AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs DC Highlight Score, IPL 2025 : मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला 59 धावांनी लोळवलं, प्लेऑफमध्ये मारली धडक

| Updated on: May 22, 2025 | 1:37 PM

Mumbai Indians vs Delhi Capitals Highlight Score in Marathi: मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 59 धावांनी धुव्वा उडवला आणि प्लेऑफमध्ये जागा मिळवणारा चौथा संघ ठरला आहे. यामुळे प्लेऑफचं चित्र स्पष्ट झालं असून टॉप 2 जागांसाठी चुरस असणार आहे.

MI vs DC Highlight Score, IPL 2025 : मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला 59 धावांनी लोळवलं, प्लेऑफमध्ये मारली धडक
Ipl 2025 MI vs DC Live Blog and ScoreImage Credit source: TV9

आयपीएल 2025 स्पर्धेतील 63व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 59 धावांनी धुव्वा उडवला. दिल्ली कॅपिटल्सने प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. तसेच मुंबईची धावसंख्याही आटोक्यात ठेवली होती. पण डेथ ओव्हरमध्ये सूर्यकुमार यादव आणि नमन धीरच्या फटकेबाजीमुळे गणित बिघडलं आणि 181 धावांचं आव्हान मिळालं. खेळपट्टी पाहता हे आव्हान खडतर होतं. झालंही तसंच.. दिल्ली कॅपिटल्स 18.1 षटकात फक्त 121 धावा करू शकली आणि पराभवाचं तोंड पाहावं लागलं. मुंबई इंडियन्स या विजयासाठी प्लेऑफमध्ये पोहोचली आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचं आव्हान संपुष्टात आलं आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 21 May 2025 11:16 PM (IST)

    MI vs DC Live Score, IPL 2025 : मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये, दिल्ली कॅपिटल्सला 59 धावांनी नमवलं

    मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 59 धावांनी पराभव करून प्लेऑफमध्ये स्थान पक्कं केलं आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारा चौथा संघ ठरला आहे. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी 181 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण हे आव्हान काही दिल्ली कॅपिटल्सला पूर्ण करता आलं नाही. दिल्ली कॅपिटल्सचा संघ 18.1 षटकात सर्व गडी गमवून 121 धावा करू शकला.

  • 21 May 2025 11:14 PM (IST)

    MI vs DC Live Score, IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सला नववा धक्का, कुलदीप यादव बाद

    दिल्ली कॅपिटल्सला कुलदीप यादवच्या रुपाने नववा धक्का बसला आहे. कुलदीप यादव 7 धावा करून बाद झाला आहे. कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारताना झेल बाद झाला.

  • 21 May 2025 11:07 PM (IST)

    MI vs DC Live Score, IPL 2025 : माधव तिवारीच्या रुपाने दिल्लीला आठवा धक्का

    माधव तिवारीच्या रुपाने दिल्ली कॅपिटल्सला आठवा धक्का बसला आहे. 3 धावांवर खेळत असताना जसप्रीत बुमराहने त्याचा त्रिफळा उडवला. मुंबई इंडियन्स विजयाच्या वेशीवर आहे. या विजयासह प्लेऑफमध्ये स्थान मिळवणार आहे.

  • 21 May 2025 10:57 PM (IST)

    MI vs DC Live Score Updates : दिल्लीला सातवा झटका, आशुतोष शर्मा आऊट, मुंबई विजयाच्या दिशेने

    मिचेल सँटनर याने दिल्लीला एकाच ओव्हरमध्ये 2 झटके देत मुंबईचा विजय निश्चित केला आहे. सँटनर याने 15 व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर समीर रिझवी याला आऊट केलं. त्यानंतर पाचव्या बॉलवर आशुतोष शर्मा याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. दिल्लीने यासह सातवी विकेट गमावली. त्यामुळे आता मुंबईचा विजय निश्चित झालाय, असं म्हटलं चुकीचं ठरणार आही.

  • 21 May 2025 10:54 PM (IST)

    MI vs DC Live Score Updates : दिल्लीला सहावा झटका, समीर रिझवी आऊट, मुंबई विजयाच्या दिशेने

    मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिट्ल्सला सहावा झटका दिला आहे. मिचेल सँटनर याने समीर रिझवी याला क्लिन बोल्ड केलं आहे. समीर रिझवी याच्या रुपात दिल्लीने सहावी विकेट गमावली आहे. समीरने 35 बॉलमध्ये 6 फोर आणि 1 सिक्ससह 39 रन्स केल्या.

