Olympics 2024 Highlights And Update:: निशा उपांत्यपूर्व फेरीत हरली, पण अजूनही पदकासाठी अशी आहे संधी

| Updated on: Aug 05, 2024 | 11:14 PM

Paris Olympics 2024 5 August Updates Highlights In Marathi: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा आज दहावा दिवस आहे. आजपासून कुस्ती स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यात पुरुष आणि महिला या दोन्ही गटात भारताची ताकद पाहायला मिळणार आहे. तसेच लक्ष्य सेनचा कांस्य पदकासाठी सामनाही आहे.

Olympics 2024 Highlights And Update:: निशा उपांत्यपूर्व फेरीत हरली, पण अजूनही पदकासाठी अशी आहे संधी
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा आज 10वा दिवस आहे. आतापर्यंत भारताच्या पारड्यात फक्त 3 तीन पदकं पडली आहे. इतर स्पर्धांमधून भारताच्या पदरी निराशी पडली आहे. असं असताना गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भारत चांगली कामगिरी करणार की नाही याबाबत शंका आहे. असं असताना अजूनही आशा संपलेली नाही.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 05 Aug 2024 08:54 PM (IST)

    Paris Olympics Live Updates : निशा उपांत्यपूर्व फेरीत हरली, पण अजूनही पदकासाठी अशी आहे संधी

    भारताच्या निशा दहियाचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला आहे. उत्तर कोरियाच्या कुस्तीपटूने शेवटच्या सेकंदात झालेल्या रोमहर्षक लढतीत तिचा 10-8 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीतील पराभवानंतरही निशाला पदकापर्यंत पोहोचण्याची संधी आहे. कुस्तीच्या नियमांनुसार, जर निशाला पराभूत करणारी कोरियाची कुस्तीपटू अंतिम फेरीत पोहोचली, तर निशाला रेपेचेजमध्ये संधी मिळेल, ज्याद्वारे ती कांस्यपदकापर्यंत पोहोचू शकेल.

  • 05 Aug 2024 07:37 PM (IST)

    Paris Olympics Live Updates : कुस्तीमध्ये निशाची सुरुवात विजयाने

    भारताच्या निशाने कुस्ती विजयाने केली आहे. निशाने पहिल्या फेरीत युक्रेनच्या कुस्तीपटूचा 6-4 असा पराभव केला. बराच वेळ सामना 4-4 असा बरोबरीत राहिला आणि अखेरच्या सेकंदात गुण मिळवून सामना जिंकला.

  • 05 Aug 2024 07:14 PM (IST)

    Paris Olympics Live Updates : लक्ष्य सेनची कांस्य पदकासाठी झुंज संपली, पदरी निराशा

    लक्ष्य सेनने पहिला सेट जिंकल्यानंतर शेवटच्या दोन सेटमध्ये पराभवाचं तोंड पाहिलं. त्यामुळे कांस्य पदकाचं आव्हान संपुष्टात आलं आहे.

  • 05 Aug 2024 06:48 PM (IST)

    Paris Olympics Live Updates: लक्ष्य सेनने दुसरा सेट गमावला, तिसऱ्या सेटमध्ये काय ते ठरणार?

    लक्ष्य सेनने पहिला सेट जिंकल्यानंतर दुसरा सेट गमावला आहे. त्यामुळे तिसऱ्या सेटचं महत्त्व वाढलं आहे. हा सेट जिंकेल त्याला कांस्य पदक मिळणार आहे.

  • 05 Aug 2024 06:22 PM (IST)

    Paris Olympics Live Updates: लक्ष्य सेनने पहिला सेट जिंकला, ली जी जियला दिली 21-13 मात

    लक्ष्य सेनने पहिला सेट आपल्या नावावर केला आहे. मलेशियाच्या ली जी जियाला 21-13 ने मात दिली.

  • 05 Aug 2024 06:09 PM (IST)

    Paris Olympics Live Updates: कांस्य पदकासाठी लक्ष्य सेनची लढत सुरु, समोर मलेशियाचा ली जी जिया

    कांस्य पदकासाठी लक्ष्य सेनची लढत सुरु झाली आहे. समोर मलेशियाच्या ली जी जिया याचं आव्हान आहे.

  • 05 Aug 2024 05:04 PM (IST)

    Paris Olympics Live Updates: नेमबाजीत भारत कांस्य पदकाच्या जवळ

    भारताने स्कीट नेमबाजीत मोठे यश संपादन केले असून मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकण्याच्या जवळ पोहोचले आहेत. भारतासाठी माहेश्वरी चौहान आणि अनंतजित सिंग या जोडीने पात्रता फेरीत 146 गुणांसह चौथे स्थान मिळविले. यासह दोघेही कांस्यपदकासाठी पात्र ठरले आहेत. आज संध्याकाळी 6.30 वाजल्यापासून भारताची ब्राँझसाठी चीनशी स्पर्धा होणार आहे. सुवर्णपदकासाठी अमेरिका आणि इटली यांच्यात स्पर्धा होणार आहे.

  • 05 Aug 2024 05:02 PM (IST)

    Paris Olympics Live Updates: टेबल टेनिसमध्ये भारत उपांत्यपूर्व फेरीत

    मनिका बत्राने शेवटच्या फेरीतत 3-0 असा दमदार विजय नोंदवत टीम इंडियाला उपांत्यपूर्व फेरीत नेले. मनिकाने प्री-क्वार्टर फायनलच्या 5 व्या फेरीत एनिका डायकोनूचा 3-0 असा पराभव केला. अशा प्रकारे भारताने रोमानियाचा 3-2 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.

  • 05 Aug 2024 02:46 PM (IST)

    Paris Olympics Live Updates: भारताच्या पुरुष गोल्फरची मोहीम संपली

    पॅरिस ऑलिम्पिकमधील गोल्फ प्रकारात भारतीय खेळाडूंनी निराशा केली. शुभंकर शर्मा आणि गगनजीत भुल्लर हे दोघेही चौथ्या फेरीनंतर पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. शुभंकर शर्मा 40व्या तर गगनजीत 45व्या स्थानावर आहे.

  • 05 Aug 2024 02:44 PM (IST)

    Paris Olympics Live Updates: टेबल टेनिसमध्ये भारत रोमानिया यांच्यात अतितटीचा सामना

    भारताने पहिले दोन सामने जिंकल्यानंतर महिला टेबल टेनिसच्या 16 फेरीतील तिसरा सामना रोमानियाने जिंकला आहे. चौथ्या सामन्यातही रोमानियाकडे आघाडी आहे.

  • 05 Aug 2024 02:40 PM (IST)

    Paris Olympics Live Updates: टेबल टेनिसमध्ये भारत विरुद्ध रोमानिया

    टेबल टेनिसमधील भारत आणि रोमानिया यांच्यातील सांघिक स्पर्धा सुरू झाली आहे. महिलांच्या या स्पर्धेत भारताकडून श्रीजा अकुला, मनिका बत्रा सहभागी होत आहेत. 16व्या फेरीचा हा सामना दोन्ही संघांमध्ये खेळला जात आहे.

  • 05 Aug 2024 02:40 PM (IST)

    Paris Olympics Live Updates: लक्ष्य सेन आज इतिहास रचणार का?

    लक्ष्य सेन इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. मलेशियाच्या ली जियाविरुद्ध त्याने कांस्यपदकाचा सामना जिंकल्यास ऑलिम्पिकच्या पुरुषांच्या बॅडमिंटन स्पर्धेत पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरेल.

Published On - Aug 05,2024 2:37 PM

Follow us
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट.
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात.
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.