SRH vs LSG Highlight Score, IPL 2025 : लखनौ सुपर जायंट्सने हैदराबादला 5 गडी राखून नमवलं
Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants Highlight Score in Marathi : सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादचा 5 गडी राखून पराभव केला.

आयपीएल 2025 ची सुरुवात विजयाने करणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाला लखनौ सुपर जायंट्सने नमवलं. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकांत 190 धावा केल्या, प्रत्युत्तरात लखनौला जिंकण्यात फारशी अडचण आली नाही. लखनौच्या विजयात शार्दुल ठाकूर, निकोलस पूरन-मिशेल मार्श शिल्पकार ठरले. ठाकूरने 4 विकेट्स घेतल्या तर पूरन आणि मार्शने अर्धशतके झळकावली. पूरनने फक्त 25 चेंडूत 70 धावांची खेळी केली.यात 6 षटकार आणि तेवढेच चौकार मारले. मार्शनेही अवघ्या 31 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 52 धावा केल्या. या विजयासह लखनौ सुपर जायंट्सने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. तर सनरायझर्स हैदराबादची पहिल्या स्थानावरून थेट सहाव्या स्थानी घसरण झाली आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
SRH vs LSG Live Score, IPL 2025 : लखनौ सुपर जायंट्स 5 गडी राखून विजयी
लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादला 5 गडी राखून पराभूत केलं. सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 9 गडी गमवून 190 धावा केल्या आणि विजयासाठी 191 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान 5 गडी राखून लखनौने पूर्ण केलं.
-
SRH vs LSG Live Score, IPL 2025 : ऋषभ पंत पुन्हा फेल
ऋषभ पंत प्रेशर कमी झाल्यानंतरही काही खास करू शकला नाही. खरं तर त्याच्याकडून विजयी धावांची अपेक्षा होती. पण 15 धावा करून बाद झाला.
-
-
SRH vs LSG Live Score, IPL 2025 : बदोनी 6 धावा करून बाद
बदोनी फक्त 6 धावा करून बाद झाला. झाम्पाच्या गोलंदाजीवर हर्षल पटेलने त्याचा झेल पकडला.
-
SRH vs LSG Live Score, IPL 2025 : मिचेल मार्श बाद
मिचेल मार्शची अर्धशतकी खेळी झाल्यानंतर लगेचच पॅट कमिन्सने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. 30 चेंडूत 52 धावा करून बाद झाला.
-
SRH vs LSG Live Score, IPL 2025 : मिचेल मार्शचं अर्धशतक
निकोलस पूरननंतर मिचेल मार्शने अर्धशतक झलकावलं. त्याने 29 चेंडूत 52 धावा केल्या.
-
-
SRH vs LSG Live Score, IPL 2025 : निकोलस पूरन 70 धावा करून बाद
निकोलस पूरन 26 चेंडूत 70 धावांची खेळी करून बाद झाला. पॅट कमिन्सने त्याला तंबूचा रस्ता दाखवला.
-
SRH vs LSG Live Score, IPL 2025 : निकोलस पूरनचं अर्धशतक
निकोलस पूरनने आक्रमक खेळी करत 18 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.
-
SRH vs LSG Live Score, IPL 2025 : पॉवर प्लेमध्ये लखनौचा वरचष्मा
पॉवर प्लेमध्ये लखनौ सुपर जायंट्सने 1 गडी गमवून 77 धावाा केल्या.
-
SRH vs LSG Live Score, IPL 2025 : एडन मार्करम स्वस्तात बाद
एडन मार्करमच्या रुपाने लखनौ सुपर जायंट्सला पहिला धक्का बसला. मोहम्मद शमीने त्याला बाद केलं.
-
SRH vs LSG Live Score, IPL 2025 : सनरायझर्स हैदराबादच्या 20 षटकात 9 गडी बाद 190 धावा
सनरायझर्स हैदराबादला 190 धावांवर रोखण्यात लखनौ सुपर जायंट्सला यश आलं आहे. हैदराबादने 20 षटकात 9 गडी गमवून 190 धावा केल्या आणि विजयासाठी 191 धावांचं आव्हान दिलं आहे.
-
SRH vs LSG Live Score, IPL 2025 : शार्दुल ठाकुरचं विकेटचं शतक
शार्दुल ठाकुरने मोहम्मद शमीची विकेट काढली. या सामन्यातील शार्दुलची चौथी विकेट होती. तसेच आयपीएलमध्ये 100 विकेटचा पल्ला गाठला.
-
SRH vs LSG Live Score, IPL 2025 : पॅट कमिन्स बाद
पॅट कमिन्स 4 चेंडूत 18 धावा करून बाद झाला. त्याने शार्दुलला दोन षटकार मारले, तर एक षटकार आवेश खानला मारला. पण दुसऱ्या चेंडूवर बाद झाला.
-
SRH vs LSG Live Score, IPL 2025 : अभिनव मनोहर 2 धावा करून बाद
शार्दुल ठाकुरने हैदराबादची तिसरी विकेट काढली. अभिनव मनोहरला 2 धावांवर असताना बाद केलं.
-
SRH vs LSG Live Score, IPL 2025 : अनिकेत वर्मा 36 धावा करून बाद
अनिकेत वर्मा 13 चेंडूत 36 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने पाच षटकार मारले.