  • 21 May 2025 10:34 PM (IST)

    MI vs DC Live Score Updates : दिल्लीला पाचवा धक्का, ट्रिस्टन स्टब्स आऊट

    मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिट्ल्सला पाचवा झटका देत सामन्यावर पकड मिळवली आहे. जसप्रीत बुमराह याने ट्रिस्टन स्टब्स याला आऊट केलं आहे. स्टब्स एलबीडब्ल्यू आऊट झाला. स्टब्सने 2 धावा केल्या.  त्यामुळे दिल्लीची स्थिती 9.2 ओव्हरनंतर 5 आऊट 65 अशी झाली आहे.

  • 21 May 2025 10:26 PM (IST)

    MI vs DC Live Score Updates : दिल्लीला चौथा धक्का, विपराज निगम आऊट

    मुंबई इंडियन्सने दिल्लीला चौथा झटका दिला आहे. विपराज निगम आऊट झाला आहे. मिचेल सँटनर याने विपराजला मैदानाबाहेर पाठवलं आहे.  मिचेलने आपल्याच बॉलिंगवर विपराजला कॅच आऊट केलं. विपराजने 11 बॉलमध्ये 20 रन्स केल्या.

  • 21 May 2025 10:10 PM (IST)

    MI vs DC Live Score Updates : दिल्लीला तिसरा धक्का, अभिषेक पोरेल आऊट, मुंबईची सामन्यावर घट्ट पकड

    मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिट्ल्सल तिसरा झटका देत सामन्यावर घट्ट पकड मिळवली आहे. विल जॅक्स याने अभिषेक पोरेल याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. जॅक्सच्या बॉलिंगवर विकेटकीपर रायन रिकेल्टन याने अभिषेक पोरेल याला स्टंपिंग आऊट केलं. अभिषेकने 9 बॉलमध्ये 6 रन्स केल्या.

  • 21 May 2025 09:57 PM (IST)

    MI vs DC Live Score Updates : केएल राहुल आऊट, दिल्लीला दुसरा झटका

    मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिट्ल्सला आणखी एक मोठा झटका दिला आहे. दीपक चाहर याने कॅप्टन फाफ डु प्लेसीस याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर ट्रेंट बोल्ट याने दिल्लीला मोठा झटका दिलाय. ट्रेंटने दिल्लीचा स्टार आणि मॅचविनर बॅट्समन केएल राहुल याला आपल्या जाळ्यात अडकवलं. ट्रेंटने केएलला विकेटकीपर रायन रिकेल्टन याच्या हाती कॅच आऊट केलं.

  • 21 May 2025 09:49 PM (IST)

    MI vs DC Live Score Updates : कॅप्टन फाफ डु प्लेसीस आऊट, दिल्ली कॅपिटल्सला पहिला झटका

    दीपक चाहर याने दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका देत मुंबई इंडियन्सला कडक सुरुवात करुन दिली आहे. दीपकने दिल्लीचा कॅप्टन फाफ डु प्लेसीस याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.  दीपकने फाफला मिचेल सँटनर याच्या हाती कॅच आऊट केलं. फाफने 7 बॉलमध्ये 6 रन्स केल्या.

  • 21 May 2025 09:44 PM (IST)

    MI vs DC Live Score Updates : दिल्ली कॅपिटल्सच्या बॅटिंगला सुरुवात, विजयासाठी 181 धावांचं आव्हान

    दिल्ली कॅपिटल्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. दिल्लीकडून केएल राहुल आणि कर्णधार फाफ डु प्लेसीस ही सलामी जोडी मैदानात आली आहे. मुंबई इंडियन्सने दिल्लीसमोर विजयासाठी 181 धावांचं आव्हान ठेवलं आहे. दिल्लीसाठी प्लेऑफच्या हिशोबाने हा सामना करो या मरो असा आहे. त्यामुळे दिल्ली हे विजयी आव्हान पूर्ण करण्यात यशस्वी ठरणार की पलटण प्लेऑफचं तिकीट मिळवणार? हे काही तासात स्पष्ट होईल.

