6 वर्षांत 4 वर्ल्ड कप फायनल, 25 व्या वर्षी कर्णधार, शून्यावर आऊट न होण्याचा विश्वविक्रम पण रन आऊटने बदनाम!

अँजेलो मॅथ्यूज फलंदाजीमध्ये खूप कमी वेळा शून्यावर बाद झाला आहे. 90 सामन्यांच्या कसोटी कारकीर्दीत तो फक्त दोनदा शून्यावर बाद झाला आहे. कसोटीत सर्वात कमी वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. (Former Srilanka Captain Angelo Mathews born on this Day )

| Updated on: Jun 02, 2021 | 11:20 AM
आज श्रीलंकेचा माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूजचा वाढदिवस आहे. त्याचा जन्म 2 जून 1987 रोजी कोलंबो, श्रीलंका येथे झाला. कुमार संगकारा, तिलकरत्ने दिलशान आणि महेला जयवर्धने यांच्या काळातला तो श्रीलंका क्रिकेटमधील एक महान खेळाडू आहे. कर्णधारपदाची जबाबदारी मॅथ्यूजने खांद्यावर घेतल्यानंतर संघातील राजकारण वाढीस लागलं.पण तरीही अ‍ॅंजेलो मॅथ्यूजनेही अनेक वेळ्या आपल्या खेळाने श्रीलंकेला विजय मिळवून दिला.

1 / 6
अँजेलो मॅथ्यूजने 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वर्ष 2014 पर्यंत त्याला चार वेगवेगळ्या वर्ल्ड कप फायनल्समध्ये खेळण्याची संधी मिळाली. अँजेलो मॅथ्यूजने 2009 आयसीसी वर्ल्ड टी 20, 2011 एकदिवसीय विश्वचषक, 2012 आयसीसी वर्ल्ड टी 20 आणि 2014 साली ICC आयसीसी वर्ल्ड टी 20 च्या फायनलमध्ये खेळला. यापैकी उर्वरित तीनमध्ये श्रीलंकन संघ पराभूत झाला पण 2014  वर्ल्ड टी 20 मध्ये श्रीलंकेने विजय मिळवला.

2 / 6
अँजेलो मॅथ्यूज एक चांगला ताकदीचा फलंदाज तसंच वेळेप्रसंगी उपयुक्त गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 90 कसोटी सामन्यात 11 शतकांच्या साहाय्याने 6236 रन्स केलेत. 218 एकदिवसीय सामन्यांत तीन शतकांसह 5835 रन्स केलेत.तर 78 टी-20 सामन्यांमध्ये पाच अर्धशतकांसह 1148 धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत 33, वनडेमध्ये 120 आणि टी -20 मध्ये 38 बळी घेतले आहेत. मॅथ्यूज वयाच्या 25 व्या वर्षी श्रीलंकेच्या कसोटी संघाचा कर्णधार झाला. तो श्रीलंकेचा सर्वात तरुण कसोटी कर्णधार ठरला.

3 / 6
वर्ष 2014 अँजेलो मॅथ्यूजसाठी धडाकेबाज ठरलं. यावर्षी त्याने 77.33 च्या सरासरीने 1160 कसोटी धावा केल्या. यादरम्यान त्याने इंग्लंडविरुद्ध हेडिंग्ले येथे 160 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीने श्रीलंकेने इंग्लंडमध्ये प्रथमच कसोटी मालिका जिंकली. 2014 मध्येच श्रीलंकेने त्याच्या नेतृत्वाखाली 32 एकदिवसीय सामन्यांपैकी 20 सामने जिंकले होते. त्यावर्षी कर्णधार म्हणून त्याचा हा मोठा विजय होता.

4 / 6
अँजेलो मॅथ्यूज फलंदाजीमध्ये खूप कमी वेळा शून्यावर बाद झाला आहे. 90 सामन्यांच्या कसोटी कारकीर्दीत तो फक्त दोनदा शून्यावर बाद झाला आहे. कसोटीत सर्वात कमी वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याचबरोबर, टी -20 क्रिकेटमधील तो पहिला क्रिकेटपटू आहे जो 50 आंतरराष्ट्रीय डावानंतर प्रथमच खाते उघडण्यात अपयशी ठरला. तथापि, आपल्या सहकारी फलंदाजांना रन आऊट करण्यासाठी तो बदनाम आहे. दोन वर्षांत एकूण 64 रन आऊटमध्ये अँजलोचा सहभाग होता, असं श्रीलंकेचे माजी प्रशिक्षक चंडिका हथरुसिंगे यांनी सांगतिलं होतं.

5 / 6
2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात अँजेलो मॅथ्यूजने लसिथ मलिंगासह नवव्या विकेटसाठी 132 धावांची भागीदारी केली. नवव्या विकेटच्या भागीदारीचा हा विश्वविक्रम आहे. तो आयपीएलमध्येही खेळला आहे आणि तो पुणे वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल सारख्या संघाचा भाग राहिला.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.