा चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये पार पडणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला चेपॉक क्रिकेट स्टेडियम परिसरात पावसाने हजेरी लावली.  पावसाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  सामन्याच्या पूर्वसंध्येला पावसाची बॅटिंग

 • 25 May 2024 07:30 PM (IST)

  IPL 2024 Final Live Updates: सनरायजर्स हैदराबाद टीम

  सनरायजर्स हैदराबाद टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), जयदेव उनाडकट, झटावेध सुब्रमण्यन, टी नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, ग्लेन फिलिप्स, नितीश रेड्डी, मार्को जॅनसेन, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, उपेंद्र यादव, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, अनमोलप्रीत सिंग, मयंक अग्रवाल, अब्दुल समद, आकाश महाराज सिंग, उमरान मलिक आणि विजयकांत व्यासकांत.

 • 25 May 2024 07:00 PM (IST)

  IPL 2024 Final Live Updates: कोलकाता नाईट रायडर्स टीम

  कोलकाता नाईट रायडर्स टीम : श्रेयस अय्यर (कर्णधार), श्रीकर भारत, मनीष पांडे, रहमानउल्ला गुरबाज, रमणदीप सिंग, नितीश राणा, शेरफेन रदरफोर्ड, रिंकू सिंग, व्यंकटेश अय्यर, सुनील नरेन, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, वैभव अरोरा, दुष्मंथा चमीरा, हर्षित राणा, चेतन साकरिया, मिचेल स्टार्क, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती, साकिब हुसेन, अंगक्रिश रघुवंशी आणि अल्लाह गझनफर.

 • 25 May 2024 06:44 PM (IST)

  IPL 2024 Final Live Updates: सामन्याच्या पूर्वसंध्येला दोन्ही संघाच्या कर्णधारांचं फोटोशूट

  केकेआर विरुद्ध एसआरएच अंतिम सामन्याआधी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पूर्वसंध्येला फोटोशूट पार पडलं. श्रेयस अय्यर आणि पॅट कमिन्स या दोघांनी आयपीएल ट्रॉफीसोबत  चौपाटी आणि रिक्षासह फोटोशूट केलं आहे. आयपीएलच्या एक्स खात्यावरुन हे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.

  2 कॅप्टन आणि 1 ट्रॉफी, 24 तासात विजेता ठरणार

 • 25 May 2024 06:32 PM (IST)

  IPL 2024 Final Live Updates: कोलकाता विरुद्ध हैदराबाद आयपीएल फायनल लाईव्ह अपडेट्स

  आयपीएल्या 17 व्या हंगामातील महाअंतिम सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे.  हा सामना एमए चिदंबरम स्टेडियम चेन्नई येथे 26 मे रोजी होणार आहे.  या सामन्याबाबत प्रत्येक अपडेट ही आपण या लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.

Published On - May 26,2024 7:00 AM

Follow us
शिंदेंच्या दौऱ्यावेळी मीडियाला घेऊन जाणाऱ्या बोटीचा अपघात, बघा व्हिडीओ
शिंदेंच्या दौऱ्यावेळी मीडियाला घेऊन जाणाऱ्या बोटीचा अपघात, बघा व्हिडीओ.
याआधी कधी अस नव्हत...राज्यात आरक्षणाचा वाद, राज ठाकरेंनी मांडली भूमिका
याआधी कधी अस नव्हत...राज्यात आरक्षणाचा वाद, राज ठाकरेंनी मांडली भूमिका.
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? शिरसाटांचं सूचक वक्तव्य काय?
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? शिरसाटांचं सूचक वक्तव्य काय?.
लोकसभेतील अपयशानंतर जानकरांचा स्वबळाचा नारा, विधानसभेसाठी तयारी सुरु
लोकसभेतील अपयशानंतर जानकरांचा स्वबळाचा नारा, विधानसभेसाठी तयारी सुरु.
पोरगं नापास झालं, आता काय करायच.. उदयनराजेंकडून निळू फुलेंची मिमिक्री
पोरगं नापास झालं, आता काय करायच.. उदयनराजेंकडून निळू फुलेंची मिमिक्री.
लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनापूर्वी मोदींनी सांगितलं18 अंकाचं महत्त्व
लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनापूर्वी मोदींनी सांगितलं18 अंकाचं महत्त्व.
त्यांना स्वप्नातही बांबू दिसतोय, लोक रस्त्यावर मारतील; राऊतांचा पलटवार
त्यांना स्वप्नातही बांबू दिसतोय, लोक रस्त्यावर मारतील; राऊतांचा पलटवार.
जरांगे पाटील आहे कोण? घटनातज्ज्ञ, वकील की पंतप्रधान? कुणाचा थेट सवाल?
जरांगे पाटील आहे कोण? घटनातज्ज्ञ, वकील की पंतप्रधान? कुणाचा थेट सवाल?.
पावसाचं सावट, चिखलाच्या मैदानात पोलीस भरती सुरू अन् विद्यार्थी आक्रमक
पावसाचं सावट, चिखलाच्या मैदानात पोलीस भरती सुरू अन् विद्यार्थी आक्रमक.
जीपला बांधलं दोर अन् भामट्यांनी ATM मशीनच पळवलं, चोरट्यांचा शोध सुरु
जीपला बांधलं दोर अन् भामट्यांनी ATM मशीनच पळवलं, चोरट्यांचा शोध सुरु.