  • 21 May 2025 09:25 PM (IST)

    MI vs DC Live Score, IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या 20 षटकात 180 धावा, दिल्ली आव्हान गाठणार का?

    मुंबई इंडियन्सने 20 षटकात 5 गडी गमवून 180 धावा केल्या आणि दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयसाठी 181 धावांचं आव्हान ठेवलं आहे. हे आव्हान दिल्ली गाठणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. शेवटच्या षटकात सूर्यकुमार यादवने आक्रमक खेळी केली. त्यामुळे मुंबईला 180 धावांपर्यंत मजल मारता आली. सूर्यकुमार यादवने 43 चेंडूत 73 धावा केल्या.

  • 21 May 2025 09:16 PM (IST)

    MI vs DC Live Score, IPL 2025 : सूर्यकुमार यादवचं धीमं अर्धशतक

    मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध चांगली सुरुवात केली होती. मात्र नंतर धावसंख्या मंदावली. त्यातल्या त्यात सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खळी केली. पण यासाठी 36 चेंडूंचा सामना केला.

  • 21 May 2025 09:11 PM (IST)

    MI vs DC Live Score, IPL 2025 : 18 षटकानंतर मुंबईच्या 5 बाद 132 धावा, सूर्यकुमार यादव 45 धावांवर

    वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सकडून आक्रमक खेळीची अपेक्षा होती. मात्र मुंबईची खेळी खूपच संथ असल्याचं दिसून आलं. 18 षटकांचा खेळ संपला तेव्हा मुंबईने 5 बाद 132 धावा केल्या आहे. उर्वरित दोन षटकात मोठ्या फटकेबाजीची अपेक्षा आहे. सूर्यकुमार यादव 45 धावांवर खेळत आहे.

  • 21 May 2025 09:02 PM (IST)

    MI vs DC Live Score Updates : मुंबईचा अर्धा संघ माघारी, हार्दिक पंड्या आऊट

    दिल्ली कॅपिट्ल्सने मुंबई इंडियन्सला मोठा झटका दिला आहे. कॅप्टन हार्दिक पंड्या कॅच आऊट झालाय. दुष्मंथा चमीरा याने  17 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर हार्दिक पंड्या याला मुकेश कुमार याची हाती कॅच आऊट केलं. हार्दिक गरजेच्या क्षणी आऊट झाल्याने मुंबईची अडचण आणखी वाढली आहे. हार्दिक 6 बॉलमध्ये 3 रन्स करुन आऊट झाला.

  • 21 May 2025 08:52 PM (IST)

    MI vs DC Live Score Updates : मुंबईला चौथा झटका, तिलक वर्मा माघारी

    मुकेश कुमार याने तिलक वर्मा-सूर्यकुमार यादव सेट जोडी फोडली आहे. मुकेश कुमारने तिलक वर्मा याला आऊट केलं आहे. मुकेशने तिलकला समीर रिझवीच्या हाती कॅच आऊट केलं. तिलकने 100 च्या स्ट्राईक रेटने 27बॉलमध्ये 27 रन्स केल्या. तिलकने या खेळीत 1 फोर आणि 1 सिक्स लगावला.

  • 21 May 2025 08:47 PM (IST)

    MI vs DC Live Score Updates : तिलक-सूर्या जोडी जमली, 14 ओव्हरनंतर मुंबईच्या 108 रन्स

    तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव ही जोडी जमली आहे. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी केली आहे. मुंबईच्या 14 ओव्हरनंतर 3 आऊट 108 रन्स झाल्या आहेत. सूर्यकुमार यादव 22 बॉलमध्ये 28 रन्सवर नॉट आऊट आहे. तर तिलक वर्मा 26 बॉलमध्ये 27 रन्स करुन खेळत आहे.

  • 21 May 2025 08:30 PM (IST)

    MI vs DC Live Score Updates : सूर्यकुमार यादव-तिलक वर्मावर पलटणची मदार

    मुंबईने सुरुवातीला ठराविक अंतराने झटपट 3 विकेट्स गमावल्या. रोहित शर्मा 5, विल जॅक्स 21 आणि रायन रिकेल्टन 25 रन्सकरुन आऊट झाले. त्यामुळे मुंबईची 6.4 ओव्हरनंतर 3 आऊट 58 असा स्कोअर झाला. त्यानंतर आता सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा हा जोडी खेळत आहे. या जोडीवर मोठी जबाबदारी आहे. तसेच या जोडीकडून पलटणच्या चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. त्यामुळे हे दोघे काय करतात? याकडे चाहत्यांची करडी नजर आहे.