-
SRH vs LSG Live Score, IPL 2025 : सेट बॅट्समन नितीश कुमार रेड्डीला केलं बाद
रवि बिश्नोईला अखेर पहिलं यश मिळालं आहे. नितीश कुमार रेड्डीला बाद करत पहिलं यश मिळवलं आहे.
-
SRH vs LSG Live Score, IPL 2025 : हेनरिक क्लासेनची विकेट
हेनरिक क्लासेनच्या रुपाने हैदराबादला चौथा धक्का बसला. खरं तर क्लासेन नॉनस्ट्राईकला होता. पण फॉलो थ्रूमध्ये प्रिंस यादवच्या हाताला चेंडूला लागला आणि स्टंप उडाल्या. क्लासेन 26 धावा करून करून बाद झाला.
-
SRH vs LSG Live Score, IPL 2025 : सनरायझर्स हैदराबादच्या 10 षटकात 3 गडी बाद 96 धावा
सनरायझर्स हैदराबादच्या 10 षटकात 3 गडी बाद 96 धावा झाल्या आहेत. आता पुढे किती धावांपर्यंत मजल मारली जाईल याकडे लक्ष लागून आहे.
-
SRH vs LSG Live Score, IPL 2025 : ट्रेव्हिस हेड 47 धावा करून तंबूत
ट्रेव्हिस हेडची विकेट काढण्यात प्रिंस यादवला यश आलं आहे. ट्रेव्हिस हेडला दोन जीवदान मिळाल्यानंतर धाकधूक वाढली होती. पण प्रिंस यादवने त्याची विकेट काढली. ट्रेव्हिस हेड 47 धावा करून बाद झाला.
-
SRH vs LSG Live Score, IPL 2025 : पॉवर प्लेमध्ये 2 गडी गमवून हैदराबादच्या 62 धावा
पॉवर प्लेच्या सहा षटकात हैदराबादने 1 गडी गमवून 62 धावा केल्या आहेत. यात ट्रेव्हिस हेडला दोन जीवदान मिळाले. तर अभिषेक शर्मा फक्त 6 धावा करून बाद झाला. इशान किशन खातंही खोलू शकला नाही.
-
SRH vs LSG Live Score, IPL 2025 : इशान किशन खातं न खोलता तंबूत
अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर इशान किशन तंबूत परतला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही.
-
SRH vs LSG Live Score, IPL 2025 : अभिषेक शर्मा फक्त 6 धावा करून बाद
अभिषेक शर्मा फक्त 6 धावा करून बाद झाला आहे. शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारताना चुकला आणि फसला.
-
SRH vs LSG Live Score, IPL 2025 : दोन्ही संघांची प्लेइंग 11
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), सिमरजीत सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद शमी
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), डेव्हिड मिलर, आयुष बडोनी, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, आवेश खान, दिग्वेश राठी, प्रिन्स यादव
-
SRH vs LSG Live Score, IPL 2025 : लखनौ सुपर जायंट्सच्या पारड्यात नाणेफेकीचा कौल, प्रथम गोलंदाजी स्वीकारली
नाणेफेकीचा कौल लखनौ सुपर जायंट्सच्या बाजूने लागला. या सामन्यात कर्णधार ऋषभ पंतने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
SRH vs LSG Live Score, IPL 2025 : अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग 11
एसआरएच : ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, ईशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), सिमरजीत सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद शमी आणि एडम झम्पा.
एलएसजी: एडेन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड मिलर, आयुष बडोनी, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, दिग्वेश राठी, मणिमरन सिद्धार्थ आणि अवेश खान
-
SRH vs LSG Live Score, IPL 2025 : राजीव गांधी स्टेडियमची खेळपट्टी कशी आहे?
गेल्या काही वर्षांत, या मैदानाची खेळपट्टी खूपच सपाट असल्याचे आढळून आले आहे, जी फलंदाजांसाठी स्वर्ग ठरली आहे. विशेषतः सनरायझर्स हैदराबादच्या नवीन स्फोटक फलंदाजीसाठी, हा एक ‘हायवे’ ठरला आहे. ज्यावर त्यांच्या फलंदाजांनी प्रचंड धावा केल्या आहेत. या हंगामातील राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 286 धावा करणारा हैदराबाद संघ त्याच मैदानावर हा आकडा ओलांडू इच्छितो. मागील रेकॉर्ड काहीही असो, आता या खेळपट्टीवर जिंकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रथम फलंदाजी करणे आणि मोठी धावसंख्या उभारणे असे दिसते.
-
SRH vs LSG Live Score, IPL 2025 : एसआरएच विरुद्ध एलएसजी यांच्यात रेकॉर्ड कसा आहे?
दोन्ही संघांच्या हेड-टू-हेड रेकॉर्डबद्दल बोललो तर सुपर जायंट्सचा येथे वरचष्मा आहे. दोन्ही संघांमधील संघर्षांमध्ये लखनौने अधिक वेळा विजय मिळवला आहे. दोघांमध्ये खेळल्या गेलेल्या 4 सामन्यांपैकी लखनौने 3 जिंकले आहेत, तर हैदराबादने फक्त 1 सामना जिंकला आहे. गेल्या हंगामात हैदराबादचा एकमेव विजय होता. जेव्हा त्यांनी फक्त 10 षटकांत 167 धावा केल्या आणि सामना 10 विकेट्सने जिंकला.
Published On - Mar 27,2025 5:23 PM