  • 21 May 2025 08:10 PM (IST)

    MI vs DC Live Score Updates : रायन रिकेल्टन आऊट, मुंबईला तिसरा धक्का, पलटण अडचणीत

    दिल्ली कॅपिट्ल्सने मुंबई इंडियन्सला तिसरा झटका देत बॅकफुटवर ढकललं आहे. दिल्लीने रोहित शर्मा, विल जॅक्स याच्यानंतर रायन रिकेल्टन याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. कुलदीप यादव याने रायन रिकेल्टन याला माधव तिवारी याच्या हाती कॅच आऊट केल. रायनने 18 बॉलमध्ये 2 सिक्सच्या मदतीने 25 रन्स केल्या. कुलदीपने यासह आयपीएलमध्ये 100 विकेट्सचा टप्पा पार केला.

  • 21 May 2025 08:02 PM (IST)

    MI vs DC Live Updates : मुंबईला दुसरा धक्का, विल जॅक्स मैदानाबाहेर

    मुंबई इंडियन्सने दुसरी विकेट गमावली आहे.  मुकेश कुमार याने विल जॅक्स याला आऊट करत पहिली विकेट मिळवली आहे. मुकेशने विल जॅक्स याला विपराज निगम याच्या हाती कॅच आऊट केलं. विपराजने अप्रतिम कॅच घेतला. विल जॅक्स याने 13 बॉलमध्ये 21 रन्स केल्या. विलने या खेळीत 3 फोर आणि 1 सिक्स लगावला.

  • 21 May 2025 07:46 PM (IST)

    MI vs DC Live Updates : रोहित शर्मा कॅच आऊट, मुंबईला पहिला झटका

    मुंबई इंडियन्सचा स्टार बॅट्समन रोहित शर्मा आयपीएलच्या 18 व्या मोसमात वानखेडे स्टेडियममधील शेवटच्या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे.  रोहित दिल्ली विरुद्ध स्वस्तात माघारी परतला. मुस्तफिजुर रहमान याने रोहितला विकेटकीपर अभिषेक पोरेल याच्या हाती कॅच आऊट केलं. रोहितने 5 बॉलमध्ये 5 रन्स केल्या.

  • 21 May 2025 07:35 PM (IST)

    MI vs DC Live Updates : मुंबई-दिल्ली सामन्याला सुरुवात, पलटणची बॅटिंग, रोहित-रायन मैदानात

    मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामन्याला सुरुवात झाली आहे. दिल्लीने मुंबईला टॉस जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. मुंबईकडून वानखेडे स्टेडियममध्ये बॅटिंगसाठी लोकल बॉय रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन ही सलामी जोडी मैदानात आली आहे. या जोडीकडून मुंबईला मोठ्या भागीदारीची अपेक्षा आहे.

  • 21 May 2025 07:31 PM (IST)

    MI vs DC Live Updates : मुंबई-दिल्ली सामन्याआधी भारतीय सैन्याला मानवंदना

    मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजून 25 मिनिटांनी वानखेडे स्टेडियममध्ये राष्ट्रगीत पार पडलं. राष्ट्रगीताद्वारे दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आणि उपस्थित क्रिकेट चाहत्यांनी भारतयी सैन्याचे आभार मानले. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरद्वारे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला होता. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या. त्यामुळे स्थिती नियंत्रणात आली. त्यामुळे 17 मे पासून आयपीएलच्या 18 व्या मोसमातील दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. तेव्हापासून प्रत्येक स्टेडियममध्ये सामन्याआधी राष्ट्रगीत होत आहे. अशाप्रकारे खेळा़डू आणि चाहत्यांकडून सैन्यदलाचे आभार मानले जात आहेत.

  • 21 May 2025 07:10 PM (IST)

    MI vs DC Live Updates : दिल्ली कॅपिट्ल्सची प्लेइंग ईलेव्हन

    दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), अभिषेक पोरेल (विकेटकीपर), समीर रिझवी, आशुतोष शर्मा, ट्रिस्टन स्टब्स, दुष्मंथा चमीरा, विपराज निगम, माधव तिवारी, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान आणि मुकेश कुमार.

  • 21 May 2025 07:07 PM (IST)

    MI vs DC Live Updates : मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?

    मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रायन रिकेल्टन (विकेटकीपर), रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह

  • 21 May 2025 07:04 PM (IST)

    MI vs DC Live Updates : दिल्ली कॅपिट्ल्सने टॉस जिंकला, मुंबई विरुद्ध फिल्डिंगचा निर्णय

    दिल्ली कॅपिट्ल्सने मुंबई इंडियन्स विरुद्ध टॉस जिंकला आहे. कॅप्टन फाफ डु प्लेसीस याने वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध फल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मुंबई दिल्लीसमोर या निर्णायक सामन्यात दिल्लीसमोर किती धावांचं आव्हान ठेवते? याकडे पलटणच्या साऱ्या चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

  • 21 May 2025 06:50 PM (IST)

    MI vs DC Live Updates : 7 वाजता टॉस, मुंबई की दिल्ली? कोण जिंकणार?

    मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यासाठी चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या सामन्यासाठी क्रिकेट चाहते वानखेडे स्टेडियममध्ये पोहचले आहेत. सामन्याला संध्याकाळी साडे सात वाजता सुरुवात होणार आहे. तर थोड्याच वेळात टॉस होणार आहे. टॉस कोण जिंकणार? याची क्रिकेट चाहत्यांना उत्सूकता लागून आहे. आतापर्यंत बहुतांश संघांनी वानखेडेत टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता नाणेफेकीचा कौल कुणाच्या बाजूने लागतो? हे काही मिनिटांमध्ये स्पष्ट होईल.

  • 21 May 2025 06:37 PM (IST)

    MI vs DC Live Updates : दिल्ली कॅपिट्ल्स संभाव्य प्लेइंग ईलेव्हन

    फाफ डु प्लेसिस, केएल राहुल, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विपराज निगम, कुलदीप यादव, टी नटराजन, मुस्तफिजुर रहमान आणि दुष्मंथा चमीरा.

  • 21 May 2025 06:36 PM (IST)

    MI vs DC Live Updates : मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन

    रायन रिकेल्टन (विकेटकीपर), रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, कॉर्बिन बॉश, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि कर्ण शर्मा.

  • 21 May 2025 06:33 PM (IST)

    MI vs DC Live Updates : मुंबई विरुद्ध दिल्ली हेड टु हेड रेकॉर्ड्स

    आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात एकूण 36 सामने खेळवण्यात आले आहेत. मुंबई त्यापैकी 20 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर दिल्लीला 16 सामने जिंकता आले आहेत. तसेच वानखेडे स्टेडियममध्ये उभयसंघात एकूण 19 सामने खेळवण्यात आले आहेत. मुंबईने 10 पैकी 7 वेळा विजय मिळवला आहे. तर दिल्लीने मुंबईला घरच्या मैदानात 3 वेळा पराभूत केलं आहे

  • 21 May 2025 06:09 PM (IST)

    MI vs DC Live Updates : मुंबई आणि दिल्ली पॉइंट्स टेबलमध्ये कुठे?

    मुंबई इंडियन्स पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या आणि दिल्ली कॅपिट्ल्स पाचव्या स्थानी आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी 12 सामने खेळले आहेत. मात्र मुंबईने दिल्लीपेक्षा 1 जास्त सामना जिंकला आहे. दिल्लीने 12 पैकी 6 सामने जिंकले आहेत. तर दिल्लीचा एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. दिल्लीच्या खात्यात 13 पॉइंट्स आहेत. दिल्ली पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. तसेच मुंबईने 12 पैकी 7 सामने जिंकले आहेत. मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये 14 गुणांसह चौथ्या स्थानी आहे.

  • 21 May 2025 06:00 PM (IST)

    MI vs DC Live Updates : दिल्ली कॅपिटल्स टीम

    दिल्ली कॅपिटल्स टीम: केएल राहुल, फाफ डु प्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, समीर रिजवी, आशुतोष शर्मा, विप्रज निगम, कुलदीप यादव, टी नटराजन, मुस्तफिजुर रहमान, दुशमंथा चमीरा, सेदिकुल्लाह अटल, करुण नायर, त्रिपुराना विजय, माधव तिवारी, मोहित शर्मा, मुकेश कुमार, अजय जादव मंडल, दर्शन नालकंडे, डोनोवन फरेरा आणि मनवंत कुमार एल.

  • 21 May 2025 06:00 PM (IST)

    MI vs DC Live Updates : मुंबई इंडियन्स टीम

    मुंबई इंडियन्स टीम: रायन रिकेल्टन (विकेटकीपर), रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कॅप्टन), नमन धीर, कॉर्बिन बॉश, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, कर्ण शर्मा, राज बावा, रॉबिन मिंज, रीस टॉपले, अश्विनी कुमार, मिशेल सँटनर, मुजीब उर रहमान, कृष्णन श्रीजीत, रघु शर्मा, अर्जुन तेंडुलकर, बेवन जॅकब्स आणि सत्यनारायण राजू.

  • 21 May 2025 05:52 PM (IST)

    MI vs DC Live Updates : मुंबई विरुद्ध दिल्ली सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

    मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस होईल. सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. लाईव्ह मॅच मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहायला मिळेल. तर टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर मॅच पाहायला मिळेल. तसेच tv9 मराठी वेबसाईटवर सामन्याचे लाईव्ह अपडेट्स जाणून घेता येतील.

  • 21 May 2025 05:37 PM (IST)

    MI vs DC Live Updates : मुंबई विरुद्ध दिल्ली हायव्होल्टेज सामना, कोण जिंकणार?

    मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी जोरदार चुरस आहे. दिल्लीला स्वत:च्या जोरावर प्लेऑफमध्ये पोहचायचं असेल तर उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागणार आहे. दिल्लीसमोर मुंबईनंतर पंजाब किंग्संचं आव्हान असणार आहे. त्यामुळे दिल्लीला एकही चूक महागात पडू शकते. तर मुंबईने दिल्लीवर विजय मिळवला तर प्लेऑफसाठी क्वालिफाय करतील. त्यामुळे वानखेडे स्टेडियममध्ये चाहत्यांना कडवी झुंज पाहायला मिळू शकते.

Published On - May 21,2025 5:34 PM

Follow us
बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण.. ; शिंदेंचा टोला
बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण.. ; शिंदेंचा टोला.
५६ इंच छातीवाले ट्रम्पचा फोन आल्यानंतर सरेंडर होतात - संजय राऊत
५६ इंच छातीवाले ट्रम्पचा फोन आल्यानंतर सरेंडर होतात - संजय राऊत.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून राऊतांची शिंदेसेनेवर टीका
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून राऊतांची शिंदेसेनेवर टीका.
मातोश्रीसमोरील शिंदेंच्या शिवसेनेचा बॅनर फाडला
मातोश्रीसमोरील शिंदेंच्या शिवसेनेचा बॅनर फाडला.
.. तर जबाबदार तुम्हीच असाल, मनसे कार्यकर्त्याची सदावर्तेंना धमकी
.. तर जबाबदार तुम्हीच असाल, मनसे कार्यकर्त्याची सदावर्तेंना धमकी.
जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांची घरं पाण्याखाली गेली
जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांची घरं पाण्याखाली गेली.
नाले सफाईचे कोट्यवधी रुपये कुठे खर्च करता? सुप्रिया सुळेंचा सवाल
नाले सफाईचे कोट्यवधी रुपये कुठे खर्च करता? सुप्रिया सुळेंचा सवाल.
इगतपुरीला पावसानं झोडपलं; पर्यटकाची कार बुडाली
इगतपुरीला पावसानं झोडपलं; पर्यटकाची कार बुडाली.
मुंबईकरांना महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवरील वाहतूक पाऊण तास उशिरानं
मुंबईकरांना महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवरील वाहतूक पाऊण तास उशिरानं.
या कारणामुळे इंद्रायणी नदीत जाण्यासाठी वारकऱ्यांनी बंदी
या कारणामुळे इंद्रायणी नदीत जाण्यासाठी वारकऱ्यांनी बंदी